• 151
  • 1 minute read

महाराष्ट्रात प्रथमच डॉ. यशवंत सावित्रीमाई जोतीराव फुले जयंती उत्सव

महाराष्ट्रात प्रथमच डॉ. यशवंत सावित्रीमाई जोतीराव फुले जयंती उत्सव

महाराष्ट्रात प्रथमच डॉ. यशवंत सावित्रीमाई जोतीराव फुले जयंती उत्सव

महात्मा जोतीराव फुले यांचे दत्तक पुत्र डॉ. यशवंत जोतीराव फुल्यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करत, विशेषतः प्लेगसारख्या भीषण साथीच्या काळात सावित्रीमाई फुल्यांच्या प्रेरणेने दवाखाना सुरू करून हजारो प्लेगग्रस्तांचे (बहुजन /शूद्र-अतिशूद्रांचे) प्राण वाचवले.
 
त्यांचे संपूर्ण जीवन हे समाजसेवेच्या उदात्त ध्येयाला वाहिलेले होते. महात्मा फुल्यांचा समतेचा आणि मानवतेचा विचार त्यांनी कृतीतून जपला आणि पुढे नेला.
 
याच प्रेरणेने, वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थीपणे समाजसेवा करणाऱ्या डॉक्टरांना *“डॉ. यशवंत सावित्रीमाई जोतीराव फुले पुरस्कार”* प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
 
तसेच, लेखक राजाराम सूर्यवंशी यांनी महाराष्ट्रात प्रथमच डॉ. यशवंतराव जोतीराव फुल्यांचे चरित्र लेखन करून त्यांच्या कार्याचा आणि सत्यशोधक चळवळीतल्या योगदानाचा प्रकाश टाकला आहे. या महत्त्वपूर्ण ग्रंथावर/ *डॉ. यशवंत सावित्रीमाई जोतीराव फुले* यांच्यावर सखोल चर्चा आयोजित करण्यात आली आहे, ज्यातून त्यांच्या कार्याचा व्यापक प्रसार होणे अपेक्षित आहे.
 
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्ते, विचारवंत, तसेच समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थिती दिली होती.
0Shares

Related post

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !

……..ती रात्र जेव्हा एकटा शूद्र, संपूर्ण सिस्टमवर मात करून जिंकला !          …
सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

सीवूड्स येथील लुम्बिनी बुद्ध विहारात मुलांचा ‘विशेष वर्षावास कार्यक्रम’ उत्साहात संपन्न नवी मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी):बौद्धजन…
४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

४९० आदिवासी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्याना संघ – भाजपचे फुट सोल्जर्स बनविण्याचे कारस्थान ….

विद्यार्थ्यांना संघी (ब्राह्मणी हिंदू ) बनविण्यासाठीच मानकर ट्रस्टचा महाराष्ट्रातील आदिवासी वसतिगृहात उपक्रम – डॉ. संजय दाभाडे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *