• 97
  • 1 minute read

वंचितांनो, आरक्षण वाद्यांनो, मत विभाजनाच्या नावाखाली फसु नका ! आपले मत वंचित बहुजन आघाडी ला च द्या…!

वंचितांनो, आरक्षण वाद्यांनो, मत विभाजनाच्या नावाखाली फसु नका ! आपले मत वंचित बहुजन आघाडी ला च द्या…!

वंचितांनो जागे व्हा, संरजामी प्रस्थापित राजकीय घराणेशाही च्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करा. छत्रपती शिवाजी,फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची ईमानदारी ने कास धरा, विचार करा…..

भुरटे चोर ई डी, सी बी आय, आय टी ला घाबरून भाजपा त का सामील होत आहेत?

सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हा खेळ मांडून निवडणूक महागडी करणारे कोण आहेत?
सामान्य जनतेला लोकशाही ची हि निवडणूक पैशा अभावी लढताच येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणारे कोण आहेत?
वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कट कारस्थान रचणारे कोण आहेत?
भारतीय संविधान व लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली वंचितांची भावनिक दिशाभूल करून सत्तेचा मलीदा खाण्यासाठी वंचितांची मते लुटु पाहणारे कोण आहेत?
आज भाजपा जी सत्तेवर बसली आहे त्यातील सर्वाधिक खासदार आमदार मंत्री हे कोणत्या पक्षातुन आलेले आहेत?

विमुक्त भटक्यां जमाती, आलुतेदार बलुतेदार, मायक्रो ओबीसी, अल्पसंख्याक , सामान्य गरीब रयतेच्या मावळ्यांना खासदार की आमदार की साठी लायक न समजणारे कोण आहेत?

आपली मते लुटुन सत्तेचा मलीदा खाणारे, परंतु आपल्या समस्या वाढवणारे कोण आहेत?

आजपर्यंत जातीनिहाय जनगणना न करणारे, शिक्षणाचे खाजगीकरण करून महागडे करणारे कोण आहेत? स्वास्थ्य सुविधा, मुलभूत सुविधा न पुरवणारे कोण आहेत? बेरोजगारी वाढवणारे कोण आहेत?

ऐवढी वर्षे सत्तेत असतांना ज्यांनी भारतीय संविधानाची ईमानदारी ने अंमलबजावणी केली नाही, संविधानिक मुल्ये समाजात, प्रशासनात, व्यवस्थेत, रुजवली नाही तेच लोक आज आपल्याला संविधानाची आठवण करून देत आहे हे आपल्या सोबत केले जाणारे फार मोठे षडयंत्र आहे! याची जाणीव ठेवा.

गेली चाळीस वर्षे अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार उभे करणारे कोण आहेत?

षडयंत्र पुर्वक कट कारस्थान रचणारे कोण आहेत?

एकदा तरी डोळे उघडुन विचार करा.

वंचितांनो आता तरी जागे व्हा, प्रस्थापित राजकीय पक्षांची साथ सोडा, वंचित बहुजन आघाडी ला च आपले अमुल्य मत देऊ या, सत्ताधारी बनुया, आपल्या समस्या आपणच सोडवुया.भारतीय संविधान व लोकशाही अधिक बळकट करूया. राजकीय लोकशाही चे सामाजिक लोकशाही त रूपांतर करूया. वंचित बहुजन आघाडी च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

जयभारत जयसंविधान
– अंबरसिंग चव्हाण

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *