• 117
  • 2 minutes read

मुघलांचे दरबारी गुलाम असणाऱ्या ब्राह्मणांना छ. शिवाजी महाराजांचे राजे होणेच आवडले नव्हते, त्यामुळेच राज्याभिषेकापासूनच शिवशाहीला विरोध…!

मुघलांचे दरबारी गुलाम असणाऱ्या ब्राह्मणांना छ. शिवाजी महाराजांचे राजे होणेच आवडले नव्हते, त्यामुळेच राज्याभिषेकापासूनच शिवशाहीला विरोध…!

छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या अवमान व अपमानाची चीड शिवप्रेमींना का येत नाही…?

         छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान व अपमान इथली ब्राह्मणी व्यवस्था नेहमीच का करीत आहे ? हा अतिशय गंभीर असा प्रश्न आहे. पण राजांना आपले आराध्य दैवत मानणाऱ्यांना तो कधीच का पडला नाही ? हा दुसरा अन तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. पण हे प्रश्न पडले नाहीत, पडत नाहीत हेच दुर्दैव या महाराष्ट्राचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अन् त्यांनी स्थापन केलेल्या शिवशाहीचे आहे. ब्राह्मणी व्यवस्थेने जितका छळ छ.शिवाजी महाराज, संभाजी राजे अन् छत्रपतींच्या गादीचा केला , तितका चुकूनच कुणाचा केला असेल. अन यांचे स्पष्ट पुरावे ही आहेत. सुरुवात राज्याभिषेकापासूनच होते. राजांचे क्षत्रिय असण्यालाच या ब्राह्मणी धर्माने अक्षेप घेतला. अन ज्या वेळी राज्याभिषेक केला, त्यावेळी तो डाव्या पायाच्या अंगठ्याने तिलक लावून केला. शिवाजी महाराजांचे राजे होणे अथवा छ्त्रपती होणे हेच या ब्राह्मणी व्यवस्थेला आवडलेले नव्हते. त्यामुळेच त्यांनी राज्याभिषेकाला विरोध केलेला आहे. याची चीड शिवप्रेमींना का येत नाही ? हा ही एक प्रश्न आहे.

            छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यावेळी चोहो बाजूला परकीय मुस्लिम बादशहाची राजवट होती व मराठा सरदार त्या सत्तेचे शिलेदार होते, तर विदेशी ब्राह्मण परकीय मुघल राजवटीच्या दरबारात तानसेन, बिरबल या नांवाने राजपाट सांभाळत होते. ब्राह्मण या परकीय सत्तेत अतिशय मजेत, सत्तेचा मेवा – मलिदा खात असताना त्या सत्ते विरुध्द कुणी उभा राहत असेल तर त्यास विरोध हे मलिदा खाणारे करणारच. अन् त्यांनी तो केलाच. पुढे शिवशाहीत घुसखोरी करुन कलह निर्माण केले. संभाजी राजेंना त्रास दिला, फितुरी करुन पकडून दिले, राज्य कारभाराच्या नावे पेशवाई आणून शिवशाहीच नष्ट केली. राजधान्या बदलल्या, छत्रपतींच्या गादीवरील वारसदारांना कैद केले, त्यांचा छळ केला. शिव समाधीच्या नावाने निधी जमा करुन तो फस्त केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरु केलेल्या शिवजयंतीला पर्याय म्हणून गणेशोत्सव सुरु केला. अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यात उभारण्यात येणाऱ्या जगातील पहिल्या पुतळ्याला जाहीरपणे विरोध केला. ज्या दिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तो दिवस या ब्राह्मणी व्यवस्थेने काळा दिवस म्हणून साजरा केला. हे उघड दिसत आहे. पण महाराजांच्या या अवमान व अपमानाचा बदला हा महाराष्ट्र कधीच घेताना दिसला नाही. दिसत नाहीं. हे सत्य आहे.

         तेच अन् तसेच आज ही सुरु आहे. राजकोट किल्ल्यावर छ. शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा हा राजांच्या आरमाराचा इतिहास जगाला नव्याने सांगण्यासाठी नव्हेतर लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी उभारला होता. इतका मोठा पुतळा उभारण्यासाठी किमान ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना तो ७ महिन्यात उभारला गेला. यासाठी घाईगर्दीत कंत्राट दिले, स्ट्रक्चरल ऑडिटची कसलीच पर्वा केली नाही. बर पुतळा उभाण्यासाठी लागणारे धन आपल्याच संघोट्याकडे जाईल याची काळजी घेतल्याने अनुभवहिन शिल्पकार निवडला गेला. पुतळा उभारला. निवडणुका झाल्या. दारूण पराभव पदरात पडला अन् पुतळा ही कोसळला. तो उभारण्यात जी घाई व हलगर्जीपणा केला होता, त्यामुळे तो कोसळणार होताच, यात शंकाच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेमापोटी व त्यांचा आरमाराचा इतिहास जगाला सांगण्यासाठी हा पुतळा उभारला गेला असता तर तो कोसळलाच नसता….!
        छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे, शिवशाही गाडून पेशवाई स्थापन करणारे, शिवजयंतीला गणेशोत्सव साजरा करुन आव्हान देणारे, छत्रपतींच्या समाधीच्या नावाने पैसे गोळा करुन ते फस्त करणारे अन् महाराजांच्या पुण्यातील पहिल्या पुतळ्याला ही जाहीर विरोध करणारी टिळक, सावरकरी ब्राह्मण्यवादी व्यवस्था छत्रपतींच्या प्रेमापोटी काही करेल, असे वाटणारे मूर्खाच्या नंदनवनात रमणारे धर्मांध किडे आहेत. हे आता समजायला हरकत नाही.
        आता माफीनामे सुरु आहेत. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हे प्रकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. छत्रपतींना मानणारी जनता छत्रपतींचा अवमान व अपमान करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवेल, यात तिळमात्र शंका नाही. पण हा अवमान व अपमान करणाऱ्यांचे काय ? इतका मोठा पुतळा उभा करण्याचे व त्याच्या देखभालीचे कंत्राट दोन फुटाच्या मुर्त्या बनविणाऱ्या जयदीप आपटे याला कसे मिळाले ? कुणी दिले ? नौदलाच्या प्रशासनाला हे कंत्राट देताना जरा ही लाजलज्जा वाटली नाही का ? पुतळा इतक्या घाईत उभा करण्याच्या “डील”मध्ये कोण कोण सामिल होते व कुणाकुणाचा काय रोल होता ? हे राज्यातील जनतेला कळायला हवे. त्यादृष्टीने या प्रकरणाचा तपास व्हायला हवा, ही मागणी शिवप्रेमीची असायला हवी. पण ती होताना ही दिसत नाही.
        याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला मुख्य गुन्हेगार जयदीप आपटे फरार आहे. या प्रकरणात त्याची कसून तपासणी होईल, तेव्हा तो या विषया वरसंदर्भात जे काही ओकेल त्या ओकरीतून खरे गुन्हेगार बाहेर पडतील. पण खऱ्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी हा तपास दाबून ही टाकला जावू शकतो ? ही शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिवप्रेमी जनतेने या संदर्भात सतर्क राहण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी ही आपली भूमिका ओळखून या प्रकरणी तपास कार्य योग्य त्या दिशेने होतेय का ? यावर नजर ठेवली पाहिजे. तरच खरे आरोपी जनतेसमोर येतील. अन् नजर ठेवली नाहीतर हे छत्रपतींचा अवमान व अपमान करणारे पुन्हा राज्याचा सत्तेवर येतील.
          शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाच्या पानांवर शिव छ्त्रपती अन् त्यांचे वारसदार व शिवशाहीवरील छळांच्या उभ्या महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या अतोनात कहाण्या आहेत. तर आज ही संघ, भाजप व संघ परिवारात असे शेकडो बदमाश आहेत की ते महाराजांचा अवमान व अपमान करण्याची संधी सोडत नाहीत. हे नीच कृत्य करणाऱ्यांना भाजपमध्ये अधिक संधी मिळते. ही वस्तुस्थिती आहे. बाकी राजकोट किल्ला प्रकरणी मोदीने जी काही अन् ज्या प्रकारे सावरकरांचा उदोउदो करून माफी मागितली आहे, तो प्रकार ही छत्रपतींचा अपमान करणारीच आहे. छत्रपती व त्यांच्या गादीवरील वारसदारांची बदनामी करण्याची कुठलीच कसर सावरकरांनी ही सोडलेली नाही. त्यामुळे मोदींची ही माफी जखमेवर चोळलेले मीठ आहे .
         बाकी छत्रपतींचा जगातील पहिला पुतळा उभा करण्याचा निर्णय राजर्षी शाहू महाराजांनी घेतल्यानंतर पुण्यातील टिळकधारी ब्राह्मणांनी जो अकांडतांडव केले होते. तो अतिशय भयंकर आहे. १९ नोव्हेंबर १९२१ रोजी या पुतळ्याचे भूमिपूजन झाले, तेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. तर अनावरण समारंभ १६ जून १९२८ रोजी ५६५ सन्माननीय पाहुण्याच्या उपस्थितीत पार पडला. या दिवशी या ब्राह्मणी व्यवस्थेने पुण्यात कडकडीत बंद पाळून जाहीर विरोध केला. रस्त्यांवर काळया रंगाच्या रांगोळ्या काढल्या. अतिशय नीच अन् खालच्या पातळीवर जाऊन हा विरोध केला गेला. हा इतिहास सर्व इतका स्पष्ट असताना या राज्यातील जनता अन् छत्रपतींचा गादीचे वारसदार ही भाजपच्या वळचणीला जावून बसतात. ही फारच खेदजनक व लाजिरवाणी गोष्ट आहे.
—————————————–
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी ,महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…
एससी/एसटी आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण लाभार्थीच्या एकतेला छेद देणारे कट कारस्थान…!

एससी/एसटी आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे आरक्षण लाभार्थीच्या एकतेला छेद देणारे कट कारस्थान…!

         अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून हिंदू – दलित वोट बँक तयार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *