कोणत्याही देशातील बँकिंगक्षेत्र अर्थव्यवस्थारुपी शरीराच्या हृदयासारखे आणि पतपुरवठा रक्तासारखा.
बँकिंग क्षेत्रात सार्वजनिक मालकी प्रभुत्व स्थानी असावी का खाजगी मालकी यावर चर्चा होत असतात. झाल्या देखील पाहिजेत. आपल्यासारख्या गरीब विकसनशील देशांमध्ये बँकिंग क्षेत्रात सार्वजनिक मालकी प्रभुत्वस्थानी असली पाहिजे. भविष्यातील वादळी जागतिक संदर्भात तर नक्कीच.
पण त्यात जोडीला बँकांचे “परफॉर्मन्स पॅरामिटर्स” काय असणार यावर देखील चर्चा झाल्या पाहिजेत. कारण सार्वजनिक बँकांना तोटा होतो (किंवा सर्व सार्वजनिक उपक्रमांना तोटा होतो ) म्हणून एकतर त्यांचे खाजगीकरण करण्याच्या किंवा ते बंद करण्याचा लायकीचे आहेत असे narrative नवउदारमतवादाने आपल्या डोक्यात फिट्ट बसवले आहे. हे narrative पोलिटिकली लोडेड आहे. त्याला काउंटर narratives तयार केली तरच जनकेंद्री राजकारण पुढे जाईल.
प्रॉफिट म्हणजे नक्की काय? फक्त Accounting Profit पवित्र मानायचा की Social Profit देखील मोजायचा? यावर वैचारिक काम करण्याची गरज आहे
पुण्यातील मित्रांनी आवर्जून यावे संजीव चांदोरकर (२२ सप्टेंबर २०25)