• 159
  • 2 minutes read

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा व घरकाम करणाऱ्या महिला कामगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा व घरकाम करणाऱ्या महिला कामगारांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 रविवार, दि. ३१ मार्च २०२४ :
जागतिक महिला दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून प्रगतशील कोंकण सामाजिक संस्था आणि सावली सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र श्रमिक सभा युनियनच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे मार्गदर्शन शिबिर लोकमान्य नगर, काकासाहेब गाडगीळ मार्ग, टिळक भवन शेजारी, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम केतन कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुण्या वेलनेस कोचच्या छाया परमार, उद्योजिका अर्चना सागरे, समाजसेविका सारिका सकपाळ, रणरागिणी ट्रस्टच्या अध्यक्षा स्नेहा अहिरे उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. घरेलू कामगारांची कामगार म्हणून नोंदणी व्हावी, घरेलू कामगार महामंडळाची वेगळी स्थापना व्हावी, साठ वर्षावरील घरेलू कामगारांना मासिक पेन्शन मिळावी अशा अनेक मुद्द्यावर प्रगतशील कोकण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र श्रमिक सभेचे संस्थापक, सरचिटणीस केतन कदम यांनी मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आशा सेविका, समाजसेविका, अंगणवाडी सेवीका, उद्योजिका अशा अनेक महिलांचा सन्मानपत्र देवून गुणगौरव करण्यात आला. डॉक्टर सीमा नेवरेकर यांनी महिलांच्या आरोग्य विषयक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास प्रगतशील कोंकण सामाजिक संस्थेचे सचिव योगेश कांबळे, अंगणवाडी शिक्षिका पौर्णिमा बनसोडे, सावली सहयोग संस्थेचे अध्यक्ष राजेश घोलप, सचिव विशाल ताम्हणकर, तसेच मान्यवर, कार्यकर्ते, सभासद, शुभेच्छुक, हितचिंतक, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगतशील कोंकण सामाजिक संस्थेचे खजिनदार उमेश मोहिते यांनी केले.

0Shares

Related post

माझा शिवबा रं… माझा राजा रं…. यातला आपलेपणाचा गोडवा काळजात येतो.

माझा शिवबा रं… माझा राजा रं…. यातला आपलेपणाचा गोडवा काळजात येतो.

शीर्षकाला समजून घ्यायला पुस्तकातल्या आशयाची जाण असावी लागते ! प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधनकार यांनी “दगलबाज शिवाजी”…
संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे — लोकशाहीचा आत्मा धोक्यात?

संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे — लोकशाहीचा आत्मा धोक्यात?

संविधान बदलण्याची ‘सुनियोजित ब्ल्यूप्रिंट’! भाजपचे एक पाऊल पुढे – लोकशाहीचा आत्मा धोक्यात? देशाचा राजकीय नकाशा बदलतोय.पण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *