मवीआ त वंचितचा प्रवेश व्हावा ही अवघ्या जनतेची ईच्छा मात्र मवीआतील आडमुढ्या धोरणाने तो सहज वाटणारा विषय अधांतरी ठेवत संपृष्टात आणला. भाजप विरोधात भक्कम आघाडी करुन चारीमुंड्या चित करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहली मात्र निराशाच पदरी पडली. इंडीयात नाकारले तेच कमी की काय मवीआत झुलवत ठेवले. संजय राऊत , नाना पचोले , जयंत पाटील हे नेते फक्त मिडीयासमोर बोलत होते आम्हाला आंबेडकरांची गरज आहे मात्र तेवढ्याच पोटतिडकीने मवीआ च्या बैठकीत अधिकृत स्वागताशिवाय काहीही केले नाही. पहील्या भेटीत वंचित तर्फे राज्यकारणी सदस्य प्रदेश उपाध्यक्ष प्रा पुंडकर सर यांना दोन तास बाहेर तिष्ठत ठेवले , पुढच्या बैठकीत चहापानावर चर्चा झाली मात्र वंचित बहुजन आघाडी संदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झाला नाही किंबहुना ठरवलाच नाही. आधी तुमचे ठरवा नंतर आम्यच्या सोबत बोलणी करा हे बाळासाहेबांनी सुचवले. तरीही प्रतीक्षा कायमच राहली. ईतके असुनही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा समारोप कार्यक्रमात हेवेदावे दुर ठेवत बाळासाहेब सहभागी झाले. तरीही दोन-तिन जागेवर पंगत उरकवण्याच्या डावात मवीआ होती. मात्र ३९ कलमी कार्यक्रम , नैतीक जबाबदारी या मुख्य मुद्यांना मवीआ कायमच बगल देत आली. प्रस्थापितां व्यतीरिक्त ओबीसी , गरीब मराठा , मुस्लीम , आदीवासी , अनु. जाती /जमाती यावर मवीआ चे नेते बोलायलाच तयार नव्हते. फक्त एखाद दुसरा नेता मिडीयावर बाळासाहेब सोबत हवे मात्र निर्णायक काहीही होत नव्हते. नेहमीची तिरकी चाल बाळासाहेब आंबेडकरांनी जाणली होती तरीही मोठ्या दिलाने कॉंग्रेसला ७ जागांवर बिनशर्त पाठींबा जाहीर केला. शेवटी बाबासाहेबांनी ज्या लाचारी विरोधात आयुष्यभर लढा उभारला तोच लढा नातवाने कायम ठेवला याचा आम्हाला अभिमान आहे. राजकीय लाभासाठी चळवळ लाचार होवु देणार नाही हे बाळासाहेब आंबेडकरांचे वक्तव्य सारे काही सांगुन गेले. अडगळीत पडलेल्या वंचित समुहास मुख्य प्रवाहात आनणे हीच मुख्य जबाबदारी सांगत परत एकदा ८ जागेवर वंचितांना उमेदवारी दिली. तर नागपुरच्या जागेवर कॉंग्रेसच्या उमेदवारास जाहीर पाठींबा दिला. या व्यतीरीक्त आणखी काय करायला हवे. काही स्वयंघोषीत अती विद्वान बाळासाहेबांनी युती करायला हवी , मात्र हाच प्रश्न हे अक्कलवान मवीआ ला प्रश्न का विचारत नाहीत ? पुलाखालुन बरेच पाणी वाहुन जात आहे. लोकशाही बचाव व स्वाभीमानाच्या लढाईत आता कोण योग्य व अयोग्य हा प्रश्न जनतेच्या दरबारात आहे. योग्यतेच्या व भविष्याच्या लढ्यात योग्य कोण हेच आता जनतेने ठरवावे. प्रस्थीपतांना किती पिढ्यांनी मतदान करावे ???…..आम्ही आता केलेले उपकार प्रस्थ्पितांना आठवुन द्या वर मताची बिदागी परत मागा. भावनिकतेतुन बाहेर पडा रिक्षा चालणारा , चहा विकणारा , शेती करणारा , फुल विकणारा , मजुरी करणारा आज वातानुकुलीत बंगल्यात सत्तेच्या ऐशोआरामत लोळत असतांना यापुढेही सत्ता यांनाच हे जनतेने कुढपर्यंत सहन करावे……