महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न केल्याने महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून निफाड तालुक्यानंतर कळवण तालुक्यात शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर व घरांवर काळे झेंडे लावायला सुरुवात केली आहे यासाठी शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे मोती नाना पाटील यांनी गावोगावी जनजागृती सुरू केली आहे कळवण तालुक्यात सर्वप्रथम बेजेतील शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष देविदास अण्णा पवार यांनी आपल्या घरावर घरासमोर व
शेतात काळा झेंडा लावून शासनाचा निषेध नोंदवला व कळवण तालुक्यात झेंडे लावण्यास सुरुवात केली देविदास पवार यांनी सांगितले की विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये शेतकऱ्यांचे वीस हजार रुपये शेअर्स नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत पडून आहेत त्या शेअरच्या रकमा शेतकऱ्यांना तात्काळ परत कराव्यात किंवा त्या शेअरच्या रकमेवर व्याज द्यावे
कळवण तालुक्यामध्ये बेज बरोबर भेंडी येथे मनोज रौंदळ, मुळाने येथील धनराज महाले, रवींद्र महाले ,अशोक महाले, सईबाई रौंदळ, आशाबाई रौंदळ भेंडी,निवाने संदीप आहेर रवींद्र आहेर, मीराबाई आहेर ,उषाताई आहेर, यांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावून राज्य शासनाचा निषेध नोंदवला आहे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जातून मुक्त करावे असे यावेळी थकबाकीदार शेतकऱ्यांनी सांगितले आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केलेली सक्तीची वसुली तात्काळ बंद करावी व शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावर नावे लावण्याचे तात्काळ थांबविण्यात यावे असे भगवान बोराडे यांनी सांगितले