• 78
  • 1 minute read

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श…

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श…

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला
बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श …
दिवस बसून राहात नाहीत. बदलतात !

भाकरीवरच्या ‘भीमसही’ची गोष्ट …

गावाकडच्या दुष्काळाला आणि गाववाल्या सरंजामदारांच्या माणुसकीला कंटाळून पोट भरायासाठी रेल्वेने बिनातिकीट दिसेल त्या सायबाच्या हातापाया पडत पुण्यात आलेली आणि मंगळवारपेठ, आरटीओ इकडे झोपड्या टाकून हाताला मिळेल ते काम करणारी दहा पंधरा कुटुंबे लवकरच अतिक्रमण ठरली.

आणि एका सकाळी शासकीय टेम्पो ट्रकने झोपड्या उचकटून चुलीवर शिजत असलेल्या चहासकट, वांगीबटाटा भाजीच्या कालवणासकट , पीठ मळलेल्या काटवट सकट, झोपडीची पोती, काठ्या, चराट दावी आणि त्यांच्या संसारातली दोन दोन जर्मलची भांडी यांची उचलबांगडी करून लक्ष्मीनगरच्या खाणीत ती पंधरा कुटुंबे आणून टाकली.
गावाला कंटाळून आलेल्या, भुकेकंगाल दरिद्री माणसांचे शहरातल्या व्यवस्थेने केलेले हे पहिले ‘वेलकम.’

आंबेडकर जयंतीला रात्रभर जागत निळ्या पताका दोरीला चिकटवताना बोटाला लागलेल्या खळीचा वास. बौद्ध पौर्णिमेला बुद्धासाठी सुजाताने केलेल्या म्हणून आमच्या माय मावश्यांनी केलेल्या तांदळाच्या खिरीचा वास !
आयुष्यातले अनोळखी गोड बाबासाहेबांमूळे माहीत पडले. लहानपणी पाहिलेल्या, अनुभवलेल्या वस्तीतल्या जयंतीतून , गायनपार्टीच्या गाण्यातून बाबासाहेब आमच्यात हळूहळू झिरपत गेले. पुन्हा आयुष्यात पुस्तके आली आणि बाबासाहेब खोलवर रूजले.
मी पाहिलेली जयंती माझी मुले पाहू शकत नाहीत पण ते मी उठायच्या आत हार फुले घेऊन आलेली असतात. बाबासाहेबांना कृतज्ञतेने अभिवादन करतात.
…. त्यांना माहीत आहे, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे !

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *