येऊ देत तुझ्या कविता.!!

येऊ देत तुझ्या कविता.!!

म्हणून व्यक्त होतोय कविते बध्दल…
अनेक वेळा प्रयत्न करूनही
ति माझ्या कवितेचा विषय बनू
शकली नाही.
इतक सहज नसतं कुनावरही
कविता लिहीनं
कविता ही कधीच कवितेपूरती 
मर्यादीत नसते
ति नसते नासवनारी इतरांना
स्वकेंद्रीही नसावी व्यक्तीसापेक्ष
स्वत:पुरती मर्यादीत
तिने करावे समुहाचे नेतृत्व
कविता काळ्या दगडावरील
ऊमटून दिसनाऱ्या 
पांढऱ्या रेषेसारखी
आंधाराला चिरत जानारी
प्रकाशाच्या पायवटेवरून स्वत: हा चालता चालता…
समुहालाही घेऊन जाते
उजेडाच्या दिशेने
माणसाच्या मेंदूतील विचाराची 
मशागत करता करता
या प्रवासात ति कोरतेय
विद्रोहाच्या शिल्पाकृतीत
एक एक नव नविन चेहरा
ऊद्याच्या पिढीला दिशा देनारा
ति बनून जाते चळवळी साठी
पांगुळलेल्या पायाला बळ 
देनार ऊर्जास्तोत्र
ते बघा …….
ति निघालीय कधीचीच
प्रज्ञा शिल करुणे ची काठी
टेकवत टेकवत
तथागताच्या दिशेने
निसंकोचपने !
 
जनार्दन मोहिते
0Shares

Related post

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल

भारतीय शेतीक्षेत्र आणि वित्त भांडवल काही दिवसापूर्वी ग्रामीण भागातील एक तरुण मित्राने मेसेंजर मध्ये विचारले “सर…
”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग

”इंडिगो फियास्को” : अभ्यासवर्ग भारतीय विमान वाहतूक सेवेची जगभर नाचक्की झालेल्या “इंडिगो” प्रकरणाचा गाभ्यातील ‘इश्यू’ नेमका…
”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग

”विश्वगुरू” बनण्याचा अभ्यासवर्ग  ‘नेव्हर वेस्ट अ गुड क्रायसिस’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. याचा अर्थ असा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *