- 61
- 1 minute read
संविधान धोक्यात असताना दलित, ओबीसी व मुस्लिम मतांचे ठेकेदार संघ व भाजपला मदत करण्यासाठी उभे …!
देशाचा मिडिया विद्यमान सत्तेसाठी दलाली करतोय म्हणून सत्तेला नुकसान देणाऱ्या सर्व घटना, प्रकरण अन् बातम्या, समाचार तो दाबून टाकत आहे. मणिपूरमधील महिलांवरील बलात्कार प्रकरणाची दखल जगभरातील मिडियाचे घेतली. पण मोदींच्या गोदी मिडियाचे घेतली नाही. राहुल गांधी यांनी देश एकसंघ ठेवण्यासाठी देशभर हजारो किलो मिटरची यात्रा केली. पण त्याची दखल नाही. मात्र इकडे महाराष्टात प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हे गोदी मिडियाचे हिरो आहेत. भाजपच्या बरोबरीने त्यांना मिडियात स्पेस मिळत आहे. याचे गुपित न कळण्या इतका भारतीय समाज अडाणी राहिलेला नाही. अन् आज गंमत अशी आहे. या दोघांपैकी एक लावा रे तो व्हिडिओ म्हणणारा राजं ठाकरे भाजपकडून एक जागा मिळवून देश विरोधी भाजपसोबत उभा आहे. तर दुसरे प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा सेक्युलर मतांमध्ये विभाजन करून भाजपला मदत करायला मैदानात उतरले आहेत.
गेली वर्षभर राज्यातील मविआ, अन् इंडिया आघाडीला तोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर जीव तोडून मेहनत करीत आहेत. पण त्यांना यश मिळाले नाही. या तोडफोडीसाठी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा ही पुरेपूर फायदा घेतला. पण ते जे काही करीत आहेत ते अनुचित व अनैसर्गिक आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी अपयशच आले.
प्रबोधनकारांचा नातू व आंबेडकरांचा नातू असे भावनिक वातावरण तयार करून त्यांनी शिवसेनेसोबत युतीचे नाटक केले. अन् सेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली युती तोडावी असा प्रयत्न केला. ही भाजपची सुपारी होती. सेना नेत्यांना हे कळत होते. त्यामुळे यात प्रकाश आंबेडकर यशस्वी झाले नाहीत.
२०१९ च्या निवडणूकीत वंचित व एमआयएमने भाजपला अधिकच्या १२ जागा मिळवून दिल्या होत्या. त्यावेळी भाजपला वंचितच्या याच प्रयोगातून किमान २० जागांची अपेक्षा आहे. त्याची सुपारी वंचितला मिळाली आहे. ही सुपारी वाजविण्यासाठी आंबेडकर अनेक कसरती करताना दिसले. राज्यात मराठा आरक्षण आंदोलक व ओबीसी आंदोलक. ऐकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते.गावा गावात हा संघर्ष पेटला होता. यामागे भाजपचे राजकरण होते. अन् दोन्ही डगरी पाय रोवण्याचा प्रयत्न केवळ आंबेडकर करीत होते. हे अख्या महाराष्ट्राने पाहिले आहे.
२०१९ च्या निवडणूकीआधी ०.१० टक्के वोट बँक सोबत नसलेल्या प्रकाश आंबेडकर यांना भीमा कोरेगाव दंगलीनंतर भिडे अन् एकबोटेने ४ ते ५ टक्के मतं मिळवून देण्याचे काम केले. यासाठी त्यांनी ओवेशी व ओबीसीची मोठ बांधली. अन् निवडणूक संपताच ओबीसीना वाऱ्यावर सोडून दिले. वंचितच्या या मतांमधून ओवेशीची मतं बाजुला केली तर १ टक्का ही मतं वंचितची नाहीत. राज्यात वेळोवेळी झालेल्या पोट निवडणुकीचे निकाल हे सिध्द करतात. हिम्मत असेल तर पोट निवडणुकीतील निकालाची आकडेवारी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर करावी. विधानसभा पोट निवडणुकीत २ हजारांचा आकडा त्यांनी पार केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे.
मविआ अथवा इंडिया आघाडीसोबत झालेल्या बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकरांना अपेक्षेपेक्षा अधिक सन्मान दिला गेला. तसेच जागा दिल्या गेल्या. पण त्यांना युतीच करायची नव्हती. आघाडी तोडायची होती. सुपारी त्याचीच घेतली आहे. अन् तेच त्यांनी केले. आज ७ जागांवर पाठींबा देण्याचे काँग्रेसला लालच देवून आपली इज्जत वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस नेतृत्व भीक घालायला तयार नाही. ही ऑफर ही आघाडीत बिघाडी करण्यासाठीच दिली गेली. पण काँग्रेसने तिला केराची टोपली दाखवत अकोल्यातून ही उमेदवार देवून देश व संविधान विरोधी शक्तींशी कसलाही समजोता नाही हेच दाखवून दिले.
देश व संविधान विरोधी भाजपला फुले, शाहु, आंबेडकर व छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी राज्यात अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्यात उभा राहिलेल्या ओबीसी आंदोलनाला पुन्हा प्रकाश आंबेडकरांनी भाजपने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून मिळालेल्या निधीच्या जोरावर सोबत उभे करण्यात यश मिळविले आहे.
दलित, मुस्लिम व ओबीसी मतांचे प्रकाश आंबेडकर, मायावती, ओवेशी यांच्यासारखे अनेक ठेकेदार देशभरात उभे राहिले आहेत. हेचं ठेकेदार या समाजाचे खरे शत्रू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेल्या धर्म निरपेक्षता, लोकशाही अन् संविधानाचे ही हेच नेते शत्रू आहेत. अन् ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव घेतं हे सर्व उद्योग करीत असल्याने ते संघ, भाजप व मोदीं पेक्षाही खतरनाक आहेत. हे समजून घेतले पाहिजे. ही वेळ भावनिक विचार करण्याची नाहीतर डोळसपणे विचार करण्याची आहे.
जयभीम, जय समाजवाद, जय समाजवादी. !!
-राहुल गायकवाड
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)