• 8
  • 1 minute read

अमेरिकन कॅबिनेट ही धोक्याच्या घेऱ्यात!

अमेरिकन कॅबिनेट ही धोक्याच्या घेऱ्यात!

अमेरिकन कॅबिनेट ही धोक्याच्या घेऱ्यात!

जगाची महासत्ता म्हणून आजही कायम असणाऱ्या अमेरिकेत थेट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाइट हाऊसमध्ये घुसून हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने जगात आज कोणतेही स्थळ सुरक्षित नसल्याचा जणू निर्वाळा दिला आहे. हल्लेखोर ही एक व्यक्ती असल्याचे स्वतः ट्रम्प यांनी म्हटले आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर महासत्तांचा उदय झाला तरी, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे सार्वभौमत्व राखणे ही या महासत्ता असलेल्या देशांचे ही कर्तव्य होते आणि आहे. परंतु, दोनपैकी एक महासत्ता सोविएत रशिया च्या रूपाने जवळपास ४० वर्षांपूर्वी संपुष्टात आली. त्यानंतर अमेरिका आख्ख्या विश्वात आता आपले कोणी काही करू शकत नाही, या मस्तवाल विचाराने सुखावत राहीली आणि जगभर युद्ध निर्माण करित राहीली. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका अधिक आक्रमक झाली. व्हेनेझुएला सारख्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना थेट गुंड टोळ्यांच्या धर्तीवर अपहरण करून डांबण्यात आले. तीच गत इराण ची करावयास निघालेल्या अमेरिकेला जो मुंहतोड जवाब इराण ने दिला; त्यातून हबकलेल्या ट्रम्प यांना अमेरिकेतून विरोध सुरू झाला. परिणामी, ट्रम्प एकाकी पडत गेल्यासारखे वाटत आहेत. आता, युद्धातून बाहेर पडणं ट्रम्पची गरज आहे. मात्र, त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. दरम्यान, काल रात्री त्यांच्या हाइट हाऊस च्या जेवणावळी सुरू असताना झालेल्या हल्ल्यातून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळ सुरक्षित असले तरी, या हल्ल्यामुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन येथील बॉलरूमच्या बाहेर, जिथे ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि वरिष्ठ कॅबिनेट अधिकारी वार्षिक डिनरसाठी उपस्थित होते. यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, संशयित कॅलिफोर्नियाचा असून त्याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आरोपीची ओळख टॉरन्स येथील ३१ वर्षीय कोल टॉमस ॲलन अशी पटवली आहे. दरम्यान, अमेरिकेचे कार्यवाहक ॲटर्नी जनरल टॉड ब्लँच यांनी सांगितले की, कथित हल्लेखोर ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करत होता. 
      अमेरिकेसारख्या लोकशाही व्यवस्थेत राजकीय मतभेद ही सामान्य बाब आहे. परंतु हे मतभेद जेव्हा तीव्र स्वरूप धारण करतात, तेव्हा समाजात तणाव निर्माण होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात आणि त्यानंतरही त्यांच्या धोरणांवरून मोठ्या प्रमाणात समर्थन आणि विरोध दिसून आला आहे. स्थलांतर, अर्थव्यवस्था, आणि परराष्ट्र धोरण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका अनेकदा वादग्रस्त ठरली आहे. अशा पार्श्वभूमीवर, कोणतीही हिंसक घटना घडल्यास ती केवळ एका व्यक्तीच्या धोरणांशी थेट जोडणे धोकादायक ठरू शकते. कारण हिंसाचारामागे अनेक घटक कार्यरत असतात; सामाजिक असंतोष, वैयक्तिक कारणे, मानसिक आरोग्य, आणि व्यापक राजकीय वातावरण. त्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण करताना पुरावे, अधिकृत अहवाल आणि विविध दृष्टिकोन यांचा विचार करणे आवश्यक आहे.
        अलीकडील काळात जगभरात विविध संघर्ष आणि युद्धे सुरू असल्याचे दिसते. मध्यपूर्वेतील तणाव, रशिया-युक्रेन युद्ध, तसेच इतर प्रादेशिक संघर्ष. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची भूमिका अनेकदा चर्चेचा विषय होत वादग्रस्त ठरते. जागतिक महासत्ता म्हणून अमेरिका अनेक ठिकाणी थेट किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असल्याची टीका केली जाते, तर दुसरीकडे ती आंतरराष्ट्रीय स्थैर्य राखण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत, जर एखादी हिंसक घटना घडली, तर काहीजण ती व्यापक राजकीय असंतोषाचा परिणाम असल्याचे नाकारता ही येत नाही. विशेषतः जेव्हा जागतिक स्तरावर तणाव वाढलेला असतो, तेव्हा त्या तणावाचा परिणाम देशांतर्गत वातावरणावरही होऊ शकतो. मात्र, एखाद्या विशिष्ट घटनेमागे थेट कारण म्हणून “अमेरिकेची जागतिक भूमिका” जबाबदार आहे, असा निष्कर्ष ही काढला जातो. अमेरिकेला आता उदयोन्मुख असणाऱ्या महासत्ता पडद्याआडून आव्हान दिले जात आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता हिल्टन मधील हिंसक हल्ल्याचा परिणाम असू शकतो, अशा शक्यता आता चर्चेला येत आहेत.
 
0Shares

Related post

द्वेषपूर्ण राजकारण वाढवण्याचे एक नवीन साधन: ‘पाळीव प्राणी म्हणून डुकरे’

द्वेषपूर्ण राजकारण वाढवण्याचे एक नवीन साधन: ‘पाळीव प्राणी म्हणून डुकरे’ दिल्लीच्या त्रि नगरमध्ये, काही हिंदू कुटुंबांनी…
वंशवाद भारताच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा कशा नष्ट करतो !

वंशवाद भारताच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा कशा नष्ट करतो !

वंशवाद भारताच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा कशा नष्ट करतो ! आजही असे लोक असतील ज्यांना तो काळ आठवत…

हवाना बैठकीत डेटाच्या भांडवलशाही हेराफेरीला पराभूत करण्याचे आवाहन करण्यात आले.

हवाना बैठकीत डेटाच्या भांडवलशाही हेराफेरीला पराभूत करण्याचे आवाहन करण्यात आले. १५-१७ ऑक्टोबर, २०२५ रोजी क्युबातील हवाना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *