• 56
  • 1 minute read

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे 'सायलेन्स झोन'मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘नो डीजे’चा विधायक निर्णय घेतला असतानाही, पुणे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे ससून रुग्णालय परिसरात डीजेचा थरकाप सुरू झाला आहे. या प्रकारामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल डंबाळे यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, या बेजबाबदारपणाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा दिला आहे.
 
प्रशासकीय अकार्यक्षमतेचे वाभाडे
ससून रुग्णालय हे ‘शांतता क्षेत्र’ (Silence Zone) असतानाही या ठिकाणी चक्क १२४ डेसिबल (dB) तीव्रतेने डीजे वाजत आहेत. राहुल डंबाळे यांनी यावर संताप व्यक्त करताना म्हटले की, “आम्ही १२, १३ आणि १४ एप्रिल रोजी सलग तीन दिवस लेखी निवेदने देऊनही पोलिसांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. पोलिसांच्या या अकार्यक्षमतेमुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.”
 
नो डीजे’ चळवळीला हरताळ
मध्यवर्ती जयंती समितीने यंदा ‘नो डीजे’चा ऐतिहासिक निर्णय घेऊन एक नवा आदर्श घालून दिला होता. मात्र, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे काही मोजक्या घटकांनी या सुधारणावादी चळवळीला हरताळ फासला आहे. “बाबासाहेबांचे विचार मांडण्याऐवजी आवाजाचा धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी मोकळे रान का दिले?” असा सवाल डंबाळे यांनी उपस्थित केला आहे.
 
उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
“सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाबाबत दिलेले स्पष्ट आदेश धाब्यावर बसवले जात आहेत. सायलेन्स झोनमध्ये रुग्णांच्या प्रकृतीला धोका निर्माण करणाऱ्या या कृत्याकडे पोलीस डोळेझाक करत आहेत. या सर्व प्रकरणाचे पुरावे आणि पोलिसांकडे केलेली तक्रार घेऊन आम्ही उच्च न्यायालयात ‘अवमान याचिका’ (Contempt Petition) दाखल करणार आहोत,” असे राहुल डंबाळे यांनी स्पष्ट केले.
 
रुग्णांच्या जिवाचा धोका वाढला
ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या रुग्णांसाठी हा १२४ dB चा आवाज अत्यंत घातक आहे. या आवाजामुळे रुग्णांना त्रास झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनावर असेल, असेही डंबाळे यांनी नमूद केले.
 
 
 
 
0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *