• 92
  • 1 minute read

“AIचा नवा धक्का: सायबर सुरक्षेवर अभूतपूर्व संकटाची चाहूल”

“AIचा नवा धक्का: सायबर सुरक्षेवर अभूतपूर्व संकटाची चाहूल”

“AIचा नवा धक्का: सायबर सुरक्षेवर अभूतपूर्व संकटाची चाहूल”

निवांत दाणे टिपणाऱ्या कबुतरांच्या थव्यामध्ये अचानक एखाद्या मांजराने धबाककन एन्ट्री घेतली तर कबुतरे कशी फडफडाट करतील तसे काहीसे होत आहे. होणार आहे. Anthropic या अमेरिकन आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीचे नवीन प्रॉडक्ट येऊ घातले आहे. त्यांचे नाव Claude Mythos असे आहे. हे अत्यंत सामर्थ्यवान प्रॉडक्ट आहे असा दावा केला जात आहे. हे ए आय प्रॉडक्ट मोठ्या संस्थांच्या सॉफ्टवेअर सिस्टीम मधील, आज्ञा प्रणालीतील फटी (Bugs) आणि सुरक्षितेला कोठे कोठे धोका आहे (vulnerabilities) ते शोधून काढू शकते. ही संकल्पना तशी नवीन नाही. सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या कंपन्या हे काम सतत करत असतात. पण असे सामर्थ्यवान ए आय प्रॉडक्ट आले तर त्याचा जसा विधायक हेतूंसाठी उपयोग होईल तसा हॅकर्स देखील त्याचा विध्वंसक हेतूंसाठी उपयोग करू शकतात. Anthropic कंपनीला या धोक्याची कल्पना आहे. म्हणून त्या कंपनीने हे प्रॉडक्ट फक्त काही मोजक्या अमेरिकन कंपन्यांना टेस्टिंग साठी दिले आहे. ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल इत्यादी पण Claude Mythos ची एवढी दहशत तयार झाली आहे की याच विषयावर चर्चा करून पूर्वतयारी करण्यासाठी आपल्या वित्तमंत्र्यांनी रिझर्व बँक, अनेक मोठ्या बँका, नासकॉम , तंत्रज्ञान मंत्रालय….यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसापूर्वी बैठक घेतली. हे फक्त भारतातच नाही तर अनेक देशातील सरकारे याला नक्की कसा प्रतिसाद द्यावा याची पूर्वतयारी करण्यासाठी आपसात चर्चा करत आहेत. मोठ्या प्रमाणावर विदा हॅण्डल करणाऱ्या बँका, वित्त कंपन्या यांच्या अंतर्गत सिस्टिमवर कमीजास्त परिणाम होऊ शकतो तसाच तो भारतातील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या धंद्यावर देखील होऊ शकतो. आजच्या इकॉनॉमिक टाईम्सच्या सबंधित बातमीत म्हटले आहे “Government has flagged this threat as unprecedented” एकाच वेळी किती आघाड्या उघडल्या गेल्या आहेत…

0Shares

Related post

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …
रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी २०२६ जागतिक शिक्षक पुरस्कार विजेता

रुबल नागी : भारतातील सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या शिक्षिका       रुबल (Rouble) नागी या भारतातील…
विस्मृतीत गेलेल्या आठवणी, जेव्हा धोबिणीवर प्रेम दाटून आलं !

विस्मृतीत गेलेल्या आठवणी, जेव्हा धोबिणीवर प्रेम दाटून आलं !

“विस्मृतीत गेलेल्या आठवणी”, “मनाच्या पटलावर प्रसंग”         एकदा लहानपणी, (1956-58 चा काळ असावा)…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *