- 65
- 1 minute read
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 96
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन.
अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी गांधीजींना
“मला मायभूमी नाही” असे. म्हणणारे डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांची जगभर भव्य स्मारक उभा राहत आहेत.गल्ली ते दिल्ली आणि देश ते विदेश सलग तिनं महिने जगभर जयंती साजरी होण्याचे एकमेव भाग्य
लाभलेले डॉ.बाबसाहेब यांचा जयभीम हा समता मूलक
जगाचा श्वास बनला आहे. युनोच्या वतीने 14 एप्रिल जन्मदिन जागतिक ज्ञानदिन साजरा होत असलेल्या प्रज्ञासूर्याच्या ज्ञानाची पहिली पहाट म्हणजे शालेय प्रवेश दिनाची सर्वानाच उच्छुक्ता लागून राहिली होती .
सातारा कोरेगाव मायणी परिसरात ब्रिटिश सरकारच्या वतीने तलावाचे बांधकाम सुरू होते. सुभेदार रामजीबाबा तेथे स्टोरकिपर काम करत होते. 1896 सालापासून साताऱ्यात.वास्तव्य असलेले रामजीबाबानी आपली दोन मुलं मुकुंद आणि भिवा याना शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. तेंव्हाचे गव्हर्नमेंट इंग्लिश मेडियम हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल ) या शाळेत इंग्रजी पहिल्या इयत्तेत प्रवेश घेताना 7 नोव्हेंबर 1900 रोजी शाळेच्या प्रवेश निर्गम रजिस्टरच्या १९१४ अनुक्रमांकावर भीमराव रामजी आंबडवेकर’ अशी मोडीमध्ये स्वाक्षरी आहे. या घटनेला 100 वर्ष झाली
आमचे मित्र पत्रकार लेखक अरुण जावळे याना 2000 साली सातारा शहर राजवाडा चौकातील प्रतापसिंह हायस्कूलचे प्रिन्सिपॉल आणि स्टाफ याच्या सहकार्याने प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांची शाळा प्रवेशची तारीख 7 नोव्हेंबर 1900 शोधून काढण्यात यश आले
7 नोव्हेंबर हा शालेय प्रवेश विद्यार्थी दिन
महाराष्ट्र शासनाच्या वतीने साजरा करण्यासाठी पत्रकार लेखक अरुण जावळे याना 14 वर्ष संघर्ष करावा लागला. जिल्हा परिषद शाळातून व्याख्यान स्पर्धा निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आयोजित कराव्या लागल्या .तत्कालीन केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार याना
2014 साली साताऱ्यात निमंत्रित करून डॉ बाबासाहेब यांचा 7 नोव्हेंबर प्रवेश दीन साजरा करावा लागला.
प्रथमच चेंबूर येथे राहुल विद्यार्थी संघाचे विनोद पवार आणि सहकारी यांनी मुंबई चेंबूर मध्ये 7 नोव्हेंबर डॉ.बाबसाहेब याचा शालेय दिन साजरा करण्यास सुरुवात केली .तत्कालीन समाज कल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी 2017 साली जीआर काढून सर्व शाळातून संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर शालेय प्रवेश दीन साजरा करण्याची घोषणा केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर प्रथम शालेय दीन हा भारतच नव्हे तर जगातील शोषित पिढीत दलित,आदिवासी, वंचित, दुर्बल, भटके गावकुसा बाहेरच्या विद्यार्थी ,पालक आणि शिक्षक सर्वांच्या मुक्ती, शिक्षण आणि प्रगतीचा दिपस्तंभ आहे. 32 डिग्री आणि 9 भाषा अवगत महान विद्वानांची परिभाषा नॉलेज ऑफ सिम्बॉल आहे. उच्च दर्जाची विद्वता असूनही 18 तास अभ्यास करणारे डॉ बाबासाहेब अखेरच्या श्वासा पर्यंत स्वतःला विद्यार्थी समजत होते.lअल्पकाळात जास्त डिग्री मिळविणारे एकमेव व्यक्ती डॉ बाबासाहेब याना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले.तेच डॉ.बाबसाहेब जगाच्या ज्ञानाचे एक विद्यापीठ बनले असून जगातील सर्वात जास्त विद्यार्थी त्यांच्यावर पीचडी करीत आहेत.ही भारतासाठी गौरवास्पद बाब आहे.
7 नोव्हेंबर 1900 रोजी शाळा प्रवेश होताच रामजीबाबा आपल्या मुलांना घेवून सरळ वर्गात घेवून गेले.त्यावेळी शिक्षक म्हणाले मुलांसाठी शाळेचं दफ्तर आणि बसण्यास गोणपाट घेवून उद्या शाळेत या.परंतु
दफ्तर असलेल्या मुलांना बसण्याच्या गोणपाट साठी उद्या कश्याला म्हणत रामजीबाबानी आपल्या डोक्यावरचा जरीफेटा फाडून एक तुकडा भिवाला तर दुसरा मुकुंदला
दिला.मुलांनीही जरीफेटा गोणपाट समजून ज्ञान ग्रहणास सुरुवात केली.पहिल्याच दिवशी दक्ष पालक आणि ज्ञानलालशी. पाल्याचा अनुभव प्रथमच शिक्षकाला आला. भिमरावानी शाळेत जाण्यापूर्वी सही कशी केली ?
कोणालाही सहज प्रश्न ले री पडेल.परंतु रामजीबाबानी
भिवावर उच्च शिक्षित होण्याचे अगोदरच संस्कार केले होते.माझ्या भिवाच्या पावन स्पर्शाने शाळाच नाही तर सातारची भूमी पवित्र होणार असल्याची त्यांना खात्री होती. तर शाळेने देखील.100 वर्षा पूर्वीचा हा ऐतिहासिक दस्तऐवज मोठ्या अभिमानाने जतन व संरक्षण करून ठेवला आहे .कारण .त्यांच्या पद स्पर्शाने आमच्या शाळेचे नाव देखील जगाच्या पाठीवर इतिहासात अजरामर होणार असल्याची त्यांनाही खात्री असावी.
डॉ.बाबसाहेब यांनी 7 नोव्हेंबर 1900 ते 1904 पर्यंत चौथी इंग्रजी पर्यंतचे शिक्षण साताऱ्यात झाले.
त्यांचा सकपाळ ते आंबेडकर या आडनावाचा मोठा रंजक इतिहास आहे.रामजीबाबाचे कोकणातील मूळ गाव आंबडवे आणि आडनाव सकपाळ परंतु त्यांनी भीमरावास शाळेत भीमराव रामजी ‘आंबडवेकर’ अशी
करावयास लावली. कारण कोकणात गावाच्या नावाला शेवटी कर लावणारे बहुतेक ब्राह्मण समजले जातात.परंतु
त्याच शाळेचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर हे मूळ रत्नागिरी जवळील ‘वांद्री’ गावचे.पेशव्यांनी ‘आंबेड’ गावाचे वतन दिल्याने त्यांचे ‘आंबेडकर’ आडनाव पडले. गुरुजी देवरुखे ब्राह्मण त्याचा भीमराव आंबडवेकर हा अत्यंत हुशार आणि आवडता विद्यार्थी त्याचे आडनाव उच्चारन्यास अवघड असल्याची त्यांनी रामजीबाबाची समजूत काढून भीमरावास आपले आंबेडकर हे आडनाव
दिल्याचे सांगितले जात असले तरी काही मंडळीच्या मते हे आडनाव रामजीबाबानीच बदललेले आहे .
डॉ.बाबासाहेब विदेशातून उच्च शिक्षण घेऊन
मायदेशी येवून आंदोलन सुरू केले. सातारला जावून त्यांनी आपले गुरुवर्य कृष्णाजी केशव आंबेडकर यांची भेट घेवून त्यांच्या पेन्शनचे काम करून दिले. गुरुजींचे वयाच्या 79 ब्या वर्षी निधन झाले.त्याची तिसरी पिढी विखुरली असली तरी काही नातू आदिवासी भागात समाज कार्य करीत आहेत . एक नातू विनायक आंबेडकर यांनी मुंबई लघुवाद न्यायालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे बार रूममध्ये १२ फुटी तैलचित्र लावले आहे. त्यांनी
आपले आजोबा .कृष्णाजी आंबेडकर गुरुजी याची छायाचित्रं आणि पत्रांचा अनमोल ऐतिहासिक ठेवा त्याच्या तिसऱ्या पिढीने पुण्यातील सिम्बाॅयसिस वस्तुसंग्रहास दान दिला आहे.अशी एक बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती त्याची देखील शहानिशा करण्याची गरज आहे.
प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा 7 नोव्हेंबर हा शालेय प्रवेश दीन हा विद्यार्थी दीन म्हणून महाराष्ट्रातच
नव्हे तर भारत वर्षात साजरा झाला पाहिजे
असे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एका कार्यक्रमात घोषित केले होते डॉ राधाकृष्ण पल्ली
यांचा शिक्षक दीन डॉ अब्दुल कलाम यांचा पुस्तकं दीन
तसाच डॉ.बाबसाहेब यांचा 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दीन
भारत वर्षात साजरा झाला पाहिजे
त्या करिता राष्ट्रपती आणि प्रधानसेवक याना मुंबईतून सव्वा लाख पत्र पाठविण्याची मोहीम सुरू आहे.
आनंद म्हस्के
89285 64235
0Shares