• 10
  • 1 minute read

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर येथे कास्ट्राईब कर्मचारी संघटना (नागपूर शाखा) तर्फे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठ मुख्यालयातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती तैलचित्राला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. शिरीष उपाध्ये (संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशुविज्ञान), डॉ. नितीन कुरकुरे (संचालक संशोधन), डॉ. सचिन बोन्डे (संचालक विस्तार शिक्षण), डॉ. भूषण रामटेके (अधिष्ठाता निम्न शिक्षण), श्रीमती मनिषा शेंडे (नियंत्रक), ईजि. प्रमोद तायडे (विद्यापीठ अभियंता) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच डॉ. जयंत कोरडे, डॉ. नरेश नंदेश्वर, डॉ. अजय गावंडे, डॉ. वकार खान, डॉ. अतुल ढोक, डॉ. संजय गोडबोले, दिनेश पाटील, डॉ. गिरीधर शेंडे, डॉ. महेश जावळे, डॉ. प्रज्ञेय ताकसांडे (अध्यक्ष, कास्टट्राइब मपमविवि कर्मचारी संघटना), डॉ. गीतांजली ढुमे, रामराव किर्तने, अजय खुटाटे, निरज कुरळकर, जालिंदर गजभारे, प्रवीण बागडे (उपाध्यक्ष, कास्टट्राइब मपमविवि कर्मचारी संघटना), जितेंद्र हातमोडे (सचिव), संतोष बनसोड (कोषाध्यक्ष) यांचीही उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, परीक्षा नियंत्रक कार्यालय तसेच वाहन चालक कक्ष येथेही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या सामाजिक समता, न्याय आणि शिक्षणाच्या तत्वज्ञानाचा गौरव केला.

0Shares

Related post

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप   भारतीय सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत…
पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट पुणे:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘नो डीजे’चा विधायक…

अनुसूचित जाती, अती मागास जातींच्या सर्वसमावेशक, शाश्वत , प्रगतिशील विकासासाठी राज्य सरकारने बजेट चा कायदा अंमलात…

अनुसूचित जाती, अती मागास जातींच्या सर्वसमावेशक, शाश्वत , प्रगतिशील विकासासाठी राज्य सरकारने बजेट चा कायदा अंमलात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *