• 309
  • 1 minute read

संविधान व आंबेडकरी विचारांशी द्रोह करणाऱ्या विरुध्द उभे राहणाऱ्या सर्वाचे स्वागत…!

संविधान व आंबेडकरी विचारांशी द्रोह करणाऱ्या विरुध्द उभे राहणाऱ्या सर्वाचे स्वागत…!

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हा वंचित समाज व बहुजनांचा पक्ष नाही. लोकशाही व संविधान वाचविण्याची वेळ आली असताना वंचित बहुजन आघाडी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी, पुरोगामी विचारांचा मतांमध्ये विभाजन करण्यासाठी त्यांनी निवडणूक रिंगणात आहे. हा संविधान, लोकशाही अन आंबेडकर विचारांशी द्रोह आहे, हे स्पष्टपणे समोर आल्यानंतर वंचितचे जे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात उभे राहून संविधान वाचविण्याच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांचे जाहीर अभिनंदन. फडणवीसांच्या सागर बंगल्यावरुन दिलेले उमेदवार मागे घेण्याची नामुष्की प्रकाश आंबेडकर यांच्यावर या अगोदरच आली आहे. आता सोलापूर मतदारसंघातील वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने आणखी बेज्जती झाली आहे. अन् हे इथेच थांबणार नाही, अशा बेज्जतीला यापुढे अनेक वेळा समोरे जावे लागणार आहे.
परम आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्याबाबतीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचितने सुरुवातीला काय भूमिका घेतली होती ? त्यावर आनंदराज आंबेडकर यांची काय प्रतिक्रिया होती ? त्यानंतर दोघांनीही नमते घेऊन आपल्या भूमिका का बदलल्या, हा तमाशा साऱ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे सरवासरव करण्याची अजिबात गरज नाही.
अमरावतीचे जिल्हा वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई अन त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय संविधान व लोकशाही वाचविणारा असल्याने पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयाचे स्वागत. आपला निर्णय हा ऐतिहासिक असून आंबेडकरी विचारांच्या लढाईत तो तितकाच ऐतिहासिक व अभिमानस्पद आहे. संविधान वाचणार की संपणार हे ठरविणारी ही निवडणूक आहे. मटपेटीतून काय काय निर्णय येणार हे आज आज सांगता येणार नाही. पण संविधानवादी म्हणजे आंबेडकरवादी कोण ? व आंबेडकरद्रोही कोण ? हा निर्णय नक्कीच या मतपेटीतून बाहेर पडेल.

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *