• 118
  • 1 minute read

सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम.

सोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक विजय

         ‎दिल्ली : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्वपूर्ण ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते. उच्च न्यायालयाचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत.
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज सकाळी या संदर्भातील सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
 
ज्यामुळे विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील त्यांच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या खटल्याच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले असून, हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे बोलले जात आहे.
 
या केसमध्ये पीडित सुर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे, ॲड. कीर्ती आनंद यांनी बाजू मांडली.
 
 
 
 
 
0Shares

Related post

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …
रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी : भारतातील सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या शिक्षिका       रुबल (Rouble) नागी या भारतातील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *