पुणे क्राईम ब्रँच अल्पवयीन आरोपीची त्याच्या आईच्या उपस्थितीतच चौकशी करणार

पुणे क्राईम ब्रँच अल्पवयीन आरोपीची त्याच्या आईच्या उपस्थितीतच चौकशी करणार

पुणे अल्पवयीन आरोपीच्या आईला न्यायमूर्ती बाल सुधार गृहात नेण्यात आले आहे. जेजे बोर्डाने पुणे पोलिसांना अल्पवयीन आरोपीची २ तास चौकशी करण्याची परवानगी दिली होती. पुणे क्राईम ब्रँच अल्पवयीन आरोपीची त्याच्या आईच्या उपस्थितीतच चौकशी करणार असल्याची माहिती आहे. ब्लड स्वॅप प्रकरणी दोघांची चौकशी होणार आहे. या दोघांना एकमेकांच्या समोर बसवून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यापूर्वी, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल यांनी डॉक्टर अजय तावरे यांच्याशी व्हॉट्सॲप आणि फेसटाइम कॉल तसेच सामान्य कॉलद्वारे बोलले होते. दोघांमध्ये एकूण १४ कॉल्स झाले होते. हे कॉल १९ मे रोजी सकाळी साडे आठ ते १०.४० च्या दरम्यान करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने तपासणासाठी घेण्यात आले होते.

गुन्हे शाखेने अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक केली आहे. तिला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालने आपल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफारच केली नाही तर ते स्वत:च्या रक्ताच्या नमुन्यांशी बदलले, असा आरोप आहे. ही बातमी समोर येताच शिवानी अगरवाल फरार झाल्या होत्या, पुणे पोलिसांना त्याचा शोध घेत त्यांना अटक केली.

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *