पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे महासंचालक श्री सुनील वारे ( IRAS ) यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम बार्टी फेलोशिप व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आला.
सुमारे पाच वर्षांपासून रखडलेल्या फेलोशिपचा विषय सातत्यपूर्व पाठपुरावा करून , तसेच आंदोलकांची योग्य बाजू राज्य सरकारकडे मांडल्यामुळेच सुमारे 2000 संशोधकांचा फेलोशिप चा विषय मार्गी लागला असल्याने यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सुनील वारे यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज भारतीय मुख्यालयात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.
” विद्यार्थी हा सर्व समाजाचा कणा असून त्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकी शिवाय तो संशोधनाला न्याय देऊ शकत नाही तसेच संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी त्याला सर्व आवश्यक त्या सुविधा मिळायला हव्यात ही बाब शासनाला ज्ञात असल्याने विद्यार्थ्यांचा कोट्यावधी रुपयांचा फेलोशिपचा प्रश्न मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ,यांनी विशेष लक्ष घालून सोडवलेला आहे या कामात मा. सचिव सामाजिक न्याय यांनीही महत्वाची भुमिका बजावल्याने प्रश्न सुटण्यास मदत झाली. दरम्यान पुढील काळात देखील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका बार्टी प्रशासनाची राहील ” असे देखील सुनिल वारे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी या आंदोलनामध्ये सहयोग करणाऱ्या रिपब्लिकन युवा मोर्चा सह अनेक आंबेडकरी पक्ष संघटनांचा देखील सन्मान व त्यांचे प्रति कृतज्ञता विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त करण्यात आली.
” संशोधक विद्यार्थी हा समाजाच्या प्रगतीचा मानदंड असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व तर्हेचे प्रयत्न केले जातील. ” असे मत राहुल डंबाळे यांनी वक्त केले.
यावेळी पुणे , नागपूर , औरंगाबाद , नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी प्रतिनिधी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.