• 51
  • 1 minute read

समाज दिशाहीन झाला – विसरा पदवी – पदाला

समाज दिशाहीन झाला - विसरा पदवी - पदाला

 मी नुकताच चारकोप कांदवली मध्ये राहण्यास आलो होतो. तिथे मला एक जुना मित्र भेटला. त्याला माझ्याविषयी माहिती असल्यामुळे, माझी इथे ओळख वाढावी म्हणून त्याने मला एका संस्थेच्या कार्यालयात नेले. एकमेकांचा परिचय झाल्यामुळे, तिथे मला बोलण्याचा आग्रह झाला. माझे बोलणे ऐकून, तिथे असलेले संस्थेचे सभासद बरेच प्रभावी झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते. मात्र संस्थेचे उच्च पदावर असलेले अध्यक्ष त्यांना माझा प्रभाव फारसा मानवल्याचे दिसले नाही. म्हणून त्यांनी स्पष्ट म्हटले हे तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. अशा रीतीने त्यांनी त्यांचा मोठेपणा दाखविला. वास्तविक सिद्धार्थ कॉलेजमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली पदोन्नती मध्ये राखीव जागेच्या प्रश्नावर झालेल्या सभेमध्ये ते प्रमुख वक्ते होते. त्यांचे भाषण फार चांगले झाले. त्या मूडमध्ये त्यांच्यानंतर माझ्या भाषणाकडे त्यांचे लक्ष नव्हते. मी वलयांकित व्यक्ती नसल्यामुळे त्यांनी मला ओळखले नाही. हे मला त्या दिवशी दिसून आले. त्या प्रसंगानंतर आम्ही दोघे बऱ्याच वेळा समोरासमोर आलो. परंतु हात वर करण्यापलीकडे, आमचे बोलणे भाषण वाढले नाही. त्या संस्थेची जागा म्हाडा कडून व्यायाम शाळेसाठी दिली गेली होती. तिथे बांधकामासाठी आमदार कपिल पाटील यांच्या फंडातून सुद्धा निधी मिळविण्यात आला होता. ज्या कारणासाठी जागा देण्यात आली होती. तो प्रकल्प उभा झाला नाही. म्हणून म्हाडा कडून जागा काढून घेण्याची नोटिस आली. हे सर्व प्रकरण अध्यक्ष महोदयांनी भाजप खासदार गोपाळ शेट्टीकडे आपल्या जवळचे कागदपत्रासह नेले. त्या कागदपत्राच्या आधारे, गोपाळ शेट्टीने म्हाडाकडे ही जागा काढून घेतली पाहिजे. म्हणून मागणी केली आणि ती जागा आपल्या संस्थेने स्वतःच्या हाताने घालविली. हा प्रकार मी यासाठी नमूद करतो आहे. त्या अध्यक्ष महोदयांना सार्वजनिक कामाची काहीही माहिती नाही. फक्त तो अधिकारी आहे. म्हणून त्याला अध्यक्ष केले होते. त्याने संस्थेसाठी ना लोकसमूह जमवला, ना लोकोपयोगी कामे केली. असेच चित्र बौद्ध समाजामध्ये सर्वत्र आहे. मी गावातल्या महार वाड्यामध्ये पहिला ग्रॅज्युएट, पहिला अधिकारी म्हणून तो वस्तीतल्या लोकांपासून दूर राहू लागला. अशी आपल्या प्रत्येक पदवीधर, अधिकारी व्यक्तीची मानसिकता आहे. आपले लोक आपल्याकडे कामे घेऊन येऊ नये म्हणून ते कधीही आपली जात दाखवित नाही. सेवा निवृत्त झाल्या नंतर देखील त्याच्या डोक्यातून आपण उच्च पदावर होतो. हे गेले नाही. मी ज्या वेळेला 1967 साली मुंबईत आलो. त्यावेळेला ज्या ज्या लोकांच्या माझ्या ओळखी होत होत्या. तो प्रत्येक जण त्याचे ओळखपत्र देत असे. त्यावर त्याच्या डिगऱ्या लिहिलेल्या असत.
 
त्यावेळी प्रत्येक गाव खेड्यामध्ये पदवीधर झालेला उच्च पदावर असलेला तो पहिला होता. म्हणून त्याचे वागणे समाजाला दूर ठेवून होऊ लागले होते. आत्ता सर्वत्र पदवीधर, उच्च पदवीधर झालेला आहे म्हणून आपण कोणत्या मोठ्या हुद्द्यावर आज आहे,तो हुद्द्यावर असलेले ओळखपत्र पुढे करीत आहेत. काहीजण आपण कोणत्या संस्थेचे अध्यक्ष,सेक्रेटरी आहोत ही ओळखपत्र पुढे करीत आहेत. म्हणजे प्रत्येक जण आपण कॉमन माणसापेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखवीत आहेत. म्हणजेच हे समाजापासून स्वतःला मोठे समजत आहेत. तोच शिरस्ता आज सर्वत्र आपण पाहत आहोत. भविष्यात हे सर्व असेच होणार, हे ओळखूनच डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते, शिक्षित लोकांनी मला धोका दिला. ते आज खरे ठरले आहे. वास्तविक या शिकलेल्या उच्च पदावर असलेल्या लोकांनी आपल्या गरीब समाजाला मदत केली पाहिजे होती,दिशादर्शन केले पाहिजे होते. परंतु ते फक्त आपल्याच पुरते जगत आले आहे . त्यामुळे बौद्ध समाज आज दिशाहीन झाला आहे. तसेच आंबेडकरी चळवळ संपविण्यासाठी संधी साधू नेत्यांना सत्ताधारी पक्षांनी नामधारी मंत्रीपद दिलेले आहे. त्या मंत्र्याच्या पाठीमागे आशाळभूत लोकांचा लोंढा बघताना मनाला फार वेदना होतात. हे चित्र असेच राहणार असेल तर बौद्ध समाजाच्या पुढच्या पिढीचे भविष्य काय असेल हे सांगायलाच नको. हे वास्तव बदलविण्यासाठीच भीम बाणा सामाजिक संघटनेने कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आपण सर्वांनी या संघटनेला सहकार्य केलं पाहिजे. जोजो कार्य करण्यास इच्छुक आहे. त्या सर्वांचे भीम बाणा मध्ये स्वागत आहे.
 
 नवे वर्ष 2026 च्या सर्व बौद्ध बांधवांना खूप खूप शुभेच्छा!
 
सयाजी वाघमारे 
0Shares

Related post

विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग

विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग

विपश्यना : आत्मक्रांतीचा विज्ञान आणि मनाच्या मुक्तीचा महामार्ग आजचा मनुष्य बाह्य जग जिंकण्यात गुंतला आहे; पण…
UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का :

UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का :

UGC च्या समानता नियमांना स्थगिती म्हणजे सामाजिक न्यायाला धक्का सर्वोच्च न्यायालयाकडून UGC बिलाच्या नव्या नियमांना स्थगिती…

आम्ही बोललो की “या डाव्यांना फक्त भांडवलशाहीला विरोध करणे माहित आहे”

आम्ही बोललो की “या डाव्यांना फक्त भांडवलशाहीला विरोध करणे माहित आहे” अशी टीका होते. आम्ही बोललो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *