जरांगेच्या आंदोलनाने भले भले विद्वान पागल झाले .कायदेपंडित हवालदिल झाले जरांगे कोणी महान माणुस आहे म्हणुन नव्हे तर ओबीसी व विमुक्त भटक्यांना मराठ्यांच्या धमकावण्याचे शस्र या माध्यमातून चालू आहे मग आमच्या मधील अति शहाणे उठतात .मग आम्हाला ही तो हैदराबाद गॅझेट लागु करा .म्हणजे बेंदराला त्यांनी बैलाची शिंगे रंगवली तर आपणही गाढवाची शिंगे रंगवायला घ्यायची .मुळात गाढवाला शिंगेच नसतात इतका साधा विवेक आपल्याकडे नाही .आता हैद्राबाद गॅझेट लागु करायला कोर्टातून मनाई हुकुम निघेल .मग समस्त ओबीसी व विमुक्त भटक्या जमाती मधील लोक स्वतःच्या यशाचे ढुंगण बडवुन घेतील .वास्तविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ” ब्राऊचर आफ कास्ट ” या पुस्तकात एससी, एसटी ,व्हिजेएनटी ओबीसी यांच्या सविस्तर व्याख्या लिहुन ठेवल्या आहेत .कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे आणी सवलती फक्त बौद्धांना दिल्या आहेत यातुन जोपर्यंत आपले लोक बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत काहीही साध्य होणार नाही .आता हैद्राबाद गॅझेट चा परिणाम काय होईल ते स्पष्ट सांगतो ” हैदराबाद गॅझेट लागु होणार नाही असा जरी अध्यादेश कोर्टाकडून निघाला तरी ओबीसी व विमुक्त भटक्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणतेच स्थान असणार नाही .कारण बहुतांशी मराठ्यांकडे ओबीसी व विमुक्त भटक्यांच्या जागेवर लढण्यासाठी त्यांच्याकडे ” कुणबी ” दाखला आहे .खुल्या मतदार संघात निवडणूक लढणारा मराठा सक्षम आहे .दुर्देवाने आपण काहीच समज घेत नाही .आणी जोपर्यंत ” संविधानाला मानुन ओबीसी विमुक्त भटक्या जमातींनी अंतर्गत जातीभेद गाढुन एससी ,एसटी ना आपले म्हणण्याची भावना बाळगणार नाही तोपर्यंत या देशात लोकशाही असली तरी सर्व राजकीय पक्षांच्या तोंडात फुले ,शाहु आंबेडकर यांचे नाव असले तरीही ” सर्व समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय लोकशाही मिळणे कठीण.