- 147
- 1 minute read
इराण व खोमेनी यांनी इस्रायल व अमेरिकेची युद्धखोरीची नशाच उतरविली…..!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 161
युद्धखोरीला विरोध करीत इस्रायल, अमेरिका व युरोपमधील नागरिकांनी खोट्या व पोकळ राष्ट्रवादाचा चेहरा टरटरा फाडला....!
इस्त्रायला पाठिंबा देत अमेरिकेने इराणवर मिसाईल हल्ले केले आणि त्याचे उत्तर ही तसेच हल्ले करून इराणने दिले. जगातील सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेशी असे सरळसरळ भिडणे आणि सुपर पॉवरची नशा उतरविणे तशी सोपी गोष्ट नव्हती व नाही. पण इराणचे सर्वेसर्वा अयातुल्लाह खोमेनी यांनी ती हिंमत दाखविली. जगभरात शांती कायम करण्यासाठी ती कुणीतरी दाखवायलाच हवी होती. युरोमधील युद्धखोर राष्ट्रांच्या युद्धखोर सत्ताधाऱ्यांना नरसंहार करण्याची नशा चढलेली असून ती उतरविणाऱ्याची गरज जगाला होती. खोमेनी यांनी सध्या तरी ती नशा उतरविली आहे. त्यामुळेच त्यांच्या हिंमतीला दाद देत अमेरिका व इस्रायलसह जगभराचे ते हिरो ठरले आहेत.अमेरिकन जनता तर ट्रॅम्पच्या भूमिकेला विरोध करीत व खोमेनींना पाठिंबा देत रस्त्यावर उतरली आहे. हे सर्व अमेरिकेतील रस्त्यांवर होत आहे. असेच वातावरण इराणने बेचिराख केलेल्या इस्रायलमधील आहे. आपल्या या स्थितीला इस्रायल नागरिक इराण अथवा खोमेनी यांना दोषी मानत नाहीतर, तर नेतान्याहुला दोषी मानत आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या राष्ट्राच्या व राष्ट्र प्रमुखांच्या युद्धखोर भूमिकेचा विरोध करीत या नागरिकांनी पोकळ व खोट्या राष्ट्रवादाचा चेहरा आणि मुखवटा ही टरटरा फाडला आहे.
फॅसिस्ट आणि युद्धखोर सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादाची व्याख्या आपल्या सोयीनुसार केली आहे. आतंकवाद्यांशी साठगाठ करून देशात आतंकी हल्ले घडवून आणायचे. ते हल्ले पाकिस्तानने केले म्हणून पाकविरुद्ध लुटपुटीचे युद्ध करायचे. त्या आडून राष्ट्रभक्तीचे व राष्ट्रवादाचे राजकारण करायचे, हा धंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपसारख्या शक्ती आपल्या देशात करीत आहेत. मात्र या संदर्भात निर्माण होणारे प्रश्न सत्तेला विचारले की, विचारणाऱ्यांना देश विरोधी ठरवायचे हा धंदा येथे ही सुरू आहे. आतंकी हल्ले झाले त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती ? सीमेवर सुरक्षा व्यवस्था असताना आतंकी पाकिस्तानातून सशस्त्र आले कसे ? आणि सर्जिकल स्ट्राईक आगाऊ सूचना देवून का केली गेली ? हे प्रश्न तसे योग्यच आहेत. पण विचारणाऱ्यांना पुरावे मागत असल्याचा आरोप करीत राष्ट्र विरोधी ठरविले जाते. या अशा प्रकारच्या राष्ट्रवादाचा चेहऱ्यावर जगभरातील नागरिक एक सनकन तमाचा मारताना दिसत आहेत.
इस्रायल इराण युद्धात अमेरिकेने केवळ इस्त्रायला पाठिंबाच दिला नाहीतर, इराणवर मिसाईल हमले ही केले. या हल्ल्यानंतर अमेरिकन जनता ट्रॅम्पच्या विरोधात नारे देत रस्त्यावर उतरली असून युद्धाला विरोध करीत आहे. गाजा पट्टीत इस्रायलकडून होणाऱ्या नरसंहाराचा ही विरोध ही जनता करीत आहे. त्यामुळे अमेरिकेत गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली असून असेच वातावरण पूर्ण युरोपमध्ये आहे. युद्धखोर म्हणून ओळख असलेल्या जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंडमधील जनता ही आपापल्या देशात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून युद्धाला विरोध करीत आहे. अमेरिकेत तर केवळ ट्रम्पचा विरोध होत नाहीतर , इराणला पाठिंबा देणारे नारे ही अमेरिकन जनता देत आहे. अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यांचा इराणने जशास तसा जबाब ही दिला असताना ही अमेरिकन जनता इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ल्ला खोमेनी यांचा जयजयकार करीत आहेत. हा जनविरोध आपल्या सत्तेला धोका निर्माण करू शकतो, हे स्पष्ट दिसल्यावर युद्ध विरामाची भाषा ट्रॅम्पचने सुरू केली. पण हे युद्ध आता इस्रायल आणि त्याच्या मदतीला येणाऱ्या राष्ट्रांना बेचिराख करूनच थांबेल, अशी ठाम भुमिका इराणने घेतली. ती जगभरात शांतता हवी असलेल्या जनतेला पटली असल्यानेच ते इराण व खोमेनीला पाठिंबा देत आहेत.
प्रगतशील व आधुनिक राष्ट्र म्हणून जगभर नावलौकिक असलेल्या इस्त्रायलला इराणने गेल्या दहा दिवसात बेचिराख करून टाकले आहे. इस्त्रायलचे नागरिक आपले सर्वस्व हिरावून बसली आहे. ज्या मिसाईल हल्ल्यात सर्वस्व गमवावे लागले आहे, ते हल्ले इराण करीत आहे, हे माहित असताना ही इस्त्रायली नागरिक इराण व खोमेनीला दोष देत नाहीत, तर इराणला हे हल्ले करायला भाग पाडणाऱ्या नेतान्याहू व अमेरिकेला ते दोषी मानत आहेत. सर्वस्व गमवून बसणे म्हणजे नेमके काय असते, हे इस्त्रायली नागरिकांना स्वतःवर बेतल्यावर कळू लागले आहे. गाजा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांच्या वेदना, यातना आता कळू लागल्या असून त्यामुळेच ते खोमेनीला दोष देत नाहीत, तर पॅलेस्टाईन नागरिकांचा नरसंहार करणाऱ्या नेत्यानहुला दोषी ठरवित आहेत.
युद्धाचे परिणाम हे सदासर्वकाळ वाईटच असणार यात शंकाच नाही. पण इराण इस्रायल व अमेरिकेसोबत जे युद्ध लढत आहे त्याचे परिणाम नक्कीच चांगले आहेत. या मिसाईल युद्धाने जगाला युद्धाची नव्हेतर शांततेची गरज आहे, हे दाखवून दिले आहे. साम्राज्यवादी व मानवी जीवनासाठी घातक असलेल्या हत्यारांचे उत्पादन करणाऱ्या राष्ट्रांना व त्या राष्ट्राच्या प्रमुखांना विरोध करणारी जनता त्याच राष्ट्रात उभी करण्याचे फार मोठे काम इराणने हे मिसाईल युद्ध लढून केले आहे. आपापल्या देशातील युद्धखोर सत्ताधीशांच्या विरोधात त्याच देशातील जनता उभी राहत आहे. जगभरातील सर्वच राष्ट्रांतील जनतेला युद्ध नको आहे. युद्धाच्या परिणामामुळे इस्रायलच्या नागरिकांना गाजा पट्टीतील विस्थापितांच्या यातना व वेदना समजल्या आणि त्यांनी त्या बोलून दाखविल्यामुळे खोट्या राष्ट्रवादाचे जगभराच्या जनतेमध्ये एकमेकांच्या विरोधारात उभ्या केलेल्या भिंती इराणने जे काही केले आहे, त्यामुळे कोसळल्या आहेत. युरोपियन राष्ट्रांची साम्राज्यवादी भूमिका संपल्या शिवाय जगात शांतता नांदणार नाही, खोमेनी यांनी जे काही केले, ते या साम्राज्यवादी भूमिकेचा विरोधात व शांततेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे.
इराणमधील तेलांच्या खाणींवर अमेरिकेला आपले वर्चस्व स्थापित करायचे आहे. विद्यमान राष्ट्र प्रमुख खोमेनी यांच्यामुळे ते शक्य होत नाही, त्यामुळे युद्धाच्या बहाण्याने सरळ सरळ सत्ता परिवर्तन घडवून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न अमेरिकेचा होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत ही अमेरिकेने युद्ध विराम करण्याची सक्ती तर भारताला धमक्या व आदेश देवून केलीच. पण ५६ इंच छाती असलेल्या विश्वगुरूने ट्रम्पचा तो आदेश पाळल्यानंतर अनेक क्लृप्त्या करून पाकिस्तानला वेगवेगळ्या मार्गाने मदत केली आहे. भारताच्या सीमेवर तगडे शत्रू निर्माण करणे हा मागचा अमेरिकेचा हेतू आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारत व पाकिस्तान या दोन्ही राष्ट्राचे नुकसान आहे. पण खोमेनीसारखी हिंमत नसल्याने अमेरिका त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल.
अमेरिकेने केलेल्या मिसाईल हल्ल्यांचा पलटवार करताना तसेच हल्ले इराणने अमेरिकेवर केले असताना तेथील नागरिकांनी इराणचा विरोध केला नाही, तर ट्रम्पच्या युद्धखोर नीतीचा विरोध केला. हा विरोध करीत असताना या अमेरिकन नागरिकांनी इराण व खोमेनी यांना जाहीर पाठिंबा दिला. इस्रायलमधील नागरिक ही खोमेनी यांना पाठिंबा देत युद्ध विराम करण्याची विनवणी करीत आहेत. हा पाठिंबा खोमेनीला नसून गाजा पट्टीतील विस्थापित जनतेला आहे. मानवी जीवन उध्वस्त करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या व शक्तींच्या विरोधात खऱ्या अर्थाने उभे राहण्याची वेळ आली, तेव्हा अमेरिकन जनताच पुढे आली आणि तिने खोट्या राष्ट्रवादाचा बुरखा फाडला.
ट्रॅम्पच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली अमेरिकन जनता ट्रम्पच्या युद्धखोर भूमिकेला लगाम लावेल, असे वाटत आहे. यामध्ये ते यशस्वी झाले तर जगभरातील अर्ध्या अधिक समस्या संपून जातील. तर आपल्या देशात दुसरा कुणी नेतान्याहुं पैदा होणार नाही, याची खबरदारी यापुढे इस्त्रायली जनता घेईल, असा आशावाद इस्त्रायली जनतेने सध्या तरी दिला आहे. प्रत्येक देशात नाक खुपसणाऱ्या व धमक्या देवून आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या अमेरिकेचा सर्व माज उतरविण्याचा ऐतिहासिक काम इराणने केले असल्याने येणाऱ्या काळात जगाचा चेहरा मोहरा ही बदलेल व शांती प्रस्थापित होईल. इस्रायल व अमेरिकेची युद्ध करण्याची खुमखुमी इराणने जिरवली असून युद्ध विरामचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या युद्धाच्या समाप्तीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अमेरिका हा सुपर पॉवर आहे, यावर पडदा पडलेला असेल…! इतिहासाची पाने तशी साक्ष देतील. तर पॅलेस्टाईन गाजा पट्टीतील नरसंहाराच्या विरोधात इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ल्ला खोमेनी बलाढ्य व शक्तिशाली राष्ट्राशी लढले अन् जिंकले, याची ही साक्ष ही इतिहासाची पाने देतील. एका सार्वभौम राष्ट्राचे प्रमुख म्हणून युद्ध विरामचा निर्णय घेण्याची हिंमत ५६ इंचाच्या विश्वगुरुत नाही. ट्रम्पच्या हा मध्ये हा मिळविणारा हा फेक विश्वगुरू आहे, असा ही इतिहास लिहिला जाईल. इतिहास कुणालाच माफ करीत नाही.
…………….
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
ReplyForward Add reaction |
0Shares