• 50
  • 1 minute read

आम्ही कोल्हापुरी आम्ही शाहू चे समता रक्षक

आम्ही कोल्हापुरी आम्ही शाहू चे समता रक्षक

आम्ही कोल्हापुरी
आम्ही शाहू चे समता रक्षक

विशाळगड गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा राहावा यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिव-शाहू सद्भावना रॅलीमध्ये आदरणीय खासदार श्रीमंत शाहू छत्रपतीव आमदार सतेज पाटील सहभागी.

आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, सत्यजित पाटील सरुडकर आदींची रॅलीमध्ये उपस्थिती होती.

हिंसाचाराची घटना अतिशय दुर्दैवी असून त्याचा निषेध करण्यासाठी तसेच समाजात बंधुभाव जोपासण्याचे आवाहन करणाऱ्या या रॅलीमध्ये लाखों नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

राजर्षी छत्रपती महाराज यांच्या समतेच्या संदेशावरील कोल्हापूरकरांचा विश्र्वास यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

या रॅलीमध्ये शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे व्ही.बी.पाटील, ए. वाय. पाटील, आर.के. पोवार, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राहुल पाटील, राजेंद्र लाटकर, पद्मजा तिवले, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, रामराजे कुपेकर, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

0Shares

Related post

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक : जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध करणार मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश…
“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *