मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींची मत्स्यविभाग मंत्री नितेश राणे यांच्याशी “बल्क ग्राहक” डिझेल दराबाबत चर्चा

मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींची मत्स्यविभाग मंत्री नितेश राणे यांच्याशी “बल्क ग्राहक” डिझेल दराबाबत चर्चा

मत्स्य व्यवसायाला मिळालेल्या कृषी समकक्ष दर्जाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा

मुंबई ( प्रतिनिधी ) : मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना लागू असलेल्या “बल्क ग्राहक” डिझेल दर वर्गीकरणात बदल करून दिलासा देण्याच्या मागणीवर आज मंत्रालयात मा. ना. श्री. नितेशजी राणे साहेब ( मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली व दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..
    या बैठकीत उपस्थित मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध समस्या आणि प्रश्न गांभीर्याने ऐकून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या. 
     दरम्यान, मत्स्यव्यवसायिकांनी मत्स्यसंपदा व मत्स्य व्यवसायाला मिळालेल्या कृषी समकक्ष दर्जाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि या योजना तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस खासदार वर्षा गायकवाड, मत्स्य आयुक्त सौ.प्रेरणा देशभ्रतार, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री मा.ना.श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात खासदार वर्षांताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांच्या गंभीर विषयांवर मच्छिमार व मुख्य प्रतिनिधिंच्या विशेष बैठकित श्री. धनाजी कोळी ( अध्यक्ष मुंबई मच्छिमार कोंगेस ) , श्री. जयेंद्रदादा खुणे ( अध्यक्ष, मुंबई प्रदेश आगरी सेना ) , नगरसेविका सौ. संगीता कोळी, श्री. मार्तंड नाखवा ( अध्यक्ष महाराष्ट्र मच्छिमार काँग्रेस ), श्री. मार्शल कोळी ( सरचिटणीस महाराष्ट्र मच्छिमार काँगेस ) श्री. मिल्टन सोडिया ( युवा अध्यक्ष अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती ), श्री. राजीव कोळी ( अध्यक्ष भाटी मच्छिमार सर्वोदय सोसायटी ), सौ. राजश्री भानजी ( अध्यक्षा मरोळ महिला मच्छिमार ) , श्री. विशाल पाटील ( अध्यक्ष कोळी युवाशक्ती संघटना वसई ) , श्री. जयेश रामदास संधे ( वेसावा ) , श्री.निलेश गोन्सावलीस ( उत्तर मच्छिमार संस्था ), श्री. उदय माले ( वेसावा ), श्री.भरत लडगे , श्री. प्रदीप मेस्त्री ( मुंबई समन्वयक ) , श्री. सुरेश कोळी , श्री.विशाल पाटील , श्री.विल्सन कोळी , श्री.राजीव कोळी , श्री. श्याम वरळीकर , श्री.फ्रेडी भंडारी , श्री.आतिश कोळी , श्री.नारायण कोळी इत्यादी प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते तसेच सर्व जिल्हा मधून मच्छिमारांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते व खालील पैकी गंभीर विषयी दिर्घकाल चर्चा होऊन मंत्री महोदयांकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
 
१) डिझेल दरवाढ कमी करून व बल्क मधून काढून रिटेल मध्ये यावे असा केंद्रात पाठपुरावा सुरु आहे, मत्स्य मंत्री यांनी सांगितले.
 
२) विनाशकाळी एलईडी दिव्याच्या मार्फत अनधिकृतपणे होणाऱ्या मासेमारीवर कठोर शासन करून त्यावर आळा घालण्यात यावा व कार्यवाही करावी यावर मत्स्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी मच्छिमार बांधवानी शासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
 
३) आगरी सेनेतर्फे जयेंद्रदादा खुणे यांनी एल.ई.डि.च्या विरोधात शासनामार्फत कडक निर्बंध करून पारंपारिक मच्छिमारांना न्याय मिळण्यासाठी राज्यस्तरीय विभागवार समिती नेमण्यात यावी म्हणून मंत्री महोदयांना निवेदन देऊन मागणी करण्यात केली 
.
४) पावसाळी मच्छिमार बंदी कालावधीमध्ये मच्छिमार बांधवांना खावटी अनुदान शासन कडून मिळावे ही मागणी मंत्री महोदय यांनी मान्य केली .
 
५) पावसाळी मच्छिमार बंदी कालावधी दरम्यान होणाऱ्या अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले 
 
६) मुंबईतील मत्स्य विक्री करणाऱ्या महानगर पालिकेच्या अनेक मच्छीमार्केटची दुरुस्ती करून त्यांना सुशोभीकरण करण्यात यावे याकरिता लवकरच मुंबईतील सर्व आमदार यांची मिटिंग आयोजित करून हा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.
 
७) मच्छिमार व कोळी बांधव यांचा सातबारा व कोळी मच्छिमार बांधवांच्या वहीवटीच्या जागा नावे करण्याच्या मागणीनुसार यासंदर्भात लवकरच शासनस्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार असून केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सोबत चर्चा सुरु असल्याचे मंत्री महोदय यांनी सांगितले.
 
८) अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी सर्व बोटिंवर CCTV बसवण्याची शासनाकडे विनंती केली असता यासंदर्भात शासनस्तरावर तात्काळ निर्णय घेण्याकरिता मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले .
 
९) मच्छिमारांना मासेमारी करताना अपघात झाल्यास त्यांना वेळेवर विमा मिळत नसल्याने यावर त्वरित निर्णय घेऊन मच्छिमार सोसायटी संस्थामार्फत देण्याची मागणी करण्यात आली.
     बैठकीला उपस्थित मच्छिमार बांधव व प्रतिनिधिंनी पारंपारिक मच्छिमारांना भेडसावत असणाऱ्या विविध ज्वलंत प्रश्न राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेशजी राणे यांच्या समोर मांडून मार्ग काढल्याने महाराष्ट्रातील सर्वच मच्छिमार बांधव, प्रतिनिधी आणि मच्छिमार संस्थांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.
0Shares

Related post

“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत”

“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत”

“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत” तरुणांसाठी: एखाद्या छोट्या आकडेवारीमधून देखील बरेच अन्वयार्थ काढता येतील…
आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन! भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञांच्या माध्यमातून…

“शिक्षा, समर्पण और समाज के प्रति हमारा कर्तव्य”- एस के बेरी

शिक्षा, समर्पण और समाज के प्रति हमारा कर्तव्य” अत्यंत हर्ष के साथ आपको सूचित किया जाता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *