पवित्र वैशाख तथा बुद्ध पौर्णिमा – सुरेंद्र डी. खरात

पवित्र वैशाख तथा बुद्ध पौर्णिमा – सुरेंद्र डी. खरात

विश्ववंदनीय भगवान बुद्धांना त्रिवार वंदन!

सुरेंद्र डी. खरात
९८२०९८०५४९
 
अनिच्च्या वत सडः खारा, उप्पादवय- धम्मिनो उप्पजित्वा निरूझन्ति तेसं खूपसमो सुखो
 
सर्वच संस्कार अनित्य आहेत. उत्पन्न होऊन विनाश पावणे हा त्यांचा स्वभावधर्म आहे. या परिवर्तनशील संस्कारातुन मुक्त होणे हेच परम सुख (निर्वाण) आहे.
 
    महाकारूणी तथागत भगवान बुच्दांचा जन्म, विवाह, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण या सर्व घटनांचा योग पौर्णिमेच्या दिवशी निसर्गतःच साधला जाऊन सम्यक संबुध्दांच्या जीवन चरित्राने या विश्वाला संस्कारातील अनित्य वोधच दिला आहे. सुखात व दुःखात मनाची समता साधन्याचा धम्मोपदेश दिला आहे. दुःख झाले म्हणुन खचुन जाऊ नका, आनंद झाला म्हणुन हुरळून जाऊ नका, गरिबी आली म्हणून लाजू नका, श्रीमंती आली म्हणुन माजू नका. पराजयाने नाउमेद होऊ नका, विजयाने बेभान होऊ नका. जग हे परिवर्तनीय आहे. कुशल परिवर्तनाच्या दिशेने प्रयत्न चालु ठेवा, सुख आणि दुःख ही जीवनाची दोन चाके आहेत. ही जीवनाची गाडी परमसुखाच्या निर्वाणाच्या दिशेन घेऊन जाणारा श्रेष्ठ असा जीवनमार्ग या विश्वातील सर्व मानवाला आपल्या अखंड त्यागाने प्रखर ज्ञानसाधनेने भगवान बुद्धांनी दिला.
     एप्रिल महिन्यात १४ तारखेला बाबासाहेबांचा जयंती उत्सव अत्त्यंत उत्साहात, जोमात सुरू होतो. मिरवणुक, ढोल-ताशा, डी.जे., फटाक्यांची आताषवाजी असं या जयंतीला जंगी स्वरूप आलेल असत. पुढे अगदी जून महिन्यांपर्यंत कार्यक्रमांची रेलचेल चालूच असते. १९५० साली बाबासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरूणांना तुम्ही माझा वाढदिवस करण्या ऐवजी बुद्धांची जयंती साजरी करा असं बाबासाहेब महणाले होते. इतकेच नव्हें तर पुण्याच्या देहु रोड येथे वांचलेल्या मंदीरात त्यांनी बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याची सुचना तेथील लोकांना केली. वैशाख पौर्णिमे दिनी भगवान बुध्दांची जयंती येत असते. हा दिवस बुद्ध अनुयायांसाठी अत्यंत संवदेनशीलपणे विचार करायला लावणारा आहे. भगवान बुद्धांचा जन्म आणि त्यांचे महापरिनिर्वाण यांचा योग साधणान्या या पवित्र वैशाख पौर्णिमेचा मंगल दिन सर्वांनी एकत्रित येऊन धम्माचरणात व्यतित करावा.
      इंडोनेशियात होणाऱ्या बुद्ध महोत्सवाची इंडोनेशियातील वालिया या बेटावर सव्वा महिना चालणाऱ्या बुद्ध महोत्सवामध्ये तेथील बौद्ध उपासक तसेच भिख्खुगण वेगवेगळ्या विहारांत आणि विहारांच्या मैदानात सामुहिक बुद्धवंदना करतात.
    अमेरिकतेतील पिट्सबर्गमध्ये सलग सहा दिवस तेथील बुद्धविहारांमध्ये धम्माची शिकवण देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन या कार्यक्रमाला विविध बौद्ध राष्ट्रांतील महनिय व्यक्तिंना पाचारण करण्यात येते. धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्या व्यक्तिंनी आपले आयुष्य खर्ची घातले त्यांचा या कार्यक्रमांत यथोचित गौरव करण्याचे नियोोजन होते.
     पवित्र वैशाख पौर्णिमे दिनी सामुहिक बुद्ध बंदनेला आपण देखील व्यापक स्वरूप ट्यायला हवे. फक्त त्रिसरण पंचशीलच नव्हें तर संपूर्ण बुद्धवंदना एका सुरात बौद्ध उपासकांनी व पुज्य भिक्खु संघानी मिळून शेकडोंच्या, हजारांच्या समुहाने एकत्रित येऊन विहारांमध्ये, विहारांच्या मैदानामध्ये वस्तीमध्ये, बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे पुतळे किंवा मुर्त्या जिथे आहेत तसेच चैत्य स्तुपांमध्ये घ्यायला हव्यात. यातुन खच्या सांस्कृतिक वातावरणाची निर्मिती होईल. वंदनेचे महत्व व महात्म्य लोकांना कळु लागेल. बुद्धवंदना म्हणजे बुद्धवचनं आहेत. त्यात धम्मसंस्कार आहे. जीवन संस्काराची ती खरीखुरी कविता आहे. प्रत्येक साहित्यिक आणि कवींनी देखील महाबुद्धवंदनेच्या कार्यक्रमास गती देण्याच काम करायला हवं.
     राजा शुध्दोदनाच्या राजघराण्यात माता महामायेच्या पोटी वैशाख पौर्णिमा इ.स.पूर्व ५६३ रोजी लिंबुनी वनामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. वयाच्या २९ व्या वर्षी मानवाची कलहातून आणि दुःखातुन मुक्तता करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग करून परीव्रजा घेतली. सहा वर्षे अनेक ज्ञानमार्गांचा शोध घेत अखिल मानव समाजाच्या दुःखमुक्तीचे तत्वज्ञान सिद्धार्थ गौतमाने स्वयं प्रयत्नाने निर्माण केले. अर्थात वयाच्या ३५व्या वर्षी त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला. परंतु या ज्ञानाचा लोकांमध्ये जाऊन मी प्रचार करावयाचा की नाही, अशा विचारात सिद्धार्थ गौतम असताना ब्रम्हसहंपती ब्रम्हलोक सोडून बुद्धांकडे आले. आणि नम्रतेने हात जोडून म्हणाले आपण आता सिद्धार्थ गौतम नसुन भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुध्दत्व प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात आपण या जगताला अंधकारातुन मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता. सन्मार्गापासुन चुकत असलेल्या मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासुन आपण कसे विन्मुक होऊ शकता. अर्थात धर्मग्लानी आलेल्या या मानव समाजाला सत् धर्माची शिकवण देऊन त्याला आधःपतनापासुन वागविण्याची विनंती ब्रम्हसहंपतीने भगवान बुद्धांना केली. भगवान बुद्धांनी ब्रम्हसहंपतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सत् धम्माची शिकवण जगाला देण्याचा निश्चय केला, ब्रम्हसहंपती सोबत भगवान बुध्दांचा हा संवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथामध्ये आला आहे.
      प्रो.पी. लक्ष्मी नरसु यांच्या ‘बौद्धधर्माचा सार’ या पुस्तकातील विश्लेषणानुसार आपल्या परंपरागत मान्यतांना सोडून मी दिलेला नवा मार्ग है लोक स्विकारतील का? हा मार्ग आचरणात आणतील का? असे प्रश्न भगवान बुद्धांच्या मनात निर्माण झाले होते. परंतु सर्व जगाच्या विषयी त्यांच्या मनात असलेल्या करूणेमुळे या महाकारूणीकाने आपल्या धर्माची शिकवण अखंड मानव समाजाला देण्याचा निश्चय केला आणि या दृढनिश्चयाने ते बनारसच्या दिशेने निघाले. वाटेत त्यांना त्यांचा पूर्व परिचित उपेका नावाचा गमतीदार नग्न जैनसाधु भेटला भगवान बुद्धांची भव्य आनंदी मुद्रा पाहुन तो प्रभावित झाला, त्याने प्रश्न केला “तुझा गुरू कोण? ज्याच्या मार्गदर्शनामुळे तु संसाराचा त्याग केलास? तथागतांनी उत्तर दिले माझा कोणीही गुरू नाही. त्या योग्यतेचा कोणी नाही, मी सम्यक सम्बुद्ध आहे.
        बनारस येथील इसिपतनच्या मृगदाय वनात उदक रामपुचाच्या पाच शिष्यांना ते भेटले. हे पाच लोक सिद्धार्थ गौतमांनी तपश्चर्येचा मार्ग मधूनच सोडल्याने सिद्धार्थ गौतमांबर नाराज होते. त्यांनी नाखुशीने का होईना पण त्यांचे स्वागत केले. या पंचगर्षीय परीव्राजकांनी भगवान बुद्धांना त्यांच्या गौतम या गोत्र नावाने संबोधिले, त्यावर भगवान बुध्द म्हणाले मला माझ्या गोत्र नावाने संबोधु नका, कारण ज्याने अर्हत पद प्राप्त केले आहे, त्याला या पध्दतीने संबोधिने ही उद्दाम व निष्काळजीपणाची रीत आहे. लोक मला सन्मानाची वागणूक देवोत अगर न देवोल तरी माझे मन शांत आहे. परंतु जो सर्व प्राणीमात्राला सारख्याच
     करूणेने पाहतो त्याला दुसन्यांनी त्याच्या व्यक्तिगत नावाने संबोधने सभ्यपणाचे नाही. बुद्धांनी सर्व जगाला मुक्त केले, मुले जशी त्याच्या पित्त्याला आदराने वागवतात तसे बुद्धांना आदर्शने वागविले पाहिजे. हे पाच परिव्राजक बुद्धांचे पहिले प्रवचन अर्थात धम्मचक्र प्रवर्तन सुत्त ऐकुन बुद्धांचे पहिले शिष्य झाले. भगवान बुद्धांनी त्यांना धम्माची दिक्षा दिली आणि भिक्खुसंघाची निर्मिती केली.
         ज्ञानप्राप्तीनंतर तथागतांनी सतत ४५ वर्षे प्रचंड भ्रमण करून आपल्या लोककल्याणकारी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. लोकांना दुःखातुन, अज्ञानातून मुक्त करून सज्ञानी करण्याचे कार्य केले. सुनीत नावाचा भंगी, रूपाली न्हावी. सुप्रबुद्ध महारोगी, आम्रपाली गणीका, अंगुलीमाल डाकू, अनाथपींडक व्यापारी, जीवक, वाममार्गला जात असणारा यशस् तरूण मुलगा, खोडवळ ब्राम्हण सर्व स्तरांतील लोकांना आपल्या भिक्खुसंपात, उपासक संघात दिक्षीत करून जातीयतेचे निवारण करून समता प्रस्थापित करण्याच सम्यक समाज निर्मितीचं कार्य तथागत भगवान बुद्धांनी अविरतपणे केले. आपल्या प्रवचनांतुन सुत्तातुन अखंड मानव समाजाला संस्कारक्षम दुःखमुक्तीचा विचार दिला. अशा या महाकारूणीक तथागत भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण वयाच्या ऐशीव्या वर्षी नेपाळ जवळील कुशीनगर येथे वैशाख पौर्णिमा इ.स.पूर्व ४८३ रोजी झाले.
      सदर लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुध्द आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथातील ब्रम्हसहंपती आणि भगवान बुद्धांचा संवाद तसेच प्रा.पी. लक्ष्मीनरसु लिखीत बौद्ध धर्माचा सार या धर्म ग्रंथातील ऊपेका आणि पंचवर्गीय परिव्रांजकां सोबतचा भगवंताचा संवाद यातुन आपण तथागत भगवान बुद्धांना संबोधन करताना मग ते संबोधन चर्चेतुन असेल, लेखनातुन अथवा भाषणातून असेल. आपण काही संकेत समजून घेऊया, पवित्र वैशाख पौर्णिमा तथा बुद्ध पौर्णिमे निमित्त या जगन्नाथास, तथागत, सम्यक संबुध्द, तथा विश्ववंदनीय भगवान बुद्धांना त्रिवार वंदन!
 
0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *