• 534
  • 1 minute read

चंदा दो, धंदा लो या मोदीच्या गॅरंटीचा एअरटेल ग्राहकांवर भुर्दंड…!

चंदा दो, धंदा लो या मोदीच्या गॅरंटीचा एअरटेल ग्राहकांवर भुर्दंड…!

एअरटेल भागिदार बनलेल्या अदानी’ला करोडोंचा मलिदा !

अदानीने एअरटेलमध्ये भागीदारी मिळविताच एअरटेल ग्राहकांवर भुर्दंड पडला असून रिचार्ज प्लॅनची किंमत किमान 100 रुपयांनी सर्वच प्लॅनमध्ये वाढली आहे. देशात एअरटेलचे 60 करोड ग्राहक असून वाढीव 100 रुपये प्रमाणे 600 करोड रुपये अधिकचा नफा आता एअरटेल अन AESL म्हणजे अदानी एनर्जी सोल्युशन लि. च्या तिजोरीत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या चंद्याची परतफेड करण्याची ही पहिली तातडीची कृती मोदींनी केली आहे. सर्व चंदावाल्यांना मोदींने गॅरंटी दिली आहे, त्यामुळे एअरटेलच नव्हे, आणखी काय काय भुर्दंडांचा सामना देशातील जनतेला करावा लागेल, हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळेलच. पण हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या गोर गरीब जनतेने मोदीला मतं दिली त्यांनी यासंदर्भात आता तरी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
सुनील भारती मित्तल परिवाराच्या मालकीच्या या एअरटेल कंपनीचे शेअर्स राजीव जैन यांच्या अमेरिका स्थित कंपनीने मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. अन आता अदानी ग्रुपच्या ” अदानी एनर्जी सोल्युशन लि. या कंपनीने यात भागीदारी घेतली आहे. अदानीच्या भागीदारीचे करार एअरटेलसोबत होताच एअरटेलने आपल्या प्लॅनचे दर वाढविले आहेत.

0Shares

Related post

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात.

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात.    महाराष्ट्रात नुकत्याच…

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे ….. आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे: आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी अर्थव्यवस्थेतील श्रीमंत / उच्च /…
मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ? गेल्या दहा वर्षात भारतीय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *