• 23
  • 2 minutes read

तोतया निनावी खोट्या शिपायाच्या नावे आय. टी. सेल करतोय “वंचित” खुलासे..

तोतया निनावी खोट्या शिपायाच्या नावे आय. टी. सेल करतोय “वंचित” खुलासे..

तोतया निनावी खोट्या शिपायाच्या नावे आय. टी. सेल करतोय “वंचित” खुलासे…

ओबीसी योद्धा उपोषणकर्ता Adv. मंगेश ससाणे यांचा आरोप

सह्याद्री अतिथी गृहावर 9 jully च्या आरक्षण संदर्भातील सर्वपक्षीय मिटिंग मध्ये काय घडलं -adv मंगेश ससाणे 

सह्याद्री अतिथीगृह वर ओबीसी व मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय तोडगा काढण्यासाठी मिटिंग आयोजित करण्यात आली होती.
या मिटिंग ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , देवेंद्र फडणवीस , ओबीसी नेते कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेब,मा.धनंजय मुंडे, दादा साहेब भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,मा.सदाभाऊ खोत, बच्चू कडू, सुरेश धस, कपिल पाटील, मा.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, ऍड मंगेश ससाणे, मृणाल ढोले पाटील, रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ… इत्यादी नेते उपस्थित होते ( मनोज जारंगे यांच्या तर्फे कोणीही नव्हते )
या मिटिंग मध्ये “सगे सोयरे” या draft नोटिफिकेशन वर भरपूर चर्चा झाली, भुजबळ साहेबांनी रिटायर्ड जस्टीस रिबेलो, माजी AG अधिवक्ता श्रीहरी अणे आणि आणखी दोन कायदेतज्ञ् यांचे ओपिनियन समोर ठेवले , संगे सोयरे कसे कायद्याच्या चौकातीत नाही व आरक्षण, घटना विरोधात आहे याच्यावर अनेक जणांनी मतं मांडली.
राज्यत चालललेय जातीयवाद बद्दल बाळासाहेब आंबेडकर, सुरेश धस, प्रवीण दरेकर, प्रकाश शेंडगे यांनी काळजी व्यक्त केली.
मी” सगे सोयरे” हा शब्द कुठल्या श्रुती, स्मृति, उपनिशद, धार्मिक ग्रन्थ, पर्सनल law( हिंदू law, मुस्लिम Law, Christen Law ) मध्ये नाही, तसेच कोणत्याही कायद्याच्या dictionary मध्ये, न्याय निवड्यात नाही असं सांगितलं.
हिंदू संस्कृती ही पितृसत्तकआहे असं सांगितलं,
सोयरे म्हणजे लग्न नाते संबंधतून होणारे नातेवाईक असतात. असे जर सोयऱ्या ना दाखले दिले तर अंतर जातीय, अंतर धार्मिक विवाह केलेले पण सोयरे होतील अशी माहिती दिली. महाराष्ट्र मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पासून अनेक न्यायाधीश, कायदेतज्ञ् झाले असून, जर सगे सोयरे सारखं शब्द कायद्यात आला महाराष्ट्र देशपुढे कोणता आदर्श ठेवणार असं.. सांगितलं.
त्या नंतर अजितदादा पवार यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना याबाबत भूमिका विचारली, त्यावर बाळासाहेब आंबेडकर यांनि जे पक्ष गैरहजर आहेत त्यान्च्याकडून लेखी म्हणणं घ्या असं सुचवलं. तसेच.. हा कायद SC, ST साठी पण लागू आहे, आणि जर असा शब्द आला तर Sc, St चा विरोध होईल.आणि कोर्टात टिकणार नाही.
यातून जर Sc, ST ना बाहेर काढल तर. कोर्टात यावर चर्चा विनिमय होऊ शकतो असं सांगितलं. त्यावर भुजबळ साहेबांनी मध्यस्ती करत सुचवलं कि असं एक कायद्यातून एक समाजाला बाहेर काढलं आणि एक ला ठेवला तर चुकीचा मेसेज जाईल.त्यावर बाळासाहेब म्हणाले कि Sc, St च्या बाबत कोर्टाचे निकाल आहेत. Sc St आरक्षण इंटर चेंजेबल नाही.
याला शिक्षक भरती आमदार कपिल पाटील यांनी दुजोरा दिला व यातून Vj, Nt ना पण वागळावे असं सुचवलं.
यावर प्रकाश अण्णा शेडगे यांनी जोरदार हरकत घेतली व हा कायदा Sc, St, Vj, Nt, OBc साठी असून कायद्यातुन असं एखादी जात बाहेर काढता येऊ शकत नाही असं ठाम पणे सांगितलं.
खरंतर इथे तंत्रिक, कायदेशीर विषयावर उहपोह चालला होता. त्यामुळे कोणाची भूमिका कोना विरोधात आहे असं मला नाही बोलायचं.

तर एकंदरीत यामध्ये संगे सोयरे बाबतीत कायदेशीर खल, चर्चा झाली. व मुख्यमंत्री, अजितदादा, फडणवीस साहेब यांनी सर्वाना साठी सांगितलं कि याबाबत सरकार अधिकृत रित्या कायदे तज्ज्ञ कडून अभिप्राय मागवेल, मगच निर्णय होईल.

तर ही सर्व चर्चा आणि सत्य परिस्थिती त्या दिवशी ची आहे.
मी या बैठकीत ओबीसी अभ्यासक, उपोषण कर्ता म्हणून उपस्थित होतो, ओबीसी ची कायदेशीर बाजू मी 12-15 मिनिट मंडली.
मला जी गोष्ट जाणवली त्याबद्दल मी दुसऱयाच दिवशी 10 jully ला फेसबुक वर व्हिडीओ मार्फत व्यक्त झालो. मला ओबीसी म्हणून एकटे सोडल्याची , असुरक्षित पणाची भावना वाटली, ती मी बोलून दाखवली.
जे काय मी सांगितलं ते 1000% सत्य आहे. उपस्थित कोणाला पण, आणि सगळ्यांत महत्वाचे बाळासाहेब आंबेडकर यांना पण विचारवं.. कि काय घडलं.

राहिला प्रश्न पक्षचे मीडिया सेल वाल्यांच्या पोस्ट, व्हिडीओ बद्दल… तर अरे भावांनो तुमच ते काम आहे. तुम्ही इमाने इतबारे करता ते बरोबर आहे. पण अधी माहिती घ्या.
काय घडलं होत
एक पोस्ट फिरतीय शिपायाच्या नावाची.कि तो हजर होता, तर मला काही प्रश्न आहेत
1) तिथे मंत्र्यांच्या OSD, PA ना प्रवेश नव्हता तर.. शिपाई ला कसं आत मध्ये घेतलं??
2) सदर चा शिपाई कुठे कार्यरत आहे.. त्याचं नावं, नंबर का नाही दिला??
3) या शिपायाने सांगावं कि सुरीवातीला कोण आलं होत? बाळासाहेब पोर्च मध्ये 3 नेत्याबरोबर बसले होते ते नेते कोण?
4) सुरेश धस यांनी काय भूमिका घेतली?
5) अशोक चव्हाण यांनी कोर्टाबाबत काय भूमिका घेतली
6) SEBC आरक्षण 10% बाबत काय चर्चा झाली??
7) धनंजय मुंडे काय बोलले
8) शिपाई म्हणतोय मनोज जारंगे यांची माणसं होती, तर कोण होते त्यान्च्या तर्फे..??

त्या शिपायाने नाहीतर त्याच्या नावाने पोस्ट केलेल्याने उत्तर द्यावीत.

पक्षाचे मीडिया सेल असे याच्या त्याच्या नावाने पोस्ट बनवण्यात पटाईत असतात.हे समजायला कोण दूध खुळं नाही.
आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी माझा विडिओ आल्य नंतर 11 jully ला स्पष्ट भूमिका मांडली कि’ सगे सोयरे ‘ घटनेच्या चौकातीत बसत नाही. ओबीसी चे आणि मराठ समाजाचे ताट वेगळे ठेवा ” या भूमिकेचे मी ओबीसी समाजातर्फे मनःपूर्वक स्वागत केलें आहे.त्यानीं मंडल आयोग लागू करण्यासाठी भुजबळ साहेब, जनार्दन पाटील यांचे बरोबर खूप संघर्ष केला आहे, याबाबत आम्ही ओबीसी नेहमीच उपकार विसरनार नाही.आताही त्यांनी ओबीसी चे घटनात्मक अधिकार संरक्षण करण्यासाठी भूमिका घेतली याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांचे लक्ष लक्ष आभार 🙏
प्रकाशजी आंबेडकर यांच्या सारख्या कायदे तज्ज्ञची गरज सध्य परिस्थिती मध्ये ओबीसी ना खूप आहे.
ओबीसी या बाबत नेहमीच उपकृत राहतील.

खरतर मी काल फेसबुक live करून याबाबत खुलासा केला होता.पण.. या शिपाई ( मीडिया सेल ) ची पोस्ट जास्तच फिरायला लागली.
त्यामुळे हा पोस्ट प्रपंच.

या प्रकरणाला मी विराम देतोय, चूक भूल द्यावी घ्यावी

आपला उपोषणकर्ता ओबीसी योद्धा ऍड मंगेश ससाणे 🙏

जय ज्योती ! जय भीम ! जय संविधान ! जय ओबीसी !

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *