• 27
  • 1 minute read

मत विकणारा पशू !

मत विकणारा पशू !

जळगाव शहरातील महाबळ ही उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे.तेथे रस्ते अत्यंत खराब आहेत.दोन्ही प्रभाग मधील नगरसेवक नागरिकांना प्रतिसाद देत नाहीत.अशी माणसे खरेच सेवाभावी असतील कि धंदेवाईक?पांच वर्षे जर या नागरिकांकडे ढुंकूनही पाहात नसतील तर यांना नगरसेवक कसे म्हणायचे?का निवडून द्यायचे? यांचा निवडून येण्याचा हेतू काय असावा?हे मताचे पैसे का देत असतील?पैसे देतात तेंव्हा मतदारांना संशय का येत नाही कि पैसे का देतात? पैसा घेणारे आपण शहाणे आहोत कि मुर्ख?आपण मत विकतो.माणूस मत विकू शकतो,हे आंबेडकरांनी घटनेत कुठेही लिहिले आहे का????
घटना लिहिल्याबद्दल आपण त्यांचे गुणगान गातो आणि मतदान करतांना त्यांच्या विचारांच्या विरोधात कृत्य करतो. *ही त्यांच्या विचारांशी गद्दारी नाही का?
शिवसेना सोडून आसाम मध्ये पळून गेलेले आमदारांना गद्दार म्हणतो,तर आपण मत विकणारे सुद्धा गद्दार आहोतच. पैसे घेऊन मत विकणारा माणूस नव्हे पशू असतो.मत विकणाऱ्या लोकांमुळेच चोर,हरामखोर, भ्रष्टाचारी, गुन्हेगार निवडून येतात.जसे अब्रू विकणाऱ्या लोकांमुळेच समाज बिघडतो तसेच मत विकणाऱ्या लोकांमुळेच लोकशाही बिघडते.
महाराष्ट्रातील, देशातील एकही राजकीय नेता भाषणात बोलत नाही कि,मत विकू नका. तो चांगला, प्रामाणिक माणूस निवडून देण्याचा अधिकार आहे.आणि तोच अधिकार विकून टाकला तर तुम्ही नगरसेवक आमदार खासदार मंत्री ला कामासाठी बोलू शकत नाही.तशी हिंमत करू शकत नाहीत.रस्ता बनवला तर राग येतो.पण बोलत का नाहीत? कारण आपण पैसे घेऊन मिंधे झालेलो असतो.वर मान करून बोलू शकत नाहीत. मी तर ह्या सगळ्या बाबतीत बोलतो, अगदी रूबाबात.मैदानात जाऊन सर्वांसमोर बोलतो. अनेक नागरिक रागात येतात.पण कोपऱ्यात…मैदानात नाही. विचारले तर सांगतात,आपण बोललो आणि त्यांनी गुंड पाठवले तर?आपले काम अडवले तर? जर येथपर्यंत नागरिक भयग्रस्त असतील,नगरसेवकांचे भय बाळगत असतील तर ही अवस्था कोणी आणून ठेवली? तुम्ही आपण मतदारांनीच.जर तुम्ही गुंड गुन्हेगार बदमाष हरामखोर उमेदवारांशी आमनेसामने बोलण्यास घाबरतात तर त्यांच्या विरोधात गुप्त मतदान करून त्याला चीत करू शकतात.मतदान करतांना तो नालायक उमेदवार तेथे पाहू शकत नाही.नवरा मतदान करतांना बायको सुद्धा पाहू शकत नाही.बायको मतदान करतांना नवरा सुद्धा पाहू शकत नाही.तरीही तुम्ही गुंड गुन्हेगार बदमाष हरामखोर उमेदवाराला मतदान करीत असाल तर तुम्हीच नालायक आहात.मी काय, कोणताही देव तुम्हाला वाचवू शकणार नाही.

– शिवराम पाटील

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *