- 67
- 1 minute read
महाराष्ट्रातील भ्रम
उपेक्षा वाद आणि ज्ञान व्यवहार
मराठी मनाचे तळ लागत नाहीत. मराठी मन भ्रमिष्ट अनेक वेळा बनते .हे भ्रम इथल्या व्यवस्थेची सातत्यपूर्ण निर्मिती असल्याने मराठी माणसाच्या मनाला नितळपणा, विचार राजकारणाची आसक्ती क्वचित असलेली दिसून येते. मराठी माणसाचे मन अभिमान उस्फूर्तता आणि गटांतर्गत हितसंबंधांचे गुप्त राजकारण हा मराठी मनाचा खास वैशिष्ट्यपूर्ण दुर्गुण आहे. मराठी माणूस कृतीशील सातत्यपूर्ण संघटित राहून नवनिर्माणात व्यस्त राहणे. हे त्याला निरंतर जमत नाही. म्हणून तात्कालीकता, उस्फूर्तता, प्रसंगिकता, प्रदर्शनीयता यामध्ये मराठी माणसाचे वर्तन सहज निरीकक्षणास येते. मराठी माणसाच्या या जनमनाच्या मशागतीसाठी तब्बल 100 वर्षाचा स्वातंत्र्य पूर्वव उत्तर कालखंडातील हा प्रबोधनाचा इतिहास तपासला तर खूप धक्कादायक निष्कर्ष हाती येतात.
उपेक्षा नावाचे महाराष्ट्राचे मनोवर्तन खूप क्लेशकारक व अनेक पिढ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम करणारे ठरले आहे . ते आजही तसेच आहे .हे मनोवर्तन सतत विकसित होत नाही. उपेक्षा, तुच्छता ,अवेलना ही मानसिकता जातीव्यवस्थेच्या परिणीत मानसिक अवस्थेतून पुढे आलेली आहे. उपेक्षेची मूळ बीजे अनेक आहेत. जाती अंतर्गत व्यवहारात स्वयं सर्व सुरक्षितता हवी. अशी मागणी महाराष्ट्र हा स्वाभाविकपणे इतर जनजातींच्या सर्व व्यवहाराची सतत उपेक्षा करणे . हे नित्य वर्तन राहिले आहे. तसेच तात्कालिक उपयुक्तता अधीरपणे स्वीकारत असतो, आणि त्यामुळे उपेक्षेचे भवताल वातावरण सतत इथे रोज नवे निर्माण होत राहते. पण या मानसिक वर्तनाची ऐतिहासिकता त्याची कारणे आणि भोगाव लागणारा विपरीत परिणाम हा अभ्यासणे खूप आवश्यक आहे.
महाराष्ट्राचे जन् मन भक्ती आणि भगत या भोवती फिरते आहे भक्तीला दर्शनीयता आहे भक्तीला उत्साह आहे. भक्तीला पंथाचे प्रेम आहे भक्तीला मठ संप्रदायांचा इतिहास आहे. त्यामुळे विचारक प्रबोधक सुधारक आणि मूलतत्त्ववादी धूर्त शास्त्री पंडित आचार्य यांचा ज्ञान व्यवहार संवर्धन करणारी व प्रसारण करनाऱ्या संस्था व त्यांची नियतकालिके मासिके यांच्या वर्तनातील निष्पक्षता विचकता नष्ट होऊन त्यांना भक्ती संप्रदायाचे आणि भगतगिरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भक्तांचा भ्रम हा आपला ज्ञान व्यवहार हा वैश्विक आहे सार्वत्रिक आहे स्वीकार्य आहे असा समज तब्बल 100 वर्षे इथे त्यांनी करून ठेवला आहे त्यामुळे इथे शास्त्रीय आचार्य यांचे भक्तांचे अड्डे आणि त्यांची भगतगिरी ही ग्रामीण महाराष्ट्राला खूप कळालेले आहे असे अद्यापही म्हणता येत नाही.
मराठी माणसाचे मन विचारावर केंद्रित नसते प्रतिक्रिया भावना डावपेच आणि कुरघोड्या यामध्ये व्यस्त असलेला मराठी माणूस विचार शिस्त बाळगत नाही विचारावर प्रेम करत नाही विचार तपासून घेत नाही प्रबोधनाच्या नावाखाली नियतकालिकांनी चालवलेले कपट हिंदुत्व रुजवण्याची राजकारण मराठी मन समजून घेत नाही त्यामुळे हिंदुत्वाचे नवयुवकांचे प्रदेश फौजेच्या स्वरूपात त्यांच्या हाती लागतात आणि हिंदुत्व ही जातीय गटांची लढणारी स्वतःची गुलामी मानसिकता व विषमता मान्य करून अज्ञानाने अस्मितेने लढणारे अनेक युवक सतत निर्माण होत असलेले पुढे येत असलेले दिसून येत आहेत आणि यातच महाराष्ट्राचा ज्ञान व्यवहार वर्तमानातील चालू आहे असा भ्रम पसरवला जातो आहे.
उपेक्षेचे वर वर्णन केले आहे उपेक्षा बंदिस्त व्यवस्थेत खूप मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे करता येत होती ती वर्णव्यवस्थेचे फायदे त्या जातीने त्या त्या कालखंडात घेतलेले आहेत उपेक्षेचे बळी जोहार आणि चांडाळ या सर्व जाती सतत जात आले आहेत हा इतिहास असून सुद्धा उपेक्षेचे विश्लेषण उपेक्षेचे राजकारण ज्ञान व्यवहारातील उपेक्षेचे वापरले जाणारे शस्त्र बहुजन महाराष्ट्र वाचन करणारा महाराष्ट्र विचार करणारा नवयुवक महाराष्ट्र हे समजावून कधी घेईल? हाच मोठा प्रश्न आहे.
उपेक्षा ही वर्णव्यवस्थेतील छुपी तुच्छता वृत्ती आहे ती क्षमता ज्ञान प्रतिभा सृजन आणि समृद्धी इतरांची नाकारणारी अशी एक खूप प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचे भवतालचे वर्तन दिसत नाही. पण सर्व माध्यम व्यवहारात हे सर्वात जास्त चालू आहे.
बरे झाले जातीव्यवस्थेचे मडके तंत्रज्ञानाच्या डिस्कवर फुटले फुटू लागले आहे त्यामुळे बंदिस्तता आणि तिचे कवच तिचा अधिकार हा आता नष्ट जवळपास झाला आहे त्यामुळे व्यक्ती वर्ग आणि त्यांची श्रम उपेक्षा करणारा हा महाराष्ट्र देशी ज्ञान साक्षर व विचार साक्षर स्वतःला समजणारा आचार्य व शास्त्रींचा भक्त गट सर्व विद्यापीठातून सर्व प्रकाशन संस्थांच्या मधून सर्व वर्तमानपत्रांच्या मधून गुप्तपणे उघडपणे कार्यरत नित्य राहिला आहे त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाषण स्पर्धांना व्हॉइस ऑफ फसवणीस असे विषय विद्यापीठे हातात घेतात आणि जन मन भरकटवतात हे उपेक्षे उत्तर ज्ञानोत्तर असंतोष निर्माणचे नारेतिव आहे.
महाराष्ट्रात स्व कथन करणाऱ्या लेखन करणाऱ्या आपलीच प्रसार माध्यमे असलेल्या नियतकालिके मासिके व विद्यापीठे अंक यांच्यामधील या भक्तांची मानसिकता खूप निंदनीय ज्ञान व्यवहारालाअशोभनीय अशी आहे. मराठीत तब्बल 30 एक वर्षे नियतकालेखांचे वाचन करून मराठी मनाचा एक कपच्याही विकसित होत नाही नवज्ञान प्राप्त होत नाही भक्तीची शक्ती मात्र त्या सांप्रदायिक विचाराची वाढत राहते उदा ते साधना असो नवभारत असो समाज प्रबोधन पत्रिका असो यांच्या मधून प्रबोधित मनाचा शोध घ्यायला हवा किती युवकांचे विचार विश्व विकसित झाले त्यांना विचार करता आला ते लिहू लागले बोलू लागले नवीन संशोधकीय काही निष्कर्ष मराठी मनाच्या पुढे मांडू लागले हे जर तपासले तर मराठी ज्ञान व्यवहार जातीय अंतर्गत वर्तुळात फिरणारा आणि भक्त आणि भगतगिरी करणाऱ्यांचा हा व्यवहार आहे असे निष्कर्ष इच्छा नसताना दोषाचा स्वीकार करत नोंदवावे लागतात आणि हे वास्तव पुन्हा हे नाकारणार हेही खरेचे आहे.
मराठी विचारी मन घडवणे त्यासाठी निष्पक्षता नवनीतता विचारशीलता आणि सार्वत्रिक स्वीकाराची अपरिहार्यता हे निकष न लावता खुशमष्करे जातीय न्यातीबांधव यांच्याच टिळकवंत ते शास्त्री पंथ यामध्ये फिरणारे प्रसिद्धीचे वारे हे महाराष्ट्राला विचार वाटतात ही पण आणखीन एक दुर्दैव आहे हा ज्ञानाचा भाग आहे मराठी माणसाला ज्ञान विश्लेषण संप्रेषण निर्मिती ज्ञानाच्या विचार पद्धती ज्ञानाची सर्वकालिक महती आणि ज्ञान ही उपेक्षा विरहित स्वीकाराची मौलिक गोष्ट असते हे मराठी माणसाचे मनच अद्याप तयार न झाल्याने मराठी माणसाचा विचार व्यवहार खुजा
कायम राहिला आहे. याचे कारण सभोवताली लिहिणारे इतरांना भक्त म्हणून पंथात येणार असाल तरच स्वीकारतो भगत गिरी करणार असाल तरच फुटकळ चार अक्षरे प्रगतीक दिसण्यासाठी उदारमतवादी असण्यासाठी किती प्रकाशित करू अशी उपकारी विचारवस्था मराठीने कित्येक दशके लेखक प्रकाशक वाचक या स्तरावर अशी जपली आहे त्यामुळे मराठीचे उपेक्षेचे प्रदेश अनेक प्रकारचे अनेक क्षेत्रांमध्ये सतत वाढत चालले आहे मराठी माणसाच्या अस्तित्व ही उपेक्षीची स्वतःचीच एक शेवट गोष्ट होत राहणार आहे त्याला विचार प्रियता आणि न्यायप्रियता बंधुता यांच्या वाटा महत्त्वाच्या वाटत नाहीत उलट आचार्य पंथी शास्त्री पंथी टिळक पंथी सावरकर पंथी आणि नवे असंख्य संप्रदायाचे गुरुजी महाराज साधू आणि साध्वी यांच्या मोहात अडकलेला महाराष्ट्र हा थक्क करणारा बेधडक विचार करू शकत नाही विचाराच्या संघर्षासाठी सिद्ध होत नाही न्याती सुधारक आणि न्याती शास्त्री आचार्य यांच्या भक्ती गीत रमलेला महाराष्ट्राचा ज्ञान व्यवहार विचार व्यवहार हा परिपूर्ण तर अजिबात नाही तो फक्त
आपल्या नायकाला मोठा करण्याचा प्रयत्न तो सतत करतो आहे कोणताही नायक काळाच्या मर्यादा घेऊन येतो काळाच्या तत्कालीन समस्यांच्या वर स्वतः विचार करत कृतीही करत असतो परंतु सर्वकालिक व सर्व सिद्ध आकलन आणि कार्य कुठल्याच नायकाच्या हातून अपेक्षित ठेवणे हे चुकीचे असते मात्र आपल्या नायकाच्या चरित्रात लेखनात अखिल विश्वाच्या दर्शनीक चिंतनाचा सगळा अंश आहे असे दाखवत कथन करीत परिसंवाद घेत परिषदा घेत फिरणारे अनेक भक्त महाराष्ट्रात आता तयार झाले आहेत त्यांना उंच रेषेसमोर छोटी रेषा उभी करून उंच उंच आलेख तयार करण्याचा मोह सतत होतो आहे आणि त्यांचा हा मोह हेच मराठी माणसाचे विचार भ्रम वाढत आहेत हे पण मराठी माणसाला कळत नाही हा एक शिक्षणाच्या पराभवाची ती खूण आहे असे मानावे लागते.
मुळात उपेक्षा आणि ज्ञानाचा खूप संबंध असतो. हा नीट समजावून घेणे महत्त्वाचे आहे .ज्ञान बनते कसे? ज्ञान कोण विश्लेषण पद्धतीने पुढे मांडत असते? हे पण तपासने आवश्यक असते. जेव्हासमस्यांच्या कारणांचा तसेच विषयाच्या विचाराचा विचार केला जातो तेव्हा विश्लेषणाच्या स्वरूपाचे ज्ञान कारणांचेशोध लागून ते मिळते
नित्य संशोधनातून शोधघेतले जातात .व तर्क मांडला जातो .विश्लेषण केले जाते .निष्कर्ष काही नोंदवले जातात. तेव्हा काही ज्ञानाचा अंश तयार होतो. मुळात ज्ञान ही समाजसापेक्ष त्या सर्वांच्या अस्तित्व सार्वभौम कथन करणारी मौलिक शक्ती असते .ते अक्षर सामर्थ्य असते. तो ज्ञान आणि अस्तित्व, ज्ञान आणि सत्य, ज्ञान आणि अहिंसा, ज्ञान आणि न्याय, ज्ञान आणि व्यवस्थाचे संचालन, ज्ञान आणि नव मानवी मूल्यांचा प्र स्थापनेचा प्रयत्न ,ज्ञान आणि समस्या, ज्ञान आणि उपायोजना, ज्ञान आणि अमूर्त विचार प्रक्रिया अंतिमतः सतत सत्याच्या सर्वकालिक व सापेक्ष शोधासाठी विचार प्रकट करत राहणे. यात ज्ञानाचा निर्माणाचा अनुभव घेता येतो. किंबहुना ते तसे तयार होते.या असंख्य उद्भव व निर्माण इच्छाशक्तीच्या आधारे ज्ञानाचा प्रदेश साकारता येतो ज्ञान अक्षरातच असते असे नाही कृती शहाणपण वर्तन स्मरण आणि अविष्कार ही सुद्धा ज्ञानाची विविध रूपे आहेत ज्ञानाला अमूर्ततेचा आणि वर्तनाचा दोन प्रकारचाच आधार कायम असतो पण हे सर्व अतीत आणि अतर्क यामध्ये बंदिस्त करण्याची माणसाला खोड असते. त्यामुळे अक्षरे ही सूक्ष्म वाचन केले नाही तर ती वाचकाला अतिताकडे नेहतात. तसेच क्लिष्टतेच्या कारणावरून अक्षरे तर्का पर्यंत पोहोच वी.
इतरांचे सुद्धा मौलिक श्रम असतात हे नाकारणारा बहुसंख्यांक मराठी माणसांचा मनो व्यवहार आजही बदललेला नाही त्याला स्वयं वर्तनाची श्रेष्ठता हा रोग कायम जडलेला आहे त्यामुळे तो श्रमनिष्ठा सेवा नवनिर्माण याला महत्त्व देत नाही त्यातून त्याचा जीवनप्रवास गतिशील सक्षम अर्थकारणाकडे सुद्धा जात नाही. हे सगळे विचार पराभवाचे विचार अभावाचे दोष आहेत उपेक्षेने सह प्रवास करता येतो इतका खर्च आचरण व्यवहार करणारा मराठी माणूस पृथ्वीवर दुसरा कुठे नसेल . ही बंदिस्त गाव गाड्याची व शहरातील कॉलनी गल्ल्या यांच्यामधील कृतक प्रभुत्व मानसिकता इथल्या शास्त्री पंडित आचार्यांचीच कृपा ती पुढे चालत आलेली आहे आणि त्यातूनच मराठी माणसाचे मन संकीर्ण तेत सतत अडकून पडले आहे आध्यात्मिकता तिच्या मठपंथ संप्रदायाची समृद्धी आणि मालकी आणि त्याच व्यवहारातील प्रतिष्ठेचे खोटे शहाणपण प्राप्त करण्यात मराठी माणूस देव देवळे ते सार्वजनिक संस्था ग्रंथालय पण ते सर्व प्रकारचे शैक्षणिक संस्था सहकार संस्था यांच्यामध्ये तो गुरफटला आहे त्यातच अंतिम जीवनाचे उद्दिष्ट आहे असे विद्यापीठ ते शाळा ते सडक शाळा या सर्व स्तरावर वर्तन करणारा मराठी माणूस हा असा अवचित उदात्त तर कधीच नित्य ज्ञानग्राहीनाही .
इतरांच्या प्रती उपेक्षा फसवणूक आणि छोटे भक्त गटातील रम मान वर्तन हेच मराठी माणसाच्या ज्ञानाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील पाऊलवाटा ठरले आहेत ते ज्ञानाचे महामार्ग होणे खूप दूर आहे त्यासाठी चालावे लागेल त्यासाठी मनाची विशालता निष्पक्षता ज्ञानासाठीचा अथक साधनेचा प्रयत्न आणि सर्वकालिक सर्वसापेक्षा सत्यशोधाची अभिवृत्ति ही निर्माण करण्याशिवाय हे सर्व साध्य होणे नाही.
पंथ ,स्कूल, पीठ यांच्यातील राज कारणात 24 तास व्यस्त असलेला मराठी माणूस ज्ञान नसल्यामुळेच सतत फसवला जातो आहे इथे फसवणूक मोठे होते आहे
जाती व्यक्ती गट यांना वापरा आणि उपेक्षित दूरवर ठेवा असला इथल्या सत्तेचा अनुयायार्थ प्रस्थापित केलेल्या सर्व सत्ताधीशांच्या विकृत मानसिक तेथून महाराष्ट्र पुढे चाललेला आहे त्यामुळे अस्पृश्यता उत्तर कालखंड उपेक्षेचा कालखंड म्हणून स्वीकारावा लागतो उपेक्षा उत्तर कालखंड हा पुनरपी आर्थिक दुबळेपणाचा कालखंड ते प्रस्थापित सर्व जाती गटांसाठी तयार करून पाहत आहेत त्यामुळे आर्थिक बहिष्कृतता आणि दुर्बलता निर्माण करणे हे त्यांच्या उपेक्षा उत्तर कालखंडातील ज्ञानाचे षडयंत्र राजकारण ते रचत पुढे चालले आहेत त्यालाच ते व्हॉइस ऑफ फसवणूक म्हणत आहेत आणि ती फसवणूक घटनेची मतांची स्वातंत्र्याची सार्वभौम जीवन जगण्याच्या इतरांच्या अधिकाराची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर स्वातंत्र्याचा अर्थ नित्य संघर्ष हा समजावून घेऊन पुढे जाण्याशिवाय स्वतंत्र भारतातील नागरिकांना दुसरा मार्ग आज दिसत नाही स्वातंत्र्य ही ज्ञानाची निर्मिती आहे स्वातंत्र्याचे रक्षण हे ज्ञानाचे उद्दिष्ट असले पाहिजे स्वातंत्र्याच्या भवताल निर्माणासाठी फसवणुकीच्या समकालीन सर्व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक ,धार्मिक क्षेत्रात उपेक्षा उत्तर परिणाम न करता काम करत राहणे हा दृढनिश्चय करावा लागेल तरच आचार्य शास्त्री ते पंथीय अपेक्षा राजकारणाच्या संकीर्ण व्यवहारापासून मुक्तता होऊ शकते. यासाठी समकालीन महाराष्ट्राचा अक्षर व्यवहार मुद्रण व्यवहार हा अतिशय सांस्कृतिक राजकीय गुन्हेगारीने लपेटलेला आहे. तो समजावून घेतल्याशिवाय पुढे महाराष्ट्राला जाता येणार नाही. अन्यथा यांच्या सांस्कृतिक अड्यांच्या मध्ये सतत असंतोषाचे जनक आचार्य आणि शास्त्री आणि गुरुजी यांच्या भक्त व भगत यांनी लिहिलेली मराठी भाषिकवाचकाला वेगवेगळ्या परिभाषेत नवी कथानखे रच ले ली वाचावी लागतील .आणि यालाच अर्धशतकाचे प्रबोधन म्हणून ते तुम्ही आम्ही सर्वजण तीर्थ घेत राहू. पुन्हा ते
तीर्थ हा ज्ञान व विचार भ्रम आहे. हे उपेक्षा उत्तर कालखंडातल्या एक प्रकारचे विषय यांच्या आकलना नंतर कळेल असे वाटून राहते .तो दिवस सर्व प्रकारच्या जीवन क्षेत्रातील व्यवस्था व मूल्य
विस्फोटामुळे जवळ आला आहे. हे निश्चित आहे.
शिवाजी राउत
सातारा
दिनाक 13 ऑगस्ट 25 वेळ 7.32