• 43
  • 1 minute read

संविधान व लोकशाहीवादी शक्तींना रोखण्याचा कुटील डाव भाजप बी टीमच्या माध्यमातून खेळतेय…!

संविधान व लोकशाहीवादी शक्तींना रोखण्याचा कुटील डाव भाजप बी टीमच्या माध्यमातून खेळतेय…!

सोलापूर, जळगाव, शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांनी परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडी बॅफूटवर आली आहे. हे चित्र असेच राहिले तर उर्वरित ३ टप्प्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे वंचितच्या नेत्यांना दिसू लागली आहेत. त्यामुळे डाग डुजी करण्याचा मोठा प्रयत्न ही सुरु करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यात आव्हान कायम ठेवण्याची धडपड म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघातील निकाल मतदान संपताच वंचितने जाहीर केला आहे. ४०.34,% मतं मिळवून प्रकाश आंबेडकरांना भिवादन विजयी घोषित ही करण्यात आले आहे. हे करताना भाजपशीच वंचितचा राज्यात खरा मुकाबला आहे. हे दाखविण्याचा कुटील डाव ही वंचितने खेळला आहे. भाजपला,२९.९१,% इतके मतदान ही वंचितने देवून टाकले आहे. संविधान व लोकशाहीवादी शक्तींना रोखण्याचा भाजपचा हा कुटील डाव जो वंचितच्या माध्यमातून भाजप खेळत आहे.
केवळ राज्यातीलच नव्हेतर देशातील सर्व आंबेडकरी विचाराचा समाज तसेच अल्पसंख्यांक समाज संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीसोबत उभा आहे. यावर मात करीत प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयी होत असतील, तर त्यांचे अभिनंदनच.
पण मतदान संपताच अकोला मतदासंघातील कुठल्या विधानसभा मतदारसंघात भाजप, वंचित, इंडिया/ महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेसला किती टक्के मतदान झाले हे किती टक्के किती पाईट सांगण्याचा अचूक प्रयत्न वंचितने केला आहे. ते आश्चर्यकारक आहे. २७.०९,,% टक्के काँग्रेस व २.६६ टक्के मतदान इतरांना झाल्याचे ही मेसेज वायलर होत आहेत. इतके अचूक मतदान आजपर्यंत कुठल्याही सर्व्हेने दिलेले नाहीत. त्यामुळे ही टक्केवारी आश्चर्यकारक असून ती फक्त मोदीची गँग ही टक्केवारी देवु शकते.
पुढील ३ टप्प्यात वंचितचे आव्हान अन् सर्वच काही संपुष्टात आले आहे. आंबेडकरी समाजातील सर्वच विचारवंत, साहित्यिक, बुद्धिजीवी वंचित अन् तथाकथित आंबेडकरी पक्षांच्या विरोधात ते मत विभाजन करून भाजपला मदत करीत असल्याने त्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. डॉ. सुखदेव थोरात, डॉ. यशवंत मनोहर यांच्यानंतर श्यामदादा गायकवाड, संजय अपरांती, राजय गायकवाड, पत्रकार दिवाकर शेजवळ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक रिपब्लिकन फ्रंट उभा राहिला आहे. अन् हा फ्रंट मोदी अन् त्याच्या बी टीमच्या विरोधात उभा आहे.
भाजपने सत्तेवर आल्यानंतर या दहा वर्षाच्या काळात देशातील संसदीय राजकारणात धुडगूस घातला आहे. ते सर्वांसमोर आहे. पण यामधील एक गोष्ट फार महत्वाची आहे व ती म्हणजे बी टीमचे राजकारण. या बी टीमच्या राजकारणाचे परिणाम आपल्या सर्वांना माहित आहेत. त्यावर ही काही बोलायची गरज नाही. ते सर्वांना माहित आहेच.
बाकी या देशातील बहिष्कृत समाजाला जगण्याचे संवैधानिक अधिकाराची सनद संविधानाच्या माध्यमातून दिल्यानंतर या समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबुद्ध म्हणत. पुढे त्यांनी त्यास रिपब्लिकन म्हटले. आज प्रकाश आंबेडकर हे याच समाजाला वंचित म्हणत आहेत. त्यावरून स्पष्ट होत आहे की, ते आंबेडकरी चळवळीला व विचारांना कूठे घेऊन जात आहेत. त्यास कुठली ओळख निर्माण करून देत आहेत.

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी,पार्टी महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *