- 33
- 1 minute read
करेक्ट कार्यक्रमाची अहंकारी भाषा बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंचाच करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत फडणवीस….!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 67
अंजली आणि अनिश दमानिया पती पत्नी फडणवीस यांच्यासाठी काम करतात....!
राज्यातील सरकार चालविण्यासाठी एकनाथ शिंदेची शिवसेना असो अथवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपला आता या दोन्ही पक्षांची गरज राहिलेली नाही. भाजपसाठी हे दोन्ही पक्ष केवळ मढी ठरलेली असून या दोघांच्या अंतिम संस्कारासाठी देवेंद्र फडणवीस एका संधीची वाट पाहत आहेत. मी शांत आहे, तोवर शांत आहे. वेळ आली की, करेक्ट कार्यक्रम करतो, अशी अहंकारी भाषा वापरणाऱ्या व वक्तव्य करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचाच पहिल्यांदा करेक्ट कार्यक्रम करण्याचा पुरेपूर बंदोबस्त फडणवीस यांनी केला असल्याचे अशोक खरात प्रकरणावरून स्पष्टच दिसत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला, संस्कृतीला व आध्यात्मिक परंपरेला कलंकित करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाकडे फडणवीस हे एक संधी म्हणून पाहत असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही नेते, तसेच स्वपक्षातील काही मंत्री ही त्यांच्या रडावर आहेत. अशोक खरातची नीच कृत्यांमध्ये फडणवीस राजकीय संधी शोधत असून त्यामध्ये पिडित महिलांना न्याय मिळेल की नाही, माहित नाही. पण फडणवीस या संधीचा फायदा घेऊन आपल्या मार्गातील काटे नक्कीच दूर करू शकतात. त्या दिशेनेच हे प्रकरण हाताळले जात ही आहे.

राज्यात भाजपकडे 132 आमदार असून बहुमतापासून फक्त १३ आमदार कमी आहेत. निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या १५ ते २० कार्यकर्त्यांना शिंदे सेनेतून तिकीट देवून निवडूण आणले आहे. त्यामुळे शिंदेकडे असलेल्या ५७ आमदारांमध्ये किमान १५ तरी आमदार पूर्वाश्रमीचे भाजपाई आहेत. ते केव्हाही शिंदेंना सोडू शकतात. याबाबत भाजपला खात्री असल्याने बहुमताची चिंता नाही. त्याशिवाय शिंदे आणि अजित पवारांनी सत्तेसाठी आपापले पक्ष फोडले, सोडले तसे त्यांच्यासोबत असणारे अनेक आमदार ही सत्तेसाठी भाजपत प्रवेश करू शकतात, याची ही खात्री फडणवीस व भाजपला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे सेनेची भाजपला गरजच उरली नाही. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत भाजपला या दोन्ही मित्र पक्षाची गरज होती. त्या निवडणुका आता पार पडल्या असल्याने गरज ही संपली आहे. आता चाचपणी करून या पक्षांना संपवण्याचे काम बाकी असून त्यासाठी ऑपरेशन कमळच्या नावाखाली शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्थित्व भाजप कधी ही संपवू शकतो. अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदे यांना अडकवून त्याचा गट फोडण्याचे कट कारस्थान केव्हाही होऊ शकते. तीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा भाजपसोबतचा व्यवहार पाहिल्यावर हा पक्ष भाजपमय झाल्याचे दिसत आहे.
मित्र पक्षांना फोडण्याची टीका होऊ नये, यासाठी फडणवीस सबुरीने घेत असून योग्य संधीची वाट पाहत होते. अशोक खरात प्रकरण व त्या प्रकरणाशी शिंदे व अजित पवार गटाचे संबंध उघड झाल्यावर फडणवीस सुखावले असून ते ज्या संधीची वाट पाहत होते, ती त्यांना मिळाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे प्रकरण फडणवीस यांना माहित होते. पण त्यांनी कारवाई केली नाही. उलट शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या प्रकरणात पूर्ण कसे होतील, याची प्रतिक्षा ते करीत राहिले. आता प्रतिक्षा संपली असून कारवाई सुरू केली आहे. मात्र आता ही ते या संदर्भात सबुरीने घेत आहेत. अद्याप ही त्यांनी कुठली ही ठोस कारवाई सुरू केलेली नाही. कसून चौकशी करण्याची विधाने करण्या पलिकडे ते याबाबत काहीच करीत नाहीत. हाच खरे तर एकनाथ शिंदे यांना इशारा आहे. शिंदेच्याच शब्दात सांगायचे तर फडणवीस करेक्ट कार्यक्रम करण्याची संधी शोधत आहेत. शिंदेंची पूर्णपणे जिरवली जाणार.
CDR प्रकरणी अंजली दमानियावर गुन्हा दाखल करून चौकशी करावी….!
अशोक खरात प्रकरणात पिडीत महिलांनी तक्रारी दाखल करताच अंजली दमानिया कमालीच्या सक्रिय झाल्या असून तपास यंत्रणेला ही जी माहिती वेळेवर मिळत नाहीत, ती माहिती त्यांना सहज मिळत आहे. अशोक खरात यांच्याशी कोण कोण संपर्कात होते ? कोणी किती वेळा अशोक खरात यांच्याशी फोनवरून व मोबाईल फोनवरून संपर्क केला ? एकूण किती मिनिट, किती तास बोलणे झाले ? ही सर्व माहिती त्यांना मिळाली आहे. ज्या तत्परतेने ज्या कुणी ही माहिती त्यांना पुरविली आहे. त्या मागे मोठी ताकद असल्याशिवाय हे शक्यच नव्हते. अन ही माहिती गृह खात्याशी संबंध असल्याने मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस यांच्या मदतीशिवाय ती मिळणे ही शक्य नव्हते. याचा सरळ अर्थ असा आहे की, फडणवीस यांच्याच सांगण्यावरून ही माहिती दमानिया यांना पुरविण्यात आली आहे. हा मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या फडणवीसावर करण्यात येत असलेला बिनबुडाचा आरोप नाही. बिनबुडाचा आरोप करून त्याबद्दलस्वतःच क्लीन चिट देण्याचा उद्योग फडणवीसारखा करण्याचा हा प्रयत्न नाही. प्रश्न हा आहे की, अंजली दमानियाला ही माहिती कोठून मिळाली ? कुणी दिली ? याची चौकशी होऊन सर्व संबंधितांवर कारवाई होणार का ?
CDR म्हणजे कॉल डिटेल रेकॉर्ड. मोबाईल फोनवरून केलेल्या कॉल, एसएमएस आणि डेटा वापराचे तांत्रिक रेकॉर्ड असते. कुणी कोणाशी, कधी, किती वेळ संभाषण केले, तसेच त्यावेळचे लोकेशन याची माहिती CDR च्या माध्यमातून मिळते. हा CDR केवळ एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठीच संबंध तपास यंत्रणेला न्यायालयाच्या आदेशानंतर मिळतो. मग तो अंजली दमानियाला कसा मिळाला. दमानिया कुठल्या तपास यंत्रणेचा भाग आहेत ? याची उत्तरे गृहखात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी देणे गरजेचे आहे. अशोक खरात प्रकरणाच्या तपासा इतकाच याची चौकशी होणे ही गरजेचे आहे. मोबाईल वापरणाऱ्या सर्व ग्राहकांच्या खाजगी आयुष्याशी हे संबंधित असून दमानियासारख्या सत्तेच्या दलालांना मोबाईल ग्राहकांच्या खाजगी आयुष्याशी खेळण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे CDR मिळवून फार मोठा गुन्हा केलेला आहे. त्यांच्या चौकशीचे, तपासाचे आदेश मुख्यमंत्री कधी देणार ?
१९९५ मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आल्यानंतर अंजली दमानियासारख्या प्रवृत्तीचा उदय व विकास झालेला आहे. सत्ताधाऱ्यांना नको असलेल्या आपल्याच मंत्र्याच्या भ्रष्टाचाराच्या फाईली व सर्व माहिती सत्ताबाह्य केंद्र बनलेल्या अण्णा हजारे यांना देऊन भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात झाली. ही माहिती शासकीय व प्रशासकीय पातळीवरून मिळत असल्याने त्यात तथ्य असायचे. खरे तर १९९५ च्या अगोदर ही शासकीय व प्रशासकीय पातळीवरून तत्कालिन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांना ही माहिती पुरविण्यात येत होती व मुंडे आरोप करीत असत. पुढे मुंडे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या तंत्राचा विकास झाला. गोपीनाथ मुंडे यांच्याच या तंत्रातील अंजली दमानिया या एक आहेत. माजी मंत्री व भाजपचे विद्यमान आमदार सुरेश धस यांनीच हा आरोप प्रमाणसह केलेला आहे. भाजपच्या कोर टीमसोबत दमानिया हे काम करीत असल्याचे अनेक पुरावे असून त्यांना CDR च्या माध्यमातून एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, तिची बहीण, केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांचे व अशोक खरात यांच्यातील संभाषणाचे कॉल डिटेल दिल्याने या आरोपाला पुष्टी मिळत आहे.
अंजली दमानिया या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करीत असल्याने त्यांना याचा सरळ मोबदला ही मिळालेला आहे. त्यांचे पती अनिश दमानिया हे फायनान्स तज्ञ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते काम ही करीत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आखत्यारितील Maharastra institution For Tranformation ( Mitra, मित्रा ) या संस्थेच्या मानद सल्लागारपदी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच 2025 मध्ये नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे त्या फडणवीस यांच्यासाठी काम करीत आहेत, हा आरोप नसून यात सत्यता आहे.
बारामतीचे पवार कुटुंबिय मग ते शरद पवार असोत, सुप्रिया सुळे, रोहित पवार, अजित पवार असोत की पार्थ पवार असोत, जळगावचे एकनाथ खडसे असोत की बीडचे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे अथवा नाशिकचे छगन भुजबळ असोत की शिवसेना उबाठाचे नेते असोत हे सारे फडणवीस यांचे राजकीय शत्रू असून हेच सारे नेते सतत अंजली दमानिया यांचे टार्गेट राहिले आहेत. देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सत्तेच्या बाहेर घालविण्यात याचाच मोठा वाटा राहिलेला आहे. आज जे काम फडणवीस यांच्यासाठी त्या करीत आहेत. हे काम अण्णा हजारे यांनी ही गोपीनाथ मुंडे व भाजपसाठी या अगोदर केलेले आहे. नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापासून रोकण्याचे काम ही मुंडे यांच्या सांगण्यावरून अंजली दमानिया यांनी केलेले आहे.
अण्णा हजारे, किरीट सोमय्या, अंजली दमानिया यांच्या सोबतच बोलघेवड्या असलेल्या सुषमा अंधारे या ही गोपीनाथ मुंडे यांच्याच नेतृत्वाखाली अशाच प्रकारची तयारी करीत होत्या. पण मुंडे यांचे अकाली निधन झाल्याने त्यांना अंजली दमानियासारखी संधी मिळाली नाही. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शशिकांत सुतार, विजय गावित, त्यानंतर नबाब मलिक, जळगावचे जैन, छगन भुजबळ, आता धनंजय मुंडे यांना याच हजारे, सोमय्या, दमानिया यांच्या आरोपामुळे कधी मंत्रिपदे सोडावी लागली आहेत. अथवा यांची राजकीय कार्यकीर्द ही संपलेली आहे. हेच तंत्र फडणवीस हे ही आपल्या राजकीय शत्रूंना संपविण्यासाठी वापरत आहेत. यामध्ये केवळ मित्र पक्षाचे नेते नसून स्वपक्षातील विरोधक ही आहेत.
…………….
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares