• 188
  • 1 minute read

प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात, पण त्यांचा उमेदवार निवडून येत नाही – रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात, पण त्यांचा उमेदवार निवडून येत नाही – रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्याचा मला आदर आहे. आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत. आंबेडकर हे निवडणूकीच्या काळामध्ये चांगला खेळ खेळण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहेत. हे मला जमत नाही. त्यांना जे जमतं ते मला जमत नाही आणि मला जे जमतं ते त्यांना जमत नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले पुढे म्हणाले की, ”आंबेडकर वेगळे असले तरी आमच्यात एक गोष्ट चांगली आहे. जशी महायुती आणि महाविकास आघाडी हे एकमेकांवर एवढे आरोप करतात. आमच्यामध्ये आम्ही एवढे आरोप-प्रत्यारोप करत नाहीत. मी कधीही प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलत नाहीय. त्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आहे. पण त्यांना मविआमध्ये घेतलं गेलं नाही. त्यांनी मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून सांगितलं होतं की, मला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे. तरीही मविआने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे.

‘मान-अपमान सहन न करण्यापेक्षा त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. पण त्यांचा उमेदवार निवडून येत नाही, हा त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात, मी एवढा चर्चेत नसतो”, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं. ”त्यांच्यावर आरोप केला जातो की, वंचित बहुजन आघाडी ही ‘बी’ टीम आहे. त्यांनी बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला. नागपुरात ठाकरेंना पाठिंबा दिला. असा प्रश्न आठवलेंना केला असता ते म्हणाले की, ”ते त्यांचे डावपेच आहेत. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला द्यायचा नाही. कुणाला कुठे उभं करायचं. या गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट राजकारणी आहेत”

0Shares

Related post

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…
स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही.

स्टालिनने सत्ता गमावली असेल, पण त्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा गमावलेली नाही. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या पराभवामागे कोणतीही कारणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *