• 188
  • 1 minute read

काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्तामुक्त भाजपा’ झाला आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
 
बुलढाण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नगरसेवकपदासाठी भाजपामध्ये प्रचंड गोंधळ माजल्याचे चित्र दिसत आहे आणि हेच चित्र आगामी विधानसभा निवडणुकतही दिसेल. मुळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
 
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गुंडांचाच पक्ष आहे तो, याआधी त्यांनी माफियांना प्रवेश देण्यात आला, मराठवाड्यात एका वरळी किंगला पक्षात प्रवेश दिला. कोयता गँगशी संबंधित लोक त्यांच्या पक्षात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले असे सपकाळ म्हणाले. 
 
नवीन वर्षाचा संकल्प..
२०२६ हे वर्ष काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष आहे आणि त्याची तयारी डिसेंबर महिन्यापासूनच झाली आहे. काँग्रेसचे हौसले बुलंद आहेत, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत. वैचारिक कटीबद्धता आहे आणि वैचारिक मेळ व मूठ बांधण्याचे काम नवीन वर्षात करणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेसमुक्त भारतची वल्गणा करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला:
 
हर्षवर्धन सपकाळ
0Shares

Related post

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *