- 118
- 1 minute read
20 मार्च डॉ.बाबासाहेब याचा महाड पाण्याचा सत्याग्रह
शक्य आणि कोलियात रोहिणी नदीच्या पाण्या वरून होणाऱ्या युद्धास विरोध केल्याने सिद्धार्थ गौतमास गृहत्याग करावा लागला.युद्ध थांबले. ही पाण्यासाठीची जगातील पहिली क्रांती होय.महात्मा फुले यांनी अस्पृश्यसाठी आपला पुण्यातील पाण्याचा हौद खुला केला ही जगातील पाण्याची दुसरी क्रांती आहे. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी २० मार्च १९२७ रोजी महाडचे सावर्जनिक चवदार तळे सर्वासाठी खुले करून पाण्यासाठी केलेली जगातील तिसरी क्रांती केली आहे.
समाजवादी ब्राह्मण सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी महाड नगरपालिका सवर्णांकडून ‘अस्पृश्य’ मानल्या जाणाऱ्या जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923 साली मुंबई कायदे मंडळाने संमत केला.महाडच्या नगरपालिकेने या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय जानेवारी १९२४ साली पारित केला. सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल त्याची प्रत्यक्ष
अंमलबजावनी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची सभा आयोजित करण्यात आली.की, या आंदोलनात समाजवादी ब्राह्मण सुरेंद्रनाथ टिपणीस, अनंत चित्रे, गंगाधर सहस्त्रबुद्धे याच मोठ योगदान होते .सभेला आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयी करण्यासाठी सर्वणाकडून ४० रुपये किमतीचे पाणी विकत घेण्यात आले होते.
डॉ बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले की,सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी कुत्री मांजरे पशु पक्षी पिऊ शकतात.पण आम्हा अस्पृश्य वर्गाला मनाई आहे. कारण आमच्या स्पर्शाने माणसाला विटाळ आणि पाणी बाटते.
चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो , तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्या करिताच तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे.”
डॉ.बाबासाहेब यानी आपल्या सोबत ५००० लोक घेवून २० मार्च १९२७ रोजी महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले.
सनातनी यानी लोकांना भडकविण्यासाठी अफवा पसरवल्या की चवदार तळ्याचे
पाणी बाटवल्या नंतर हा जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे.” धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले. त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. त्यात अनेक सत्याग्रही जखमी झाले. महिला लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली.
मारेकरी महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होते . आंदोलनात सहभागी झालेले अनेक लोक म्हणत होते डॉ.बाबासाहेब तुम्ही फक्त आदेश द्या.आम्ही याच्याकडे बघून घेतो.
परंतु डॉ.बाबासाहेब यानी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता .
महात्मा गांधींनी ही बातमी समजली.स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करून मोठी
चुक केली आहे. सत्याग्रहाला आलेल्या सर्व
अस्पृश्यांनी संयम ठेवला सर्व सत्याग्रहींचे महात्मा गांधींनी कौतुकही करून या आंदोलनास
आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी मत मांडले.ही
बातमी यंग इंडियामध्ये प्रकाशित झाली होती.
त्यानंतर महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड. विष्णू नरहरी खोडके यांनी १९३१ साली एक समारंभ आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. डॉ. आंबेडकर यांनी १९ मार्च १९४० रोजी महाड मध्ये १४ वा ‘महाड सत्याग्रह दिन’ आयोजित केला. त्या वेळचे त्याचे भाषण आजच्या महिलांनी समजून घेण्याची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब भाषणातून स्त्री-पुरुषांना आवाहन करतात की, आपली जात दाखवणारी लक्षणे म्हणजे अंगावर काळा दोरा नकली आणि चांदीचे दागिने वापरू नका.स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसणाऱ्या स्त्रियांना डॉ. बाबासाहेब इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवीतात.पुरुषांनाही हातात कायम संनकाठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. आणि विशेष म्हणजे डॉ.बाबा साहेब म्हणतात .कितीही अडचणी आल्या तरी मुलांना शिक्षण द्या.
तुम्हाला गरिबीमुळे शिक्षण घेवून साहेब होता आले नाही.पण मुलांना शिकवून साहेबाचे बाप बना.
बालपणापासून जातीयतेचे चटके सोसलेला भिवा वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होता. शाळेच्या सार्वजनिक नळावर पाणी पिण्याचा अधिकार नसलेला भिवाला शाळेत दिवसभर बिनापाण्याचे शिक्षण घ्यावे लागत होते.१९३९ साली गाडीने पुण्याला निघालेले
बाबासाहेबाना तहान लागली म्हणून पनवेल एस टी बस स्टँड समोरील एक छोटेखानी हॉटेल समोर गाडी थांबवून ड्रायवरने वेटरला आवाज दिला .डॉ. आंबेडकर गाडीत आहेत.त्यांना एक ग्लास पाणी आण.वेटर पाण्याचा ग्लास
घेवून आला. आणि डॉ.बाबासाहेब याना पाण्याचा ग्लास देणार तोच मालक ओरडला आरे
थांब महार आंबेडकर मुळे आपला ग्लास बाटेल.
डॉ.बाबासाहेब याना पाणी दिले नाही. म्हणून
तिथं लाखड फोडणारा सोनबा येवले पानी आणण्यासाठी घरी घाव घेवून पाण्याचा मटका घेवून येतो.तो पर्यंत महार आंबेडकर .या शब्दांनी घायाळ झालेले डॉ.बाबासाहेब रागाने निघून जातात.ताहानेलेल्या डॉ बाबासाहेब याना परत येताना पाणी देईन म्हणून सोनबा येवले पाण्याचा माठ घेवून अखेरच्या श्वासांपर्यंत वाट पाहत राहिला.
डॉ.बाबासाहेब 1942 ते 1946 या काळात व्हॉईसरायच्या मंत्रिमंडळात श्रम, जलनियोजन, रोजगार, खनिजनिर्मिती मंत्री असताना घोटभर पाण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर अवहेलना केली
त्यांना पाण्याचा दीर्घकाळ वापर करता यावा म्हणून अनेक धरणे बांधण्यास चालना दिली. ऊर्जा विकासासाठी अनेक धोरणे राबवून मोठ्या प्रमाणात वीज निर्मितीसाठी प्रयत्न केले. कामगार आयोग, जल आयोग, वीज आयोग, नदी खोरे प्राधिकरण, स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. आपला देश अर्थ, वीज, उद्योग, शेती, पाणी या क्षेत्रात परिपूर्ण व्हावा, म्हणून त्यांनी अनेक धोरणे तयार करुन देश पातळीवर नदी जोड प्रकल्प विकासाचा आराखडा तयार केला.पाणी परिषद घेवून देशाला इशारा दिला की, ” पाणी ही राष्ट्राची संपत्ती आहे.पाण्याचे योग्य प्रकारे आयोजन ,नियोजन आणि प्रयोजन केले नाही तर भविष्यात घोटभर पाण्यासाठी पैसे मोजावे लागतील.डॉ.बाबासाहैब सुवर्ण जातीत जन्माला आले असते तर त्याची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढली असती.पण अस्पृश्य जातीत जन्माला आले म्हणून
त्याची आणि त्याच्या विचाराची नेहमीच अवहेलना करण्यात आली.डॉ.बाबासाहेब याचा विचार कृतीत न आणल्या मुळे आज एक पाण्याच्या बाटलीला २० रुपये मोजावे लागत आहेत.
डॉ.बाबासाहेब यानी भारतीय समाजातील अस्पृश्यतेची प्रथा, रुढी, परंपरा मोडून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम 15 भेदभाव करण्यास मनाई केली आहे.तर कालम
17 समतेचा हक्क प्रस्थापित करणारे आहे.
महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला ९७ वर्ष झालीं.तरी संविधानाला ७५ वर्ष झालीं.तरी
सुधा अस्पृश्यतेच्या आणि भेदभावाच्या खाणाखुणा पूर्णपणे पुसलेल्या नाहीत.राजस्थानच्या जोलार मधील अवघ्या ९ वर्षाच्या कोवळ्या दलित विद्यार्थ्याची केवळ त्याने सवर्ण शिक्षकासाठी राखून ठेवलेल्या माठातून पाणी पिल्याच्या.रागातून झालेली निर्घृण हत्या हा मानवतेला लागलेला कलंक आहे. 9 जून 2019 रोजी उत्तर प्रदेशच्या कोशंबी मध्ये घडलेली एका घटना म्हणजे सार्वजनिक हँण्डपंपवर पाणी भरलं म्हणून दलित महिलेला मारहाण करुन विवस्त्र करण्यात आले.साताऱ्यातील कुळकजाई गावाचे मधुकर घाडगे हे बौद्ध आणि सुशिक्षित कुटुंब मधुकर घाडगे यांनी 26 एप्रिल 2007 रोजी खोदलेल्या विहिरीला भरपूर पाणी लागले म्हणून त्याचा राग येवून त्या परिवाराला मारहाण करण्यात आली.
फुले शाहू आंबेडकर याचा पुरोगामी महाराष्ट्र पण शासन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवित नसल्याने महाराष्ट्रातील अनेक गावं कर्नाटक सरकारला विनवणी करीत आहेत की,आम्हाला पाणी द्या आणि कर्नाटक मध्ये सामावून घ्या.
त्यामुळे पाणी ही समस्या केवळ मागासलेल्या समाजाची नव्हे तर संपूर्ण मानव जातीची समस्या
बनली आहे. निसर्गाचे पाणी पिण्याचा आम्हाला देखील हक्क आहे. त्यासाठी आमचा हा संघर्ष आहे. म्हणून २० मार्च हा दिवस “सामाजिक सबलीकरण दिन” म्हणून भारत वर्षात साजरा करून भारत सरकारला पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यास भाग पाडले पाहिजे.
– आनंद म्हस्के
मुंबई