न्यायालयाने कडक भाषेत सुनावल्यामुळे सरकारने तातडीची प्रक्रिया करित जीआर काढला; ज्यामुळे, राज्य सरकार आणि आंदोलन या दोघांची पत राखली गेली, असे सांगत, मराठा आरक्षण आंदोलन जीवंत ठेवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, असे स्पष्ट प्रतिपादन ऍड. डॉ. सुरेश माने यांनी केले.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन दुहेरी स्वरूपाचे असून एका बाजूला श्रीमंत मराठा नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करायची आणि दुसऱ्या बाजूला गरीब मराठा आंदोलनासोबत ठेवून मराठा – ओबीसी दरी वाढवून सत्ताधाऱ्यांना मदत करायची, असा थेट आरोप ही ऍड. डॉ. सुरेश माने यांनी 3 Ways Media शी बोलताना केला