- 13
- 1 minute read
सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 75
सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते......!
20 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेवर बॉम्ब हल्ला करून महात्मा गांधींची हत्या करण्याचा प्रयत्न करणारा मदनलाल पाहवा पकडला गेला. त्याला पोलिसांच्या हवाली ही करण्यात आले. त्याने हत्या कटाची माहिती व कबुली ही पोलिसांना दिली. या कटात आपण एकटेच सामिल नाहीतर विनायक सावरकर, नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे,नारायण आपटे यांच्यासह कटातील अन्य सर्वांची नावे ही पोलिसांना सांगितली असताना देशाचे पहिले उप प्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार पटेल यांनी या अतिरेक्यांवर कुठली ही कारवाई न करता त्या सर्वांना सोडून दिले. अन यानंतर अवघ्या दहाच दिवसात नथुराम गोडसेने याच बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी नेहमी प्रमाणे प्रार्थना सभेला जात असतानाच गोळ्या घालून त्यांची हत्या केली. या घटनेच्या तासभर आधीच सरदार पटेल गांधींना भेटून ही गेले होते. त्यामुळे गांधी हत्येनंतर पटेल यांच्याबद्दल ही संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. गांधी हत्येच्या दहाच दिवस अगोदर झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर गांधींजीच्या जीविताची काळजी घेतली असती, बिर्ला हाऊसमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असती, तर गांधींचे प्राण वाचले असते. पण आरोपीना मोकळे सोडून पटेल यांनी ही हत्याऱ्यांना मदतच केली असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. तसेच गांधींच्या हत्येत प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा हात आहे की काय ? अशी शंका या घटनेच्या 78 वर्षांनंतर ही पटेल यांच्या याच भुमिकेमुळे कायम आहे.
विनायक सावरकरानी माफी मागून १९२४ मध्ये सुटका करून घेतल्यानंतर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आले. याच दरम्यान नथुराम गोडसे हा ही रत्नागिरीत सावरकरांच्याच बाजूला राहायला आला. येथेच दोघांचे संबंध आले. याच दरम्यान गांधी हत्येचा कट शिजला आणि गोडसेने १९३४ मध्ये पुण्यात गांधींच्या गाडीवर बॉम्ब हल्ला करून मारण्याचा प्रयत्न केला. दुसरा qप्राणघातक १९४४ जुलै आणि सप्टेंबरमध्ये पाचगणी आणि सेवाग्राम येथे शस्त्रांनी हल्ला केला. पुन्हा १९४६ मध्ये गांधी रेल्वेने प्रवास करीत असताना प्राणघातक हल्ला केला गेला. साबरमती आश्रमात देखील घुसून अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला होता. मदनलाल पाहवा , नारायण आपटे, गोडसे यांनी २० जानेवारी १९४८ मध्ये केलेला बॉम्ब हल्ला हा सहावा प्राणघातक हल्ला होता. पण गृहमंत्री पटेल यांचे संघाशी असलेल्या घनिष्ट संबंधामुळे हे आरोपी पकडले गेले असताना ही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. सातव्या हल्ल्यात गोडसेने स्वतः गांधींची एकदम जवळून हत्या केली. हत्या करताना त्याला कुठलेही प्रयास करावे लागले नाहीत.
गांधींवर पाच हल्ले झाले तेव्हा पटेल सत्तेवर नव्हते. मात्र २० जानेवारी १९४८ मध्ये झालेल्या हल्ल्याच्या वेळी तेच गृहमंत्री होते. त्यांनी गांधींच्या संरक्षणाची हमी घेतली असती, व आपल्या पदाची जबाबदारी सांभाळली असती, तर गांधींचे प्राण वाचले असते. पण त्यांनी ते केले नाही. यामुळे ते ही संशयाच्या भोवऱ्यात होते. गांधींहत्येनंतर संघावर बंदी घालण्याचा आदेश पटेल यांनीच काढला असला तरी ते संघाच्या विरोधात नव्हते. फाळणीच्या काळात जे दंगे झाले, लुटणार झाली, त्यात संघाचा हात होता. गांधी हत्येत ही संघाचा हात राहिलेला आहे, त्या शिवाय स्वातंत्र्याचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी संघाने ब्रिटिशांसाठी सैन्य भरतीचे कॅम्प घेतले. नथुराम गोडसेंचा भाऊ गोपाळ गोडसे स्वतः भरती झाला होता. गांधी हत्येत सामिल होण्यासाठी तो रजा घेऊन आला होता. असे असताना ही पटेल यांनी अगदी जाहिरपणे राष्ट्रवादी संघटन म्हणून संबोधले आहे. हिंदूंच्या न्याय, हक्क, अधिकारांसाठी संघाची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. गोलवलकर यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध असून त्यांना ते भाई म्हणायचे. पटेल यांच्यावर संघाचा अतिशय प्रभाव राहिलेला आहे. याची कल्पना प्रधानमंत्री पंडित नेहरू यांना होती.
गांधी हत्येनंतर सरदार पटेल यांना लिहिलेल्या पत्रात याबाबत सुतोवाच केलेले आहे. या पत्रात पंडित नेहरू लिहितात पोलिस आणि प्रशासनात संघाच्या लोकांनी घुसखोरी केलेली असून त्याबाबत गंभीरपणे निर्णय घेतले गेले नाहीत तर येणाऱ्या काळात हे फार मोठे संकट असेल. पंडित नेहरू यांच्या या पत्रानंतर ही पटेल यांनी संघाबाबत कडक भूमिका घेतल्याचे दिसत नाही. ज्या संघाने भारतीय स्वातंत्र्याचा लढा, लोकशाही राज्य व्यवस्था, संविधान आणि तिरंगा ध्वजाला विरोध केला, तो संघ सरदार पटेल यांना राष्ट्रवादी वाटत असेल तर गांधी हत्येत जितका संघाचा सहभाग आहे, तितकाच पटेल यांचा आहे. असे बोलणे धाडसाचे असले तरी त्यात वास्तव आहे.
केवळ सरदार पटेलच संघाच्या प्रभावाखाली नव्हते तर त्यांचे सारे कुटुंबच या प्रभावाखाली होते. पटेल यांची कन्या व खाजगी सचिव मणिबेन पटेल यांच्यावर ही संघाचा प्रभाव राहिलेला असून अनेक पत्र व्यवहारावरून तो दिसत आहे. त्याशिवाय पटेल हेच एकटे संघाशी जवळीक साधून होते असे ही नाही. काँग्रेसमधील तत्कालीन अनेक नेत्यांचे संघाशी संबंध आणि जवळीक वैचारिक पातळीवर राहिलेली आहे. तर याचाच फायदा घेत संघाने आपल्या तालमीत तयार झालेल्या अनेकांना याच नेत्यांना हाताशी धरून शासन, प्रशासनात घुसखोरी केली. काँग्रेसमध्ये आपल्या विचारांचा स्लीपर सेल ही तेव्हापासूनच संघाने निर्माण केलेला आहे. त्याचीच फळे आज काँग्रेस पक्ष आणि नेहरू, गांधी परिवार आणि सर्व देश भोगत आहे. शासन, प्रशासनात आपल्या विचारांच्या लोकांची भरती करण्यात संघाला यश अगदी सुरुवातीपासून यश आलेले आहे. गांधी हत्येतून सावरकरांची पुराव्या अभावी झालेल्या सुटकेस ही हेच कारण आहे.
स्वातंत्र्याच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठीच संघाची स्थापना झाल्याचे अनेक पुरावे उपलब्ध असताना, सावरकर माफी मागून सुटून आले असताना काँग्रेसमधील पटेल यांच्यासारख्या नेत्यांवर या दोन्हीचा प्रभाव असणे याचा सरळ अर्थ असा होतो की काँग्रेसमध्ये राहून ही संघाचा ब्रिटिश धार्जिणा अजेंडा चालविणे. पटेल त्यापैकीच एक. पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याशी जवळीक असताना ही स्वातंत्र्य लढ्यातील पटेल यांचे योगदान काही दखलपात्र राहिलेले नाही. नेहरू आणि गांधी ज्या पद्धतीने अग्रेसिच्ह होते, तसे ते दिसले नाहीत. महात्मा गांधींचे सोडा स्वातंत्र्य आंदोलनात ते नेहरूंच्या आसपास ही दिसत नाहीत.
महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खंबीर नेतृत्वामुळे ब्रिटिश सरकारने १९३५ सालच्या भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतामधील कारभार भारतीय मंत्र्यांच्या सल्ल्याने करण्याचा निर्णय घेतला. प्रांत आणि संघराज्य स्थापन करण्याचा अधिकार ही या कायद्यामुळे मिळाला. ही पूर्ण स्वातंत्र्याची चाहूल होती. ही चाहूल संघ, हिंदू महासभा आणि सावरकर यांच्या अजेंड्याला तडा देणारी, स्वप्ने भंग करणारी होती. यामुळेच संघ, सावरकर आणि हिंदू महासभा खुलेआम गांधी व नेहरू यांच्या विरोधात उभी राहिल्याचे दिसते.याच विरोधाचा एक भाग होता की, संघ आणि तत्कालीन ब्राह्मणी संघटनांनी गांधी हत्या करण्याचा निर्णय घेतला असावा. त्यातून सावरकरांच्या नेतृत्वाखाली नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे, नारायण आपटे यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली व या टीमने या कायद्याची चाहूल लागताच १९३४ पासूनच गांधी हत्येचे प्रयास सुरू केले. अन शेवटी ३० जानेवारी १९४८ मध्ये गांधी हत्या करण्यात या शक्तींना यश ही आले.
महात्मा गांधी यांच्या हत्ये प्रकरणी ज्या ९ आरोपींवर खटला चालविला गेला. त्यातील एक दोघांचा अपवाद सोडला तर सर्वच्या सर्व संघाशी व सावरकरांशी संबंधित होते. त्या शिवाय एकाच अपवाद सोडला तर एक जातीय म्हणजे चित्पावन ब्राह्मण होते. गांधी हत्येच्या पहिल्या प्रयत्नाच्या अगोदरपासून नथुराम गोडसचा सावरकरांशी संबंध होता. संघ आणि सावरकरांनी स्थापित केलेल्या अभिनव भारत या संघटनांचे नेतृत्व नेहमीच केवळ ब्राह्मण नव्हेतर चित्पावन ब्राह्मणांच्या हातात राहिलेले आहे. ब्राह्मणांशिवाय अन्य कोणाला ही ब्राह्मणी धर्म व्यवस्थेत स्थान नाही. असे असताना सरदार पटेल यांच्यासारख्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांचे संघाच्या प्रभावाखाली असणे हे मानायला थोडे कठीण जात असले तरी ती वस्तुस्थिती आहे.
………………………… ………………………… …….
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी
मुंबई, महाराष्ट्र प्रदेश
0Shares