United Nations Environmental Program (UNEP) हि युनोच्या अनेक संस्थांपॆकी एक. तिने जगात किती शिजवलेले अन्न खरकट्यात फेकून दिले जाते याबद्दल काही आकडेवारी जाहीर केली आहे ; हि आकडेवारी २०२२ सालाची आहे
वाचल्यावर देखील कोणी अन्न फेकून देणार नाही अशी आशा आहे
दररोज एव्हडे अन्न खरकट्यात फेकून दिले जाते ज्यात १०० कोटी जणांची एक वेळची जेवणे (meals) होतील असे हा अहवाल सांगतो ; आणि पृथ्वीवर जवळपास तेवढेच, विविध देशातील, लोक म्हणजे १०० कोटी नागरिक अर्धपोटी झोपतात
हि संस्था म्हणते कि शिजवलेले अन्न मोठ्याप्रमाणावर फेकून दिले जाते हे माहित आहे. म्हणून युनोच्या डेव्हलपमेंट गोल्स मध्ये त्याचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट घालण्यात आले आहे.
पण अनेक गरीब / विकसनशील राष्ट्रे त्याची आकडेवारी आणि त्याचे त्याचे विश्लेषण करणाऱ्या यंत्रणा उभ्याच करत नाहीत; आकडेवारी आणि त्यामागील कारणे नीट अभ्यास केल्याशिवाय त्यावरच्या उपाययोजना देखील करता येणार नाहीयेत
अजून काही संबंधित आकडेवारी देखील गंभीर आहे
एका वर्षात फुकट घातलेल्या अन्नाची किंमत १ ट्रिलियन डॉलर्स , ८५ लाख कोटी रुपये आहे; म्हणजे भारताच्या जीडीपीच्या २५ टक्के भरेल
या खर्कट्यात टाकल्या जाणाऱ्या अन्नापैकी ६० टक्के अन्न घरांमधून आणि ४० टक्के रेस्टॉरंट / हॉटेल्स यामधून जाते
ग्रामीण भागात खरकटे किमान पाळीव जनावरांना तरी घातले जाते , शहरी भागात डायरेक्ट कचऱ्यात
अन्न फेकून देणे श्रीमंत राष्ट्रात होतेच पण गरीब / विकसनशील राष्ट्रात देखील होते ; त्याचे महत्वाचे कारण उरलेले अन्न ठेवण्यासाठी फ्रीझ / शीतपेट्या नसणे हे आहे
हे अन्न बनवताना / शिजवताना जी ऊर्जा खर्च होते तिचे मूल्य देखील अर्थात मोठे आहे ; आणि त्यातून होणारे कार्बन उत्सर्जन देखील
आठवून पहा लग्न आणि अनेक समारंभ / आणि अनेक पार्ट्या / आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मधून वेटरने साफ करायच्या आधी तुम्ही बघितलेली टेबले
विचारा शहरात / उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये कचरा गोळा करणाऱ्या स्त्री पुरुषांना , ते घराच्या कचऱ्यात काय काय बघतात ते
उघड आहे अर्धपोटी राहणारे लोक अन्न खर्कट्यात टाकणार नाहीत ; एखादे गरीब कुटुंब अन्न फक्त खराब / आमल्यानंतरच टाकत असेल
युनोच्या संस्थेने श्रीमंत / गरीब / विकसनशील असे समूहवाचक शब्द वापरले असले तरी आपल्याला माहित आहे कि हे समूह काही एकजिनसी नाहीत ; त्यात जीवघेण्या आर्थिक / वर्गीय उतरंडी आहेत ; अगदी अमेरिकेच्या श्रीमंत न्यूयॉर्क शहरात अनेक गरीब नागरिक अर्धपोटी झोपतात
हा शुद्ध वर्गीय फिनिमिनॉन आहे हे नक्की
आणि हो. याचा तुम्ही किती पुस्तकं वाचता, किती संगीत ऐकता, किती तास कोणत्या गहन विषयांवर चर्चा करता याच्याशी काहीही सबंध नसतो.
-संजीव चांदोरकर (१ एप्रिल २०२४)