• 87
  • 2 minutes read

2023 वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित लेखिका

2023 वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित लेखिका

स्त्रियांना अमानवी वागणूक देणाऱ्या देशात मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्त्रियांच्या स्वातंत्र्य आणि सन्मान यांना पायदळी तुडवणाऱ्या देशातील इराणी महिला कैद्यांच्या मुलाखती म्हणजे व्हाइट टॉर्चर.

प्रत्येक स्त्री च्या आयुष्यात संघर्ष असतो.
पण आपण ज्या देशात , समजत राहतो तिथे श्वास घ्यायला दम घुटमळत असेन , आपल्याच स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढावं लागत असेन तर मग जगण्याची इच्छा देखील संपून जाते.आपण त्या हक्कासाठी आवाज वाढवतो म्हणून शिक्षा होते. आपल्या समाज व्यवस्थेबद्दल , अत्याचाराबाबत, सरकार बद्दल बोलले जाते म्हणून अजून शिक्षा होते. आणि

त्याहून वाईट म्हणजे हेच सगळ आपण पुस्तक रुपात , मुलाखती द्वारे जगासमोर मांडायला जातो म्हणून आपली शिक्षा अजून वाढवली जाते.
हा लढा करणारी इराण मधली क्रांतिकारी स्त्री म्हणजे नर्गिस. आजही तिथल्या तुरुंगात एकांतवासाची शिक्षा मोगत आहे. एकांतवास म्हणजे किती भयानक असतो हे ती ह्या पुस्तकात सांगतेय , जिथे कोणाचाच आवाज येत नाही. कोठडीत असलेल्या एका छोट्या खिडकीतून फक्त दिवस रात्र समजण्यापुरता उजेड पडतोय. अंधाऱ्या भिंती. राहण्याची , बाथरूमची सोय नाही. घरच्यांना भेटण्याची परमिशन नाही.
पण ती विचारते की तिची चूक काय ??
निर्दोष असतांनाही तिला ह्या अमानवी वागणूकीला सामोरे जावे लागत आहे. अजूनही.
2023 ला नर्गिसला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.
हा पुरस्कार घ्यायला देखील तिला तिथल्या सरकारने सोडले नाही.
मुद्दा हा आहे की पुस्तक का वाचावे तर..
तिच्या लढ्यासाठी कारण ती लढत आहे अश्या वर्गासाठी जे आजही वाईट हिंसेला बळी पडत आहे.
तिच्या सारख्या असंख्य स्त्रिया आजही निर्दोष असताना अतिशय क्रूर हिंसेला , शारीरिक मानसिक त्रासाला , छळाला सामोरे जात आहे.
तरी ती खचली नाही.
ती अनेकांची प्रेरणास्थान झाली.
अंधाऱ्या वाटेवर ती अनेकांचा उजेड बनली.
त्यांच्या त्रासाची आपण बरोबरी करूच शकत नाही तरी सगळ्या गोष्टी सोसत त्या आजही संघर्ष करत आहे.
लढत आहे…
स्वतःच्या न्यायासाठी ,
मानवी हकासाठी आणि
स्वातंत्र्यासाठी.

पुस्तक : व्हाईट टॉर्चर
लेखिका : नर्गिस मोहम्मदी

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *