• 44
  • 1 minute read

पुण्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘संयुक्त अभिवादन’ सोहळ्याचे आयोजन

पुण्यात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'संयुक्त अभिवादन' सोहळ्याचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ०९:३० वाजता भव्य ‘संयुक्त अभिवादन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या सोहळ्यात राज्य व केंद्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते एकत्र येऊन महामानवाला अभिवादन करणार आहेत.
 
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी:
या कार्यक्रमाला अनेक दिग्गज नेते आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत, त्यापैकी काही प्रमुख नावे खालीलप्रमाणे:
 
* मंत्री व लोकप्रतिनिधी: मा. ना. सुनेत्राताई पवार (उपमुख्यमंत्री, महा. राज्य), मा. ना. मुरलीधर मोहोळ (केंद्रीय राज्यमंत्री), मा. ना. चंद्रकांत पाटील (उच्च शिक्षण मंत्री), मा. खा. सुप्रियाताई सुळे, मा. खा. डॉ. अमोल कोल्हे, मा. खा. पार्थ पवार, मा. खा. मेधाताई कुलकर्णी यांसह पुण्याचे सर्व आमदार.
* ⁠
* शासकीय अधिकारी: पुण्याचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त मा. नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी आणि सहपोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा.
* ⁠
* राजकीय नेतृत्व: पुणे शहर अध्यक्ष – अरविंद शिंदे (काँग्रेस), धिरज घाटे (भाजप), सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस), गजानन थरकुडे (शिवसेना यु.बी.टी), रवींद्र धंगेकर (शिवसेना) आणि श्रीकांत पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी).
आयोजक:
या कार्यक्रमाचे नियोजन समितीचे मा. परशुराम वाडेकर (मा. उपमहापौर), अध्यक्ष मा. राहुल डंबाळे आणि मा. डॉ. सिद्धार्थ धेंडे (मा. उपमहापौर), नगरसेवक मा. अविनाशज राज साळवे व मा. बाळासाहेब जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
 
पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांनी या अभिवादन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
तरी सदर बातमी आपले वतिने प्रसिद्ध करणेस विनंती आहे. 
 
राहुल डंबाळे 
0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *