सत्ता,सौंदर्य आणि प्रतिनिधित्व…

सत्ता,सौंदर्य आणि प्रतिनिधित्व…

सत्ता,सौंदर्य आणि प्रतिनिधित्व…

————————————
सौंदर्य स्पर्धां मध्ये दलित,आदिवासी मागासवर्गीय सर्व सामान्य स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे असं राहुल गांधी यांनी म्हणताच भाजपचे तथाकथित संस्कृती रक्षक राहुल गांधी यांच्यावर टीका करू लागलेत.अर्थात राहुल गांधी यांना नेमकं काय म्हणायचंय किंवा ते उपेक्षित समाजाच्या सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधीत्वाबाबत बोलताहेत हे सोयीस्करपणे लपवलं जातंय.संस्कृतीरक्षक काय पण म्हणोत,आपण राहुल गांधी यांच्याशी सहमत आहोत.भाई,त्यात फक्त एकच ऍडीशन करायची म्हणतोय.सौंदर्य,प्रतिनिधित्व यांच्या आपल्या व्याख्या पण बदला ना यार…
इथल्या सौंदर्याच्या कल्पना गोरा रंग,सरळ नाक,गुलाबी गाल यापुढे सरकतच नाहीत.पुरुष असेल तर उंचापुरा,धिप्पाड,ऐटबाज इथच येऊन कोसळतात.अरे या देशाच्या मातीतली सौंदर्याची कोटी कोटी व्हरायटी कधी मोजली मापली जाणार आहे की नाही ?
आणि जिथून ही चर्चा सुरू झाली त्या ऑलिंपिक मधील आपल्या गुणवान निवड / व्यवस्थापन कमिटीचं मानसिक संतुलन कधी मोजलं जाणार ? ते कायम प्रस्थापित जात वर्गाकडेच कसं काय झुकलेलं असतं ? आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इतक्यांदा माती खाऊनही ते मातीतल्या पोरांची निवड का नाही करत ?
असो.राहुल भाई तुम्ही लै परफेक्ट लाईन वर चाललाय.आता एकच काम करा,इथल्या काँग्रेस आणि काँग्रेस वाल्यांना हाच मुद्दा जरा सविस्तर समजावून सांगा.ते कधी दलित,आदिवासी,मागासवर्गीय,अल्पसंख्यांक समाजाला पुरेपूर प्रतिनिधित्व देणार ?
मी ऐकलंय की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या सगळ्या पक्षांची
विधानसभा उमेदवारांची यादी जवळपास फिक्स झालेय.त्यात कोणी एखाद दोन उपेक्षित,वंचित,रस्त्यावरचे भारतीय कार्यकर्ता,कार्यकर्ती दिसतायत का ?

– रवि भिलाणे

0Shares

Related post

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप

महात्मा बसवेश्वर : समता, श्रम आणि मानवतेचा अनंत दीप   भारतीय सामाजिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत…
पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट

पुणे पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट पुणे:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘नो डीजे’चा विधायक…
माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *