• 51
  • 1 minute read

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली २०२९ ला सत्तेत आल्यानंतर अदानी/अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू: हर्षवर्धन सपकाळ.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली २०२९ ला सत्तेत आल्यानंतर अदानी/अंबानींच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू: हर्षवर्धन सपकाळ.

लोकशाही, कामगार व भूमिपुत्रांच्या हक्कासाठी राहुल गांधींचा संघर्ष, राहुल गांधी हेच देशातील जनतेचा आशेचा किरण.

परवडणारी घरे मुद्यावर काँग्रेस कार्यालय टिळक भवन मध्ये घर हक्क परिषद संपन्न.

प्रदेश काँग्रेस शिक्षक विभाग आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

मुंबई, दि. १२ ऑक्टोबर २०२५

        ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती ब्रिटिश सरकारपेक्षा प्रचंड वाढली, त्यावेळी ब्रिटिश सरकारने ती कंपनीच ताब्यात घेतली. लष्कराला तेल देण्यास तेल कंपन्यांनी नकार दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय घेतला तसेच बँकांचे राष्ट्रीयीकरणही केले. आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२९ ला सत्तेत आल्यानंतर अदानी व अंबानीच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करू असा दृढनिश्चय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.

      काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार कुमार केतकर,प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी, रमेश भुतेकर, गोपाळ झवेरी, श्रीपाद लोटलीकर, शिशिर ढवळे, सुकुमार दामले, गोविंदराव मोहिते, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, सदानंद सावंत, विजय कुलकर्णी, संतोष सावंत, शैलेश सावंत, सचिन परब, आशिष शिंदे, ज्ञानेश्वर शेळके, यशवंत राणे, गिरीश अष्टेकर, अरुण पावसकर, प्रविण पालव, अशोक कुलकर्णी, अनिल महाडिक, संजय मुंज, जयेश शिगवण, कोटीयन, मीनल पवार, दिनेश राणे, विद्या चव्हाण, मिलिंड रानडे, दिपक भालेराव आदी उपस्थित होते.

      यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशाची लोकशाही, गरीब, कामगार व भूमिपुत्राच्या हक्कांसाठी राहुल गांधी लढत आहेत, राहुल गांधी हेच देशात आशेचा किरण असून जनतेचा त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.मुंबई सारख्या शहरात घर खरेदी करणे सर्वसामान्य लोकांच्या हाताबाहेर गेले आहे, सरकार मुंबईतील जमिनी अदानीला विकत आहे आणि सर्वसामान्य जनतेला परवडणारी घरे मिळाली पाहिजे यासाठी काम करणे गरजेचे आहे. घराचे छप्पर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटीबद्ध आहेत, घरांसाठी तुम्ही भूमिका ठरवा काँग्रेस तुमच्या पाठीशी असेल असा विश्वासही हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
यावेळी सर्व मान्यवरांनी परवडणारी घरे या विषयावर संबोधन करत भाजपा सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली.

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभाग आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडला. राज्यभरातून आलेल्या आदर्श शिक्षकांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आ. साजिद खान पठाण, शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनावणे, कार्याध्यक्ष प्रकाश तायडे, सचिन दुर्गाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशराज पारखी यांच्यासह राज्यभरातील शिक्षक उपस्थित होते.

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *