• 946
  • 1 minute read

आणि…वाळवंटात झाले पाणीच पाणी !

आणि…वाळवंटात झाले पाणीच पाणी !

दुबई विमानतळावर काल अवघ्या बारा तासात सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात एकूण १६० मिमी पाऊस पडला. एकाच दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे आलेल्या पुराचा दुबईच्या वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दुबई विमानतळ पाण्याने भरले आहे. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा सल्लागार जारी केला होता ज्यात लोकांना खराब हवामानाबद्दल सतर्क केले होते.
संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये काल वर्षभराचा पाऊस एकदाच आल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक शहरे ठप्प झाली आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली गेले आहे. इथल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. इतकेच नाही तर शेजारील ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *