‘घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे’; भीमा कोरेगावात सुजात आंबेडकरांचे आवाहन

‘घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे’; भीमा कोरेगावात सुजात आंबेडकरांचे आवाहन

‘घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे’; भीमा कोरेगावात सुजात आंबेडकरांचे आवाहन

भीमा कोरेगाव : “५०० महार शूरवीरांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याशी दिलेला लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो. आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असली तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘शासनकर्ती जमात’ बनण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी आता आंबेडकरी चळवळ खांद्यावर घेऊन सत्ताधारी बना,” असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
 
शौर्य दिनानिमित्त १ जानेवारी २०२६ रोजी विजयस्तंभ परिसरात आयोजित भव्य जाहीर सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
शौर्याचा वारसा आणि भविष्यातील संकल्प
सभेत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ५०० शूरवीरांचा संघर्ष हा केवळ इतिहास नसून ती आपली ताकद आहे. “आज आपण शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि मीडिया अशा सर्वच क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. 
 
मात्र, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण सत्तेच्या चाव्या हाती घेत नाही, तोपर्यंत ही प्रगती अपूर्णच राहील. तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे,” असे त्यांनी उपस्थितांना ठणकावून सांगितले.
 
यावेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला चार प्रमुख संकल्प दिले:
 
🔹 मी आंबेडकरवादी चळवळ माझ्या खांद्यावर घेईन.
 
🔹 मी संविधानिक हक्क आणि अधिकारांचे रक्षण करून न्यायासाठी लढेल.
 
🔹 मी आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना सत्तेत बसवेल.
 
🔹 मी सत्ताधारी बनेल.
 
येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचा संदर्भ देत सुजात आंबेडकर म्हणाले, “या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून निवडून येणारा उमेदवार हा केवळ नावाने नाही, तर विचाराने आंबेडकरवादी असावा. संविधानाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या हातांनाच बळ द्या.”
 
विजयस्तंभ परिसरात जनसागराची उपस्थिती
दुपारी १ वाजता सुरू झालेल्या या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो अनुयायांची उपस्थिती होती. ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण भीमा कोरेगाव परिसर दुमदुमून गेला होता. सभेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयस्तंभ परिसरात प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0Shares

Related post

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…
१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर, धोंडू मानकर, सचिनदादा माळी

१ सप्टेंबरला अभिमन्यु बनून मुंबईत घुसा व मराठा आरक्षणाचा चक्रव्युह तोडूनच बाहेर पडा! – रविन्द्र सोलनकर,…

जरांगेने मुंबई ठप्प करून ओबीसींचे आरक्षण लुबाडले, आता हाके मुंबई ठप्प करून आरक्षण परत मिळवतील! दलित-ओबीसींना…
कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदे शिक्षण आणि करिअरच्या संधींमधील दुवा: लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न

कायदा आणि सायबर-फॉरेन्सिक क्षेत्रातील करिअरच्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख: : लालालजपतराय महाविद्यालयात ‘ब्रिज कोर्स’ संपन्न मुंबई, २९…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *