हिंदू किंवा ब्राम्हण असने म्हणजे हिंदूत्ववादी किंवा ब्राम्हणवादी असने होत नाही. बरेच हिंदू किंवा ब्राम्हण, हिंदूत्ववादी किंवा ब्राम्हणवादी नसून, ते पुरोगामी आहेत.
तसेच, आंबेडकरी असने, अर्थात बौध्द किंवा आंबेडकरी समाजाचा म्हणजे पुर्वीश्रमिच्या महार जातीचा घटक असने, म्हणजे आंबेडकरवादी असने होत नाही. मित्रांनो, आंबेडकरी व आंबेडकरवादी, हे दोन वेगवेगळे शब्द असून, या दोन शब्दांचा एक अर्थ काढू नये किंवा एक अर्थ लावू नये.
आपण तथागत भगवान गौतम बुध्द व बोधिसत्व प.पू.डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. वैचारिक स्पष्टता गरजेची आहे. प्रत्येक आंबेडकरी माणसाला आंबेडकरवादी समजून फसगत करवून घेऊ नये.