• 22
  • 1 minute read

“आदिवासीच्या अंतःकरणातून… आदिवासींच्या अंतःकरणात ! “

“आदिवासीच्या अंतःकरणातून… आदिवासींच्या अंतःकरणात ! “

आदरनीय आदिवासी भगिनींनो तथा बंधुंनो सस्नेह जय बिरसा !
सध्या लोकसभा निवडनुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडनुकीत हिंगोलीचे तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री हेमंत पाटील ह्या यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून युतीच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत.
बंधुनो,
विद्यमान उमेद्वार राजश्री पाटील यांचे पती हिंगोलीचे तत्कालीन वादग्रस्त खासदार हेमंत पाटील यांनी दि. ३ आक्टो २०२३ रोजी आदिवासी समाजाचे MBBS MD असलेले आणि यशवंतराव चव्हाण वैद्यकीय हॉस्पीटल नांदेड येथे डीन असलेले डॉ. श्याम वाकोडे व बंजारा समाजाचे डॉ. राठोड यांना सदर दवाखाण्यातले संडास, मुताऱ्या जबरदस्तीने साफ करायला लावल्या होत्या.
हेमंत पाटील यांनी या दोघा उच्च विद्याविभूषित डॉक्टरांना संडास, मुताऱ्या स्वच्छ करायला लावून अत्यंत घृणास्पद, लांच्छणास्पद कृत्य केले. या दोनही डॉक्टरांसोबत अत्यंत निच, असांसदीय व्यवहार केला.
आदिवासी समाज असो की, कोणताही समाज असो MBBS MD/MS वा तत्सम परीक्षा देवून डॉक्टर झालेल्या समाजात त्यांची एक वेगळी प्रतिष्ठा असते; किंबहुना ही उच्च पदस्थ मंडळी समाजाला प्रेरणादायी असते. अशा उच्चपदाधिकाऱ्यांना इतक्या खालच्या दर्जाची वागणूक देवून हेमंत पाटील यांनी आम्हा आदिवासी / बंजारा समाजाचाच अवमान केला असे आम्ही मानतो.
सदर घटनेबाबत हेमंत पाटील यांचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी म्हणून आदिवासी समाज संघटनांनी नांदेड, हिंगोली, उमरखेड येथे मोर्चे काढले होते मी स्वतः त्या प्रत्येक मोर्चाचा साक्षीदार आहो. अनेक तालुक्यातील आदिवासी संघटनांनी डॉ. श्याम वाकोडे व डॉ. राठोड यांना न्याय मिळावा म्हणून सरकारला निवेदन दिलीत.आदिवासींची आक्रमकता लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने हेमंत पाटील यांचेवर ऍट्रॉसिटी अँक्ट लावला परंतू या गृहमंत्री फडणवीस यांच्या पोलीस प्रशासनाने हेमंत पाटील यांना अटक करण्याची हिंमत अजुनही केली नाही !
यावरून इथले सरकार आदिवासी समाजाच्या भावना ऐकून घेणारे नाही. ते आदिवासी समाज विरोधी असल्याचे आमचे स्पष्ट मत झाले आहे.
परंतू आता !
आता आदिवासी / बंजारा समाजाला या आपल्या डॉक्टरांचा पर्यायाने समाजाच्या अपमानाचा बदला घेण्याची नामी संधी आली आहे. हेमंत पाटलांसारख्या उपद्रवी, मुज्जोर लोकप्रतिनिधीला धडा शिकवायचा असेल तर यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात युतीने लादलेल्या, सध्या नांदेड येथे रहीवासी असलेल्या , आयात उमेदवार !
हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ. राजश्री हेमंत पाटील यांचा प्रचंड बहूमतांनी पराभव करणे आवश्यक आहे जेणेकरून हेमंत पाटीलसारखे लोकप्रतिनिधींनी या पराभवातून खासदार / आमदारांनी कसे वागावे याचा धडा घेतील !
मी एक स्वाभिमानी आदिवासी कार्यकर्ता म्हणून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना मतदान करणारच नाही आणि कोणताही सामाजिक जाणिवा तिव्र असणारा कार्यकर्ता त्यांना मतदान करेल असे मला वाटत नाही !
आपल्या सर्व समाज बांधवांना अंतःकरणातून विनंती आहे की, सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनच मतदान करावे व समाजाच्या अंतःकरणापर्यंत या घटनेचा प्रसार, प्रचार करावा !
जय संविधान !
जय बिरसा !
आपला : – सुरेश धनवे — पुसद.

0Shares

Related post

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

भाजपसाठी योग्य नारा : 400 पार नाहीतर 40 च्या आत या देशाची लोकशाही व संविधानाला आम्ही…
एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतात आले व विरोधकांनी सरकारच्या…
भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भारतीय संसदीय राजकारणात सर्वाँना हिस्सेदारी/ भागीदारी मिळाली पाहिजे याच भूमिकेतून अनुसूचित जाती, जमातींना राजकीय आरक्षण संविधानाच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *