• 29
  • 1 minute read

पुनर्विकासाच्या नावाखाली मुख्यमंत्री फडणवीस – अदानी ग्रुप संगणमताने धारावीकरांची फसवणूक करीत आहेत…..!

पुनर्विकासाच्या नावाखाली मुख्यमंत्री फडणवीस – अदानी ग्रुप संगणमताने धारावीकरांची फसवणूक करीत आहेत…..!

सरकार धारावीकरांचा कमी आणि विकासक अदानी ग्रुपचा विचार अधिक करतेय!

         धारावीची ओळख आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी इतकीच नाही, तर देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील एक प्रमुख उपनगर म्हणून ही धारावीची ओळख आशिया खंडात आहे. साधारणतः 150 वर्षांपूर्वी देशात औद्योगिकीकरणाची पायाभरणी झाली, अन त्या वेळेपासून धारावीने आपले योगदान द्यायला सात्यत्याने सुरू केले . शासकीय व प्रशासकीय पातळीवरून कसले ही सहाय्य व मदत नसताना, नियोजनाचा प्रचंड अभाव असताना ही धारावीकर आपले योगदान गेली दीडशे वर्ष देत आलेले आहेत. आजच्या घडीला 20 ते 25 हजार लहान मोठे उद्योग, दुकाने धारावीत असून 2 लाख 50 हजारांपेक्षा अधिक कुशल, अकुशल कामगारांना रोजगार देण्याचे काम एकटी धारावी करीत आहे. वार्षिक उलाढालीच्या संदर्भात बोलायचे , तर हा आकडा 12,000 कोटींच्या आसपास आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी बरोबरच ही ओळख ही धारावीची आहे. अन् ती महत्त्वाची आहे.


          18 व्या शतकात म्हणजे 1730 सालापासून या वसाहतीचा इतिहास सापडतो. मुंबईच्या सात बेटाजवळील मासेमारीचे केंद्र म्हणून धारावीचा उल्लेख साहे. त्याशिवाय धारावी म्हणजे मिनी इंडियाच आहे. मूळ रहिवाशी असलेल्या कोळी लोकांचे कोळीवाडे आज ही आपली ओळख जपून आहेत. तर गुजरातमधील सौराष्ट्रातून आलेल्या कुंभार बांधवांनी या ठिकाणी मातीची भांडी बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. तो व्यवसाय आज ही सुरू आहे. तसेच महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यातून आलेल्या बांधवांनी चर्मोद्योग, हॉटेल व्यवसाय सुरू केले. तर उत्तर भारतातून विशेष करून उत्तर प्रदेशातून आलेल्यांनी गारमेंट, वस्त्रोद्योग सुरू केले. स्थानिक मराठी माणसांनी ही सेवा देणारे उद्योग सुरू केले. या सर्वांवरून एक नजर टाकली तर धारावी मिनी इंडिया आहे, हे निदर्शनास येते.
           बांद्रा कुर्ला कॉम्प्लास हे व्यापारी केंद्र, बांद्रा, माहीम, माटुंगा, शिव, किंग्ज सर्कल, गुरु तेगबाहाद्दुर आणि दादर ही लोकल ट्रेनच्या स्टेशनांनी धारावीच्या औद्योगिकीकरणाला फार मोठा हातभार लावलेला आहे. आपुरी साधन सामुग्री असताना प्रचंड मेहनत करून धारावीकर आपले योगदान देताना दिसतात. या साऱ्या गोष्टीची दखल घेऊन 1985 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी धारावी विकासासाठी विशेष पॅकेज मंजूर केले होते. प्रधानमंत्री ग्रँड प्रोजेक्ट (पीएमजीपी) या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून काँग्रेस सत्तेच्या काळात गृहनिर्माण प्रकल्प ही उभारले गेले. त्या शिवाय 2004 मध्ये काँग्रेस सत्तेच्याच काळात धारावीला विशेष नियोजन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. याच अंतर्गत आज राज्य सरकार अदानी मार्फत धारावी पुनर्वसन प्रकल्प राबवित आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीकरांना सर्व सोयी सुविधायुक्त सदनिकासह व्यापारी गाळे देण्याचा पारदर्शक निर्णय घेण्याची संधी राज्य सरकारकडे होती. पण सरकार धारावीकरांचा कमी आणि विकासक अदानी ग्रुपचा विचार अधिक करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अदानी ग्रुप संगनमत करून पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीकरांची फसवणूक करीत आहेत. हे आता लपून राहिलेले नाही. आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास यशस्वीपणे करण्याची संधी राज्य सरकार व मुख्यमंत्री फडणवीसाकडे होती. ती त्यांनी गमावली आहे. त्यामुळे धारावीकरांच्या विरोधाचा सामना राज्य सरकार व विकासक अदानी ग्रुपला करावा लागत आहे. अदानी हटाव, धारावी बचाव…..!

सूचना : भाग पहिला. उर्वरित दोन भाग 24 व 25 नोव्हेंबर 2026 रोजी.
…………………………………………………………………..

राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी
मुंबई/महाराष्ट्र प्रदेश
तसेच
संयोजक : धारावी बचाव आंदोलन
………………………………………………… ……. … ……

2Shares

Related post

डॉ. नरेंद्र जाधव लिखित ग्रंथद्वयाचे प्रकाशन संपन्न

डॉ. नरेंद्र जाधव लिखित ग्रंथद्वयाचे प्रकाशन संपन्न

डॉ. नरेंद्र जाधव लिखित ग्रंथद्वयाचे प्रकाशन संपन्न मुंबई : जेष्ठ अर्थतज्ज्ञ तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह

५२ संस्कृत उपनिषदे फ़ारसी भाषेत अनुवादित करणारा शहजादा दारा शिकोह            संस्कृत…
शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद

शूद्र उपाधि पर वाद-संवाद सर, मैं शिव बचन यादव प्रयागराज का मूल निवासी हूँ। बुलंदशहर में…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *