- 28
- 1 minute read
आंबेडकरी विचारवंतांना आवाहन…!
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही आंबेडकरी विचारवंतांनी राजकीय भुमिका घेतली आणिफतवा काढला की, ब.स.पा.किंवा वंचित बहुजन आघाढीला मतदान करु नका. मविआ आघाढीला मतदान करा…!!
फतवा काढतांना आंबेडकरी विचारवंतांनी असा तर्क दिला की, मतांची विभागणी झाली तर पुन्हा भाजप सत्तेवर येईल आणि संविधान बदलल्या जाईल. लोकशाही संपविली जाईल.म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी,संविधान कायम ठेवण्यासाठी मविआ आघाढीला मतदान करा…!!
आपणं विचारवंत असल्यामुळे आपणांस भविष्यात डोकावता येते.भविष्यात डोकावण्या एवढी आमची बौद्धिक क्षमता आहे,अशा अविर्भावात येऊन,आणि समाजहित लक्षात घेऊन आपणं राजकारण करीत नसलात तरीही राजकीय भुमिका घेतली…!!
आपण मतदान करण्यासाठी केवळ आणि केवळ आंबेडकरी समूहाला आवाहन केले होते.इतर कुठल्याही समूहाला,गटाला,जातीला,वर्गाला,अथवा मतदारांना आवाहन केलेले नाही.कारण आपले बंधू म्हणून आपण केवळ आंबेडकरी समुहालाच आवाहन करु शकतो. हा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत होता…!!
आंबेडकरी विचारवंतांनी राजकीय भुमिका घेत भविष्यात काय घडू शकते याचा अदमास घेऊन समाजहितासाठी जी भुमिका घेतली, तशी भुतकाळात घडून गेलेल्या अनुभवांतून दगाबाज राजकीय पुढा-यासाठी, आणि राजकीय पक्षांसाठी भुमिका घेतली पाहिजे असे आवाहन एक आंबेडकरवादी नागरिक म्हणून मी तुम्हांला समाजाच्या वतीने करतोय…!!
आपणं राजकीय भुमिका घेता हे सिद्ध झाले त्यामुळे आंबेडकरी समुहाचे अतोनात राजकीय नुकसान करणा-या पाताळयंत्री दगाबाज नेतृत्वाच्या विरोधात समाजहितासाठी आपणं भुमिका घेतली पाहिजे ही तुमची नैतिक जबाबदारी सुद्धा ठरते…!!
आंबेडकरी विचारवंतांमध्ये विवेक जागृत असेल,वैचारिक प्रामाणिकता शाबूत असेल,सामाजिक बांधिलकी तुमच्या नसा नसात असेल आणि कुठलाही स्वार्थ मनात नसेल तर आंबेडकरी विचारवंतांनी आता समाजहिताची भुमिका घेतली पाहिजे…!!
तुम्ही भुमिका घ्यावी त्यासाठी अदमास घेण्याची गरज नाही.तर्क देण्याची गरज नाही. घडलेल्या घटनांचा पाढा तुमच्या समोर मांडतोय, त्या घटनांमुळे आंबेडकरी समुहाचे अतोनात राजकीय नुकसान झाले आहे…!!
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय नुकसान टाळण्यासाठी तुम्ही फतवा काढला तसा आंबेडकरी समुहाचे राजकीय नुकसान टाळण्यासाठी तुम्ही भुमिका घेतली पाहिजे…!!
१९७८ साली औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर दगाबाज शरद पवार यांनी शिवसेना या हिंदुत्ववादी राजकीय पक्षाच्या मदतीने सतत सतरा वर्षे मराठवाड्यातील आंबेडकरी जनतेवर अन्याय,अत्याचार करीत, शासकीय वरदहस्ताने आंबेडकरी चळवळ मोडून काढण्यासाठी हातातील सत्तेचा गैरवापर करून आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न केला. हा अनुभव आहे. अदमास घेण्याची आणि पुरावा मागण्याची गरज नाही….!!
अशा दगाबाज राजकीय पुढा-याच्या विरोधात आंबेडकरी विचारवंतांनी रोखठोक भुमिका घेतली पाहिजे अशी सामान्य आंबेडकरी समुहाची मागणी आहे…!!
१९९२-९३ साली किनवट विधानसभा मतदारसंघातून भारिप च्या तिकिटावर निवडून आलेल्या भिमराव केराम या आमदाराला ५ कोटी रुपयात विकतं घेऊन आंबेडकरी राजकारण संपवण्याचा.किनवट पॅटर्न मोडून काढण्यासाठी दगा फटका करणा-या शरद पवार या दगाबाज राजकीय पुढा-याच्या विरोधात आंबेडकरी समाजहितासाठी आंबेडकरी विचारवंतांनी रोखठोक भुमिका घेतली पाहिजे अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे…!!
निवडून येण्याची क्षमता नसतांना रामदास आठवले यांना महाराष्ट्र राज्य कॅबिनेट समाजकल्याण मंत्रीपद देऊन आंबेडकरी समुहाच्या बोकांडी नाकर्ते नेतृत्व बसवून आंबेडकरी राजकीय चळवळीत लाचारांची पेरणी करुन आंबेडकरी राजकीय चळवळ दिशाहीन करण्याचं षडयंत्र रचणाऱ्या शरद पवार यांच्या विरोधात आंबेडकरी विचारवंतांनी रोखठोक भुमिका घेतली पाहिजे अशी आंबेडकरी समुहाची मागणी आहे…!!
१९९५ साली महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघाने स्वबळावर विधानसभेच्या निवडणुकीत साडेसतरा लाख मते घेतली त्याच परिणाम असा झाला की, कॉंग्रेस पक्ष सत्तेबाहेर फेकल्या गेला आणि शिवसेना, भाजपचे युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ झाले. आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष मजबूत होतं आहे याची जाणीव होताच दगाबाज शरद पवार यांनी १९९६ साली रिपब्लिकन ऐक्याची खेळी करून ९ तरुणांना मुंबई मध्ये उपोषणाला बसवून आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र रचले आणि आंबेडकरी राजकारण कमकुवत केले त्या दगाबाज शरद पवार यांच्या विरोधात आंबेडकरी विचारवंतांनी रोखठोक भुमिका घेतली पाहिजे अशी आंबेडकरी समाज बांधवांची अपेक्षा आहे…!!
१९९९ साली विधानसभेच्या निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाचे तीन आमदार विधानसभेत आणि एक आमदार विधान परिषदेत असतांना महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत दोन कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री आणि एक आमदार एक महामंडळ अध्यक्ष असतांना मंत्री तथा आमदार यांना सत्तेची लालूच दाखवून भारिप बहुजन महासंघ हा आंबेडकरी विचाराचा राजकीय पक्ष कटकारस्थान करुन संपवणा-या दगाबाज राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्वाच्या विरोधात आंबेडकरी विचारवंतांनी रोखठोक भुमिका घेतली पाहिजे अशी आंबेडकरी समुहाची अपेक्षा आहे…!!
खैरलांजी आणि नितीन आगे तथा महाराष्ट्रातील अनेक जातीय अत्याचार प्रकरणात जातियवादी भुमिका घेत आरोपींना सजामुक्त करण्यासाठी, गृहमंत्रालयाचा गैरवापर,सत्तेचा गैरवापर आणि खैरलांजी गावाला तंटामुक्त पुरस्कार देऊन आंबेडकरी समूहाला खजील करण्याचा प्रयत्न करणा-या राजकीय पक्ष आणि पुढा-याच्या विरोधात आंबेडकरी विचारवंतांनी रोखठोक भुमिका का घेऊ नये.??
आम्ही भुमिका घेतली तर आमच्या अंगलट येईल अशी भीती बाळगण्याचे काही एक कारण नाही मित्रांनो एम. बी. पाटील या भिवंडीच्या लेखकाने ४६० पानाचे दगाबाज शरद पवार हे पुस्तक लिहून लेखी पुरावे तयार केले आहेत, तुम्ही भुमिका घेता का.?? एवढाच प्रश्न शिल्लक आहे…!!
आंबेडकरी विचारवंतांसाठी खूप मोठी संधी चालून आली आहे, लेखी पुरावे तयार आहेत तेव्हा समाजहितासाठी भुमिका घ्या एवढीचं समाजातील सामान्य जनतेची अपेक्षा आहे…!!