संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल
साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा,त्याचा आपल्या जीवनात अंगीकार करावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल यांनी केले.जे.के.शाह आदर्श महाविद्यालय, निजामपूर येथे कवी डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांच्या लोक संवादक संत कबीर या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल बोलत होते.
प्रथम लेखक डॉ दिलीप लोखंडे कबिराकार व भाषांतर कार प्रा.डाॅ.अजबराव इंगळे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ सुधाकर जाधव यांनी पुस्तकावर भाष्य करताना सांगितले की, पहिल्यांदाच संत कबीराचे जीवनचरित्र इंग्रजी भाषेत वाचकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यामुळे इंग्रजी भाषिक या ग्रंथाकडे वळतील.पत्रकार रघुवीर खारकर म्हणाले की,संत कबीराचे जीवनचरित्र सर्व सामान्य माणसाला प्रेरणा देणारे आहे,प्रा.डाॅ.किशोर सोनवणे यांनी पुस्तक निर्मिती मागची पार्श्वभूमी विशद केली.प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, संत कबीरांनी त्यांच्या दोह्यातून दिलेला संदेश काल सापेक्ष आहे, समाजपरिवर्तनासाठी उपयोगी आहे, भाषांतरकार प्रा.डॉ.अजबराव इंगळे यांनी सांगितले की, कबीराच्या दोह्याचे इंग्रजी भाषेत भाषांतर करणे अवघड काम आहे परंतु अभ्यासाअंती ते शक्य झाले, यावेळी लेखक डॉ दिलीप लोखंडे कबिराकार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.वसावे यांनी केले.प्रकाशन सोहळ्यास महाविद्यालयाचे प्राध्यापक, इतर कर्मचारी उपस्थित होते.