• 181
  • 1 minute read

हॉस्पिटलच्या साफसफाई ठेक्यावरून धुसफूस; भुसावळ दुहेरी हत्याकांड

हॉस्पिटलच्या साफसफाई ठेक्यावरून धुसफूस; भुसावळ दुहेरी हत्याकांड

भुसावळ  माजी नगरसेवक आणि त्यांच्या मित्राच्या हत्येनं भुसावळ शहर हादरलं आहे. यातच या हत्येला एका हॉस्पिटलमधील साफसफाईच्या ठेका कारण ठरल्याची माहिती समोर आली आहे.

दुहेरी हत्याकांडाने जळगाव शहर पोलिसांची चांगलीच झोप उडाली होती. हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींपैकी नाशिक येथील मुख्य सूत्रधार करण पथरोड याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. तर इतर दोन आरोपी शिव पथरोड आणि संतोष बारसे यांच्यात एका हॉस्पिटलच्या साफसफाईच्या ठेक्यावरून धुसफूस होती अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

हत्या प्रकरणातील एक संशयित आरोपी शिव पथरोड याच्याकडे एका हॉस्पिटल मधील साफसफाईचा ठेका होता. पथरोडकडे असलेला हा ठेका संतोष बारसे याने आपल्या जवळच्या मित्राला मिळवून दिला. यामुळे शिव यांचा बरसेंवर राग होता. या रागातूनच संतोष बारसेंचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

११ आरोपींमधील राजू सूर्यवंशी व विनोद चावरीया या दोन आरोपींना गुरुवारी दुपारी साक्री येथून तर मुख्य सूत्रधारास नाशिक येथून अटक करण्यात आली होती. मुख्य सूत्रधार करण पथरोड याने आता आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *