• 27
  • 1 minute read

“विधानसभा 2024: परिशिष्ट 44 जाहीर करा, काँग्रेसची मागणी”

“विधानसभा 2024: परिशिष्ट 44 जाहीर करा, काँग्रेसची मागणी”

“विधानसभा 2024: परिशिष्ट 44 जाहीर करा, काँग्रेसची मागणी”

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदारसंघ निहाय परिशिष्ट ४४ च्या प्रती लवकरात लवकर उपलब्ध करून द्या प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन केली मागणी.
 
मुंबई, दि. २४ एप्रिल..
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या मतदानावर सर्वच स्तरातून आजही शंका व संशय उपस्थित करण्यात येत आहे. लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी २८८ मतदार संघातील 
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या मतदार संघ निहाय परिशिष्ट ४४ च्या प्रती लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे.
 
ॲड. कोंडविलकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील पत्र दिले. पत्रात पुढे असे म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान व त्यानंतर जाहीर करण्यात आलेली आकडेवारी यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस पक्षासह इतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी मतदानाच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केलेल्या आहेत. अनेकांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात विविध तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणूकीत व्होटचोरीचा नविन पॅटर्न राबविण्यात आला अशी जनभावना आहे त्यामुळे आयोगाने हे परिशिष्ट उपलब्ध करून द्यावेत असे ॲड. कोंडविलकर म्हणाले.
 
 
 
0Shares

Related post

मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींची मत्स्यविभाग मंत्री नितेश राणे यांच्याशी “बल्क ग्राहक” डिझेल दराबाबत चर्चा

मच्छीमार बांधव व संस्थांच्या प्रतिनिधींची मत्स्यविभाग मंत्री नितेश राणे यांच्याशी “बल्क ग्राहक” डिझेल दराबाबत चर्चा

मत्स्य व्यवसायाला मिळालेल्या कृषी समकक्ष दर्जाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा मुंबई ( प्रतिनिधी ) : मत्स्यव्यवसाय…
“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत”

“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत”

“महाराष्ट्राचे शहरीकरण: विकास फक्त काही शहरांतच केंद्रीत” तरुणांसाठी: एखाद्या छोट्या आकडेवारीमधून देखील बरेच अन्वयार्थ काढता येतील…
आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन! भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञांच्या माध्यमातून…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *